Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Ration Card: जाणून घ्या, रेशन कार्डच्या बदलत्या नियमांबद्दल

Ration Card

Image Source : http://www.diehardindian.com/

Ration Card: सरकारने मोफत रेशन योजनेच्या नियमात मोठा बदल केला आहे. रेशनकार्ड अंतर्गत उपलब्ध तांदळाचा कोटा कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. लाभार्थी कुटुंबातील प्रत्येक सदस्याला या वर्षी मार्चपर्यंत म्हणजेच पुढील तीन महिन्यांसाठी 5 किलो तांदूळ मिळणार आहे.

Ration Card: सरकारने मोफत रेशन योजनेच्या नियमात मोठा बदल केला आहे. रेशनकार्ड अंतर्गत उपलब्ध तांदळाचा कोटा कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. लाभार्थी कुटुंबातील प्रत्येक सदस्याला या वर्षी मार्चपर्यंत म्हणजेच पुढील तीन महिन्यांसाठी 5 किलो तांदूळ मिळणार आहे. 

प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना (PMGKY) अंतर्गत पुरवठा करण्यात आलेल्या तांदळातील सॉफ्टवेअर अपडेटमुळे मे 2021 ते डिसेंबर 2022 या कालावधीत 200 किलो ऐवजी 203 किलो तांदूळ देण्यात आला. म्हणजे 3 किलो जास्त तांदूळ दिला. त्यामुळे आता राज्य सरकारने जानेवारी ते मार्च या पुढील तीन महिन्यांसाठी दरमहा एक किलोग्रॅम कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. मिळालेल्या माहितीनुसार,  एप्रिलपासून शिधापत्रिका असलेल्या सर्व कुटुंबांना प्रति व्यक्ती 6  किलो तांदूळ वाटप पुन्हा सुरू होणार आहे. 54.48 लाख कुटुंबांना PMGKY अंतर्गत लाभ मिळत आहेत. 

कोविड-19 मध्ये रेशन….. (Ration in Covid-19.....)

कोविड-19 लॉकडाऊन कालावधीत केंद्र सरकारने शिधापत्रिकाधारकांना मोफत तांदूळ उपलब्ध करून दिला. त्याचबरोबर किराणा सुद्धा उपलब्ध करून दिला. दिवाळी सारख्या सणाला कमी किमतीमध्ये किराणा देखील सरकार कडून उपलब्ध करून दिला जातो. गरजू लोकांनाच रेशन मिळावे रेशनमध्ये होणारे फसवणुकीचे प्रकार बंद व्हावे या करिता देखील सरकारने तोडगा काढला. कोरोंना काळामध्ये विनामूल्य रेशन सरकार कडून देण्यात आले. प्रति व्यक्ति 5 किलो म्हणजेच 2 किलो गहू आणि 3 किलो तांदूळ. 

रेशन कार्ड 3 प्रकारचे असते? (Ration card is of 3 types?)

  • एपीएल रेशन कार्ड  (APL Ration Card)
  • बीपीएल रेशन कार्ड  (BPL Ration Card)
  • AAY रेशन कार्ड  (AAY Ration Card)

एपीएल रेशन कार्ड  (APL Ration Card)

तुम्ही एपीएल शिधापत्रिकेसाठी दारिद्र्यरेषेच्या वर असाल तर तुम्हाला दरमहा 15  किलो रेशन मिळेल.

बीपीएल रेशन कार्ड  (BPL Ration Card)

दारिद्र्यरेषेखालील लोकांना बीपीएल शिधापत्रिका दिली जाते, ज्याच्या मदतीने त्यांना तांदूळ, साखर, तेल यासोबतच दरमहा 25  किलो गहू मिळू शकतो.

AAY रेशन कार्ड  (AAY Ration Card)

दारिद्र्यरेषेखालील म्हणजेच अत्यंत गरिबीत जीवन जगत असलेल्या लोकांना AAY रेशनकार्ड दिले जाते, त्याअंतर्गत त्यांच्यासाठी 35  किलो गहू सोबत तांदूळ, साखर, तेल, डाळी इत्यादी दिले जाते.