Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Diwali Muhurat Trading 2022: शेअर बाजारात या दिवशी होणार मुहूर्त ट्रेडिंग

Investment , Muhurat Trading 2022

Diwali Muhurat Trading 2022: दरवर्षी बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज आणि नॅशनल स्टाक एक्स्चेंज मुहुर्ताच्या वेळा निर्धारित करतात. एका मान्यतेनुसार, जो कुणी या एका तासाभराच्या काळात ट्रेडिंग करतो त्याच्याकडे संपूर्ण वर्षभर धन संचय आणि भरभराट साधण्याची सर्वोत्तम संधी असते.

मुहुर्ताचे ट्रेडिंग करण्याचा कल गुंतवणूकदारांमध्ये गेल्या काही वर्षांत चांगलाच रुजला आहे. दरवर्षी बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आणि नॅशनल स्टाक एक्सचेंज मुहुर्ताच्या वेळा निर्धारित करतात. एका मान्यतेनुसार, जो कुणी या एका तासाभराच्या काळात ट्रेडिंग करतो त्याच्याकडे संपूर्ण वर्षभर धन संचय आणि भरभराट साधण्याची सर्वोत्तम संधी असते.

यंदा दोन्ही स्टॉक एक्सचेंजनी पारंपरिक एका तासाच्या विशेष मुहुर्तासाठी 24 ऑक्टोबर 2022 रोजी सोमवारी संध्याकाळी 6.15 ते 7.15 ही वेळ ठरवली आहे. ब्लॉक डील सत्र सायंकाळी 5.45 ते 6.00 वाजेपर्यंत चालणार आहे. प्री-ओपन सत्र सायंकाळी 6.00 वाजता सुरू होऊन 6.08 वाजता संपणार आहे. 

मुहूर्त ट्रेडिंगच्या दिवशी सेन्सेक्स सामान्यत: वधारून बंद होतो. स्टॉक्स एक्सचेंजेस पाठोपाठ आता कमॉडिटी एक्सचेंजनेही गुंतवणूकदारांसाठी मुहूर्त ट्रेडिंग सुरू केले आहे. व्यापारी समुदायासाठी दिवाळीपासून नव्या वित्तवर्षाचा प्रारंभ होत असतो. यात व्यापारी ‘चोपडा’ किंवा ‘शारदा पूजा’ करतात. यात सर्व जुनी खातेपुस्तके वा वहीखात्यांमध्ये नोंदी करण्यासाठी नव्याने सुरवात केली जाते. 

पारंपरिकरीत्या, व्यापार आणि लाभ मिळवण्यासाठी हा सर्वात मंगलक्षण असतो. यातून नवीन वित्तीय सुरुवात आणि उद्दिष्टांप्रति भरभराटीची रुजूवात केली जाते. ज्याने यापूर्वी कधीच स्टॉक्समध्ये गुंतवणूक केलेली नाही किंवा ट्रेडिंग उद्योगात आजवर पाऊलही टाकलेले नाही, अशांसाठी ही शुभलाभाची प्रारंभ करण्याची आणि गुंतवणुकीवर उच्च परतावा कमावण्याची सर्वात उत्तम संधी आहे.

शेअर मार्केटमध्ये मुहूर्त ट्रेडिंगची परंपरा सुमारे ६० पेक्षा अधिक वर्षांपासून सुरू असली तरी बहुतांश गुंतवणूकदारांना त्याबद्दल फारशी माहिती नाही. ट्रेडिंगसाठी उत्सुक लोकांसाठी ही पैसे कमावण्याची वाया गेलेली नामी संधीच आहे, असेही म्हणता येईल. मुहुर्ताचे ट्रेडिंग करण्याचा कल व्यापारी वर्गात गेल्या काही वर्षांत चांगलाच रुजला आहे. त्यातील संख्या आणि व्यापाराचे प्रमाण वाढवण्याच्या सुप्त क्षमतेचा अद्याप पुरेपूर वापर झालेला नाही. मिलेनिअल्स आणि जनरेशन झेडमधील लक्षावधी लोकसंख्या या अतुल्य संधीपासून अनभिज्ञच आहे. या क्षेत्रात कार्यरत असल्याच्या नात्याने त्यांना या इष्टतम संकल्पनेशी परिचय करून देण्याचे आमचे उद्दिष्ट्य आहे.

शेअर बाजारात प्रवेश करण्याचा एक शुभ मुहूर्त

बीएसईमध्ये मुहूर्त ट्रेडिंगची सुरुवात १९५७ मध्ये, तर एनएसईमध्ये १९९२ मध्ये झाली होती. दिवाळीच्या दिवशी लक्ष्मीपूजनानंतर एका तासाच्या कालावधीसाठी विशेष मुहूर्त ट्रेडिंग करण्यात येते. व्यापाऱ्यांसाठी हा बाजारात प्रवेश करण्याचा एक शुभ मुहूर्त समजला जातो. अनेक व्यापाऱ्यांची मान्यता आहे की, मुहुर्ताच्या दरम्यान ग्रहतारे असे काही जुळून आलेले असतात की या काळात केलेले ट्रेडिंग वाईट शक्तींच्या प्रभावातून मुक्त असते. या काळात बाजारात गुंतवणूक करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला फायदा होण्याची जास्त शक्यता असते.