Foreign Scholarships for Open Category : राज्याच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागातर्फे दर वर्षी खुल्या गटातील गुणवंत विद्यार्थ्यांना परदेशी शिक्षणासाठी शिष्यवृत्ती दिली जाते. परदेशातील विद्यापीठ, महाविद्यालयांचे संपूर्ण शैक्षणिक शुल्क, निर्वाह भत्ता आणि आरोग्य विमा असे या शिष्यवृत्तीचे स्वरूप आहे. राज्यातील खुल्या प्रवर्गातील 20 गुणवंत विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती योजना (Foreign Education Scholarships) वर्ष 2018 पासून दिली जाते.
वर्ष 2023-24 या शैक्षणिक वर्षाकरिता 12 जुलैपर्यंत अर्ज करण्याची मुभा देण्यात आली होती. आता त्याला मुदतवाढ दिली असून, 13 ऑगस्टपर्यंत विद्यार्थी अर्ज करू शकतात. या मुदतीपर्यंत ऑनलाईन भरलेल्या अर्जाची प्रत, आवश्यक प्रमाणपत्रे व कागदपत्रांसह सहसंचालकांकडे 14 ऑगस्ट पर्यंत सादर करणे अनिवार्य असणार आहे. ज्या उमेदवारांनी कला, वाणिज्य, विज्ञान व विधी शाखेतर्गत येणाऱ्या अभ्यासक्रमासाठी अर्ज केला आहे.
त्यांनी उमेदवार वास्तव्यास असलेल्या जिल्हाशी संबंधित सहसंचालक, विभागीय कार्यालय, उच्च शिक्षण येथे कागदपत्रे सादर करायचे आहेत. तर ज्या उमेदवारांनी व्यवस्थापन, अभियांत्रिकी, वास्तुकलाशास्त्र व औषधनिर्माणशास्त्र शाखेंतर्गत येणाऱ्या अभ्यासक्रमासाठी अर्ज केला आहे. त्यांनी उमेदवार वास्तव्यास असलेल्या जिल्हाशी संबंधित सहसंचालक, विभागीय कार्यालय, तंत्र शिक्षण येथे कागदपत्रे सादर करायचे आहेत.
Table of contents [Show]
शिष्यवृत्ती पात्रता काय?
- विद्यार्थ्यांचे पालक भारतीय नागरिक असावेत.
- तसेच महाराष्ट्राचा रहिवासी असावेत.
- 1जुलै रोजी उमेदवारांचे वय 35 वर्षापेक्षा जास्त नसावे.
- पीएचडीसाठी 40 वर्षे कमाल वयोमर्यादा आहे.
अर्ज कसा करावा?
- या संदर्भात उच्च तंत्र शिक्षण विभागाच्या संकेतस्थळावर जाहिरात उपलब्ध होते.
- विद्यार्थ्याने परदेश शिष्यवृत्ती योजना अर्ज या टॅबवर क्लिक करून अर्ज भरावा.
शिष्यवृत्तीसाठी अटी
विद्यार्थ्यांच्या कुटुंबाचे व विद्यार्थी नोकरी करीत असल्यास एकूण स्वत:चे उत्पन्न धरून सर्व मार्गांनी मिळणारे मागील आर्थिक वर्षातील उत्पन्न रुपये 20 लाखापेक्षा जास्त नसावे. विद्यार्थी किंवा पालक किंवा दोन्ही नोकरीत असल्यास आयकर विवरणपत्र, फॉर्म नं 16 व सक्षम प्राधिकारी यांच्याकडील मागील आर्थिक वर्षाचे कुटुंबाचे सर्व मार्गांनी मिळणाऱ्या उत्पन्नाचे प्रमाणपत्र. भारतातील मान्यताप्राप्त विद्यापीठांमधून किमान 60 टक्के गुणासंह पदवी परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी. पीएचडीसाठी किमान 60 टक्के गुणासह पदव्युत्तर पदवी किंवा पदव्युत्तर पदविका परीक्षा उत्तीर्ण असावी. या योजनेचा लाभ एकाच कुटुंबातील एका विद्यार्थ्यास फक्त एकदाच घेता येतो.
शिक्षणासाठी आवश्यक असलेला कालावधी किंवा त्यापूर्वीचा कालावधीपर्यंतच परदेशात राहण्याचे हमीपत्र राज्य शासन व परदेशातील भारतीय दूतावासास लिहून द्यावे लागते. परदेशी शैक्षणिक संस्थांकडून अनकंडिशनल ऑफर लेटर मिळालेले असेल, त्यांनाच ही शिष्यवृत्ती लागू आहे. अन्य अटी व शर्ती या सविस्तर उच्च व तंत्र शिक्षण विभाग, शासन निर्णय दिनांक 4 ऑक्टोबर 2018 मध्ये नमूद केल्याप्रमाणे लागू राहतील.
कोणकोणते लाभ मिळतात?
- विद्यापीठाने प्रमाणित केलेल्या शिक्षण शुल्काची पूर्ण रक्कम.
- विद्यापीठाच्या निकषानुसार वैयक्तिक आरोग्य विमा खर्च.
- विद्यार्थ्यास वार्षिक निर्वाह भत्ता परदेशातील संबंधित शैक्षणिक संस्थेने ठरवून दिलेल्या,
- किंवा भारत सरकारच्या DCPT विभागाने ठरवून दिलेल्या दराप्रामाणे राहील.
- ती रक्क्म निर्वाह भत्ता म्हणून लागू असेल.
- विद्यार्थ्यांना परदेशात जाताना व अभ्यासक्रम यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर परत येताना विमान खर्च लागू असेल.
 
     
     
                 
                                             
                                             
                                             
                                             
                                            