Eklavya Scholarship Scheme: एकलव्य स्कॉलरशिप योजना महाराष्ट्रात अनेक वर्षापासून सुरू आहे. या योजनेचा निधी राज्य सरकारद्वारे दिला जातो. ही योजना महाराष्ट्रात शिकत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी लागू आहे. गरीब आणि होतकरू विद्यार्थ्याना आर्थिक मदत म्हणून ही योजना राबविली जाते. ही योजना महाराष्ट्र सरकारने वर्ष 1995-96 मध्ये सुरू केली आहे. एकलव्य स्कॉलरशिप योजना हायर एजुकेशन डिपार्टमेंटसाठी तयार केली आहे. जे विद्यार्थी पोस्ट ग्रेजुएशन करत आहेत त्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र एकलव्य स्कॉलरशिप प्रदान करण्यात येते. या योजनेचा लाभ महाराष्ट्रातील अनेक विद्यार्थी घेत आहे. (Scholarships for Post Graduate Students)
Table of contents [Show]
महाराष्ट्र एकलव्य स्कॉलरशिप योजनेची उद्दिष्टे!
महाराष्ट्र सरकारची ही योजना सुरू करण्याचा उद्देश हाच की गरीब कुटुंबातील मुलांना एकलव्य स्कॉलरशिप देऊन त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मदत होते. त्याचबरोबर परिश्रम घेऊन शिक्षण घेत असल्याने त्यांना मार्गदर्शन सुद्धा केल जाऊ शकतं. महाराष्ट्र सरकारच्या महाडीबीटी या वेबपोर्टलवरून विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज करता येऊ शकेल.
योजनेसाठी पात्रता आणि निकष
1. या योजनेनुसार पोस्टग्रेजुएट कोर्समध्ये चांगले मार्क्स म्हणजेच 60% मिळवलेल्या विद्यार्थ्याना एकलव्य स्कॉलरशिप योजनेचा लाभ घेत येतो.
2. या योजनेच्या अंतर्गत उत्तीर्ण उमेदवारांना शिष्यवृत्ती म्हणून ₹5000 आर्थिक मदत दिली जाते आणि त्यांना ही मदत दर वर्षी प्रदान केली जाते.
3. मेरिट बेसलेक्शन नंतर विद्यार्थ्याना मिळालेला लाभ डायरेक्ट त्यांच्या बँकेच्या खात्यात ट्रान्सफर करण्यात येतो.
4. या योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थी महाराष्ट्रातील मूळ निवासी असायला पाहिजे.
5. जे विद्यार्थी या योजनेसाठी अर्ज करतात त्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न 75000 पेक्षा जास्त असायला नको.
6. लाभ घेणारा विद्यार्थी कुठेही पार्टटाइम किंवा फूलटाइम जॉब करणारा नसावा.
7. विद्यार्थाची हजेरी 75 % असणे आवश्यक आहे.
योजनेचा लाभ घेण्यासाठी लागणारी कागदपत्रे
1. आधार कार्ड (Aadhar Card)
2. महाराष्ट्राचे मूळ निवासी असल्याचे प्रमाणपत्र (Certificate of original resident of Maharashtra)
3. ट्रान्सफर सर्टिफिकेट (Transfer Certificate)
4. सेमिस्टर मार्कशीट (Semester Marksheet)
5. डोमिसाइल सर्टिफिकेट (Domicile Certificate)
6. इनकम सर्टिफिकेट (Income Certificate)
7. अटेंडेंस सर्टिकेट (Attendance Certificate)
8. बँक पासबुक झेरॉक्स (Bank Passbook Xerox)
9. ऑनलाइन फॉर्मची झेरॉक्स (Xerox of online forms)
योजनेबाबतची अधिक माहिती इथे वाचा, एकलव्य शिष्यवृत्ती योजना
महाराष्ट्र एकलव्य स्कॉलरशिपसाठी ऑनलाइन अर्ज असा करा
1. विद्यार्थ्यांना अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल.
2. यानंतर नोंदणीसाठी, तुम्हाला नवीन नोंदणी लिंकवर क्लिक करावे लागेल.
3. नवीन नोंदणी लिंकवर क्लिक केल्यानंतर क्लिक पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती आणि मग एकलव्य शिष्यवृत्ती योजनेचा पर्याय निवडावा लागेल.
4. एकलव्य शिष्यवृत्ती योजना शोधा आणि अर्ज करा वर क्लिक करा.
5. त्यानंतर आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी लागतील.
6. सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड केल्यानंतर, फॉरवर्ड वर क्लिक करा.
7. यानंतर, ते पुढील स्टेपवर मंजुरीसाठी पाठवावे लागेल.
8. सर्व माहिती सबमिट केल्यानंतर, अर्ज डाउनलोड करून त्याची प्रिंट आउट करावी लागेल.
9. ही प्रिंटआऊट कॉलेजमध्ये जमा करावी लागेल.
त्यानंतर विभागीय अधिकाऱ्यांकडून यादी तयार केली जाते आणि त्या यादीच्या आधारे विद्यार्थ्यांना एकलव्य शिष्यवृत्तीचे वाटप केले जाते. या योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत 31 मार्च 2023 पर्यंत आहे.