Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Money Rule Changes: सप्टेंबर महिन्यात आर्थिक व्यवहार करताना हे 6 बदल लक्षात ठेवा

Money Rule Change

Image Source : www.continentalcurrency.ca

2 हजार रुपयांच्या नोटा बदलून घेण्याची मुदत सप्टेंबर महिन्यात संपुष्टात येईल. तसेच मोफत आधार कार्ड अपडेट करून घ्यायचे असेल तर शेवटची तारीख काय जाणून घ्या. सप्टेंबर महिन्यातील महत्त्वाचे बदल वाचा.

Money Rule Changes: वित्तसंस्था, बँका आणि विविध सरकारी विभागाकडून वेळोवेळी नियम बदलण्यात येतात. त्याचा परिणाम तुमच्या दैनंदिन आर्थिक व्यवहारावरही होऊ शकतो. सप्टेंबर महिन्यात अनेक गोष्टी करण्यासाठी मुदत कालावधी संपत आहे. त्यामुळे उशीर केल्यास पश्चातापाची वेळ येईल. पाहूया कोणत्या गोष्टींवर तुम्ही लक्ष द्यायला हवे.

मोफत आधार अपडेट मुदत 

आधार अथॉरिटीने मोफत आधार अपडेटची मुदत 14 जून पासून 14 सप्टेंबरपर्यंत तीन महिन्यांनी वाढवली होती. ती मर्यादा पुढील महिन्यात संपेल. आधार कार्डवर पत्ता, नावासह इतर माहिती चुकीची असेल तर लवकरात लवकर अपडेट करा असे आवाहन UIDAI ने नागरिकांना केले आहे. 

2 हजारच्या नोटा बदलून घेण्याची मुदत 

2 हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद केल्यानंतर या नोटा बदलून घेण्यासाठी RBI ने चार महिन्यांची मुदत दिली होती. ती मुदत सप्टेंबर महिन्यात संपुष्टात येईल. त्यामुळे तुमच्याकडे अद्यापही दोन हजारांच्या नोटा असतील तर जवळच्या बँकेत जाऊन बदलून घ्या. 30 सप्टेंबर 2023 ही शेवटची तारीख आहे. 

अल्प बचत खात्यासाठी आधार लिंक 

अल्प बचत खात्याला 30 सप्टेंबर 2023 पर्यंत आधार क्रमांक लिंक करावा लागेल. जर लिंक केला नाही तर 1 ऑक्टोबरपासून जुन्या ग्राहकांचे अल्पबचत खाते बंद केले जाईल. तर नव्याने खाते सुरू करणाऱ्यांना सहा महिन्याच्या आत आधारसंबंधीत माहिती द्यावी लागेल. 

डिमॅट नॉमिनी

सेबीने डिमॅट खातेधारकांना नॉमिनी (वारसदार)ची माहिती समाविष्ट करण्यासाठी 30 सप्टेंबर 2023 पर्यंत मुदतवाढ दिली आहे. जर नॉमिनीची माहिती द्यायची नसेल तर नॉमिनी पर्याय नाकारण्याचा पर्यायही दिला आहे. मात्र, हे काम 30 सप्टेंबरपर्यंत पूर्ण करावे लागेल. 

एसबीआय We care

ज्येष्ठ नागरिकांसाठीची खास एसबीआय वूई केअर योजनेची मुदतवाढ 30 सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. ज्येष्ठ नागरिकांना या योजनेद्वारे जास्त व्याजदर मिळू शकतो. SBI We care FD योजनेचा व्याजदर 7.50 टक्क्यांपर्यंत आहे.  

अॅक्सिस बँक मॅग्नस क्रेडिट कार्ड नियम बदल 

1 सप्टेंबरपासून अॅक्सिस बँकेच्या मॅग्नस क्रेडिट कार्ड वापराचे नियम आणि अटींमध्ये बदल होत आहे. काही ठराविक आर्थिक व्यवहारांवर EDGE रिवॉर्ड पॉइंट मिळणार नाहीत. तर 200 रुपये इतर व्यवहारांसाठी खर्च केल्यास 12 EDGE पॉइंट मिळतील. मात्र, महिन्याचे एकूण बिल 1,50,000 असायला हवे. नवीन कार्ड धारकांसाठी वार्षिक शुल्कही वाढवण्यात आले आहे. अॅक्सिस बँकेच्या संकेतस्थळावर सविस्तर माहिती पाहायला मिळेल.