Makar Sankranti Special: दरवर्षी 14 जानेवारीला मकरसंक्रांती हा सण साजरा केला जातो. तिळगूळ घ्या आणि गोड गोड बोला असं म्हणत सगळ्यांना मकरसंक्रांतीच्या शुभेच्छा देतात. लहान मुलांचे बोरन्हाण, लग्न झालेल्या नवीन नवरीचा तिळवा अशा सर्व वेगवेगळ्या परंपरांनी भरून मकरसंक्रांती हा सण येत असतो. लहान मुलं, नवरी, नवरदेव, मुलगी, जावई या सगळ्यांना मकरसंक्रातीला काळे कपडे आणि हलव्याचे दागिने देवून सजवतात. लहान मुलांच्या बोरन्हाणला त्यांना दागिने घालून छान राधा कृष्ण बनवतात. तर हे हलव्याचे दागिने मिळतात कुठे आणि त्याची किंमत काय असू शकते जाणून घेऊया.
बोरन्हाण स्पेशल हलव्याचे दागिने (Bornhan Special Halwa Jewellery)
लहान मुलांच्या दगिन्यांमध्ये विविधता आपल्याला बघायला मिळते. काळानुरूप घडून आलेले बदल दगिन्यांमध्येही झालेत. लहान मुलांसाठी कृष्णाचे मुकुट, बाजू बंध, अंगठी, पैजन, बांगड्या, कानातले, कमरबंध, हेअर बेल्ट, पारंपरिक हार, नवीन डिझाईनचे हार, ब्रेसलेट इत्यादि दागिने उपलब्ध आहेत. त्याच्या किमती पुढीलप्रमाणे…..
कृष्णाचे मुकुट | 200 ते 500 |
बाजू बंध | 300 ते 600 |
कानातले | 100 ते 300 |
हेअर बेल्ट | 50 ते 150 |
पैजन | 150 ते 300 |
अंगठी | 50 ते 150 |
नवीन डिझाईनचे हार | 200 ते 500 |
पारंपरिक हार | 200 ते 500 |
ब्रेसलेट | 100 ते 300 |
संपूर्ण सेट | 600 ते 3000 |
नवीन नवरीसाठी दागिने (Jewellery for the newlyweds)
मकरसंक्रांतीला नवीन लग्न झालेल्या नवरीचा तिळवा करतात. त्यात काळी साडी आणि हलव्याचे दागिने देण्याची प्रथा आहे. बाजू बंध, अंगठी, पैजन, बांगड्या, कानातले, कमरबंध, पारंपरिक हार, नवीन डिझाईनचे हार, इत्यादि दागिने उपलब्ध आहेत. याच्या किमती वरीलप्रमाणेच आहेत. जावयासाठी हलव्याचे नारळ सुद्धा मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. त्याची किंमत 200 ते 500 आहेत. या दागिन्यांच्या किमती त्याच्या डिझाईन आणि लुकवरुन ठरवल्या जातात. मार्केटमध्ये हे दागिने उपलब्ध आहेतच पण काही महिलांनी घरगुती व्यवसाय सुद्धा सुरू केले आहेत.