Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Education loan : माहित करून घ्या, ओबीसी विद्यार्थ्यांसाठी असलेल्या शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजनेबद्दल!

Education Loan Interest Repayment Scheme

Education loan : महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ यांच्यामार्फत विद्यार्थ्यांना (Student) शिक्षणासाठी बँकेमार्फत मिळणाऱ्या कर्जावरील व्याज उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने शैक्षणिक कर्ज (Education Loan) व्याज परतावा योजना राबविण्यात येत आहे.

Education Loan Interest Repayment Scheme : महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ यांच्यामार्फत राज्यातील इतर मागासवर्गीय (OBC) विद्यार्थ्यांना शैक्षणिक व आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे तसेच विद्यार्थ्यांना (Student) शिक्षणासाठी बँकेमार्फत मिळणाऱ्या कर्जावरील व्याज उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने शैक्षणिक कर्ज (Education Loan) व्याज परतावा योजना राबविण्यात येत आहे.

या महामंडळामार्फत राज्य, देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या इमाव प्रवर्गातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाकरिता बँकेमार्फत मंजूर केलेल्या 20 लाखापर्यंतच्या कर्जाच्या रकमेवरील व्याज परतावा महामंडळाकडून वितरीत केला जाईल. यासाठी राज्यांतर्गत व देशांतर्गत अभ्यासक्रमासाठी महत्तम कर्जमर्यादा रक्कम 10 लाख रुपये  व परदेशी अभ्यासक्रमासाठी महत्तम कर्ज मर्यादा 20 लाख रूपये आहे.

शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजनेसाठी पात्रता 

यासाठी अर्जदाराचे वय 17 ते 30 वर्षे असावे व तो इतर मागास वर्ग प्रवर्गातील, महाराष्ट्राचा रहिवासी असावा. अर्जदाराची कौटुंबिक वार्षिक उत्पन्न मर्यादा ग्रामीण व शहरी भागाकरिता 8 लाख रूपये पर्यंत असावी. या योजनेचा लाभ घेण्यासाठी केवळ पदवी व पदव्युत्तर शैक्षणिक अभ्यासक्रमाकरिता शासन मान्यता प्राप्त संस्थेमध्ये प्रवेश घेतलेले विद्यार्थी पात्र आहेत. त्यासाठी अर्जदार इयत्ता 12 वी 60 टक्के गुणांसह उत्तीर्ण असावा. तसेच पदवीच्या द्वितीय वर्ष व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणारे विद्यार्थी 60 टक्के गुणांसह पदविका (Diploma) उत्तीर्ण असावेत. पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी किमान 60 टक्के गुणांसह पदवी उत्तीर्ण असावा.

राज्य व देशांतर्गत अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांकरिता शैक्षणिक शुल्क, पुस्तके, साहित्य खरेदी व अर्जदाराच्या राहण्याचा व भोजनाचा खर्च समावेश राहील. परदेशी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्याकरिता फक्त शैक्षणिक शुल्क, पुस्तके, साहित्य खरेदीचा समावेश राहील. बँकेने मंजूर केलेली संपूर्ण कर्ज रक्कम अर्जदारास वितरीत केल्यानंतर अर्जदार व्याज परतावा योजनेसाठी पात्र राहील. महामंडळ केवळ बँकेकडुन वितरीत केलेल्या रक्कमेवरील जास्तीत जास्त 12 टक्के पर्यंत रक्कमेचा व्याज परतावा नियमित परतफेड करणाऱ्या लाभार्थींना करेल. व्याज परताव्यासाठी जास्तीत जास्त 5 वर्षे कालावधी ग्राह्य धरण्यात येईल.

शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजनेत लागणारी कागदपत्रे 

  • कास्ट सर्टिफिकेट 
  • उत्पन्नाचा दाखला
  • Domicile सर्टिफिकेट 
  • आधार कार्ड 
  • परीक्षा उत्तीर्ण झाल्याची गुणपत्रिका
  • पासपोर्ट साईज फोटो 
  • जन्माचा दाखला
  • शैक्षणिक फी सर्टिफिकेट 
  • शैक्षणिक शुल्कमाफी पात्रतेबाबतचे प्रमाणपत्र
  • मान्यताप्राप्त संस्थेत प्रवेश घेतल्याचा पुरावा
  • बँक खाते 
  • इतर आवश्यक पुरावे

अर्ज कसा करावा? 

शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजनेसाठी अर्ज करायचा असल्यास ओबीसी कर्मचारी संघाच्या वेबसाइटवर जाऊन अर्ज करू शकता. त्या अर्जामध्ये मागितलेली संपूर्ण माहिती व्यवस्थितरित्या भरा आणि अर्ज सबमिट करा. अधिक माहितीसाठी 8796455216 या नंबरवर कॉल करू शकता.

Source : obcadhikarikarmacharisangh.com