Gold Investment: प्रत्येक जण काही न काही गुंतवणूक करीत असतो. शेअर्स, गोल्ड या व्यतिरिक्त अधिक काही बाबी आहेत ज्यात प्रत्येक जण इन्वेस्ट करतो. त्यावरून मिळणारा परतावा भरगोस असेल तर इन्वेस्ट करायला अधिक उत्साह येतो. तुमच्या लॉकरमध्ये पडलेल्या सोन्याचे मूल्य वाढले तर सोन्याची किंमत वाढते पण तुम्हाला व्याज देत नाही. त्याऐवजी तुम्हाला बँक लॉकरचे चार्ज भरावे लागते. आता तुमच्या निष्क्रिय सोन्यावर मूल्याच्या वाढीशिवाय व्याज मिळू शकते. ते कशाप्रकारे ते जाणून घेऊया.
Table of contents [Show]
गोल्ड मॉनेटायझेशन स्कीम (Gold Monetization Scheme)
तुम्ही निष्क्रिय सोने आरबीआयने नियुक्त केलेल्या बँकेत जमा करू शकता आणि त्यावर व्याज मिळवू शकता. ही सुविधा आरबीआयच्या गोल्ड मॉनेटायझेशन स्कीमअंतर्गत (Gold Monetization Scheme) उपलब्ध आहे. हे अगदी बँकेच्या मुदत ठेवीसारखे आहे जिथे तुम्ही तुमचे निष्क्रिय सोने बँकेत जमा करता आणि मुदतपूर्तीच्या वेळी तुम्हाला सोने किंवा सोन्याचे मूल्य त्यावर मिळणाऱ्या व्याजासह परत मिळते. सोन्याचे मूल्य परिपक्वतेच्या वेळी प्रचलित किंमतीवर आधारित असेल, परंतु व्याजाची गणना सोन्याच्या ठेव मूल्यावर केली जाईल. गोल्ड मॉनेटायझेशन स्कीम अंतर्गत मिळणाऱ्या कमाईला भांडवली नफा कर (Capital gains tax), संपत्ती कर आणि आयकर (REUTERS) मधून सूट देण्यात आली आहे. ही योजना फक्त आरबीआयने नियुक्त केलेल्या बँकांद्वारे ऑफर केली जाते. तुम्ही याला सोन्याची मुदत ठेव असेही म्हणू शकता.
किती वेळासाठी गुंतवणूक करू शकता? (How long can you invest?)
अल्पकालीन मुदतीची सरकारी ठेव - 1 ते 3 वर्षे
मध्यम मुदतीची सरकारी ठेव - 5-7 वर्षे
दीर्घकालीन सरकारी ठेव - 12-15 वर्षे
कोण गुंतवणूक करू शकतो? (Who can invest?)
- एखाद्या संस्थेतील निवासी भारतीय व्यक्ती या योजनेत गुंतवणूक करू शकते.
- गोल्ड एफडी (Gold FD) संयुक्त नावानेही उघडता येते.
- गुंतवणूकदार (investors) किमान 30 ग्रॅम सोने जमा करू शकतो. कमाल मर्यादा नाही.
- गुंतवणूकदार 1 ते 15 वर्षांमधील कोणतीही मुदत निवडू शकतात.
गोल्ड मॉनेटायझेशन स्कीमचे व्याजदर (Interest Rate of Gold Monetization Scheme)
वर्ष | व्याजदर |
1 वर्षासाठी | 0.50% |
1 ते 2 वर्षांपर्यंत | 0.55% |
3 वर्षांपर्यंत | 0.60% |
MTGD आणि LTGD | 2.25% |