Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

3 Financial Reasons To Marry Early: लवकर लग्न करण्याची 3 आर्थिक कारणे जाणून घ्या

3 Financial Reasons To Marry Early

3 Financial Reasons To Marry Early: अनेकजण करियरमध्ये सेटल झाल्यानंतर लग्न करण्याचा विचार करतात. आर्थिक बाजू भक्कम असेल, तर लग्नासारखी मोठी जवाबदारी स्वीकारणं थोडं सोपं जातं. लवकर लग्न करण्याचे अनेक फायदे असतात. त्यातील आर्थिक फायदे समजून घेऊयात.

3 Financial Reasons to Marry Early: नेहमीच चर्चेत असणारा एकमेव विषय म्हणजे 'लग्न'(Wedding). लग्न कधी आणि कोणासोबत करावं, त्यासाठी योग्य वय काय? या प्रश्नावर सतत चर्चा होत असते. असं म्हणतात की, लग्न झालं की, जवाबदारी सोबत खर्चही वाढतो. याच गोष्टीमुळे अनेक जण सेटल झाल्यानंतर लग्नाचा विचार करतात.

थोडक्यात सेटल होणं म्हणजे चार पैसे पाठीशी असणं. अर्थात आर्थिक बाजू भक्कम असेल, तर लग्नासारखी मोठी जवाबदारी स्वीकारणं थोडं सोपं जातं. पण याउलट लवकर लग्न करण्याचे अनेक फायदे आहेत. हे फायदे शारीरिक, मानसिक आणि आर्थिक सुद्धा आहेत. आज आपण लवकर लग्न करण्याचे 3 आर्थिक फायदे जाणून घेऊयात.  

लग्न लवकर करण्याचे 3 आर्थिक फायदे

एकत्रित आर्थिक नियोजन (Joint Financial Planning)

लग्न झाल्यानंतर तुमचे आणि तुमच्या जोडीदाराचे उत्पन्न एकत्र झाल्यानंतर एक मोठी रक्कम तयार होते. या रकमेतून तुम्ही स्वतःचा व्यवसाय उभारू शकता किंवा तुमच्या स्वप्नातील घर खरेदी करू शकता. योग्य आर्थिक नियोजन (Financial Planning) करून तुम्ही गुंतवणूक देखील करू शकता. ही गुंतवणूक वेगवेगळ्या स्वरूपातील असू शकते. उदा. दीर्घकालीन गुंतवणुकीत (Long Term Investment) निवृत्तीचा विचार केला जाऊ शकतो. तर छोटी स्वप्नं साकार करण्यासाठी शॉर्ट टर्म पद्धतीची गुंतवणूक (Short Term Investment) करता येऊ शकते.

खर्च शेअर करणे (Shared Expenses)

लग्नानंतर खर्च वाढतो असे आपण ऐकले आहे आणि ते काही अंशी खरं सुद्धा आहे. पण लग्न झाल्यानंतर तुमचे खर्च तुम्ही जोडीदारासोबत विभागून (Shared Expenses) घेऊ शकता. घरातील छोटेमोठे खर्च, वाण-सामानाचे बिल, घरासाठी घेतलेली कर्जाची रक्कम तुम्ही जोडीदारासोबत विभागून घेत कर्जाची परतफेड लवकरत लवकर करू शकता. त्यामुळे कर्जाचा अतिरिक्त ताण एका व्यक्तीवर पडत नाही.  

याशिवाय कौटुंबिक विमा खरेदी केला, तर तो प्रत्येकाच्या वैयक्तिक विम्यापेक्षा (Personal Insurance) स्वस्तात मिळू शकतो. खर्च एकमेकांसोबत शेअर केल्याने कोणाही एकावर आर्थिक जबाबदारीचा भार पडत नाही. यामुळे मानसिक शांतता तर लाभतेच, सोबत जास्तीत जास्त गुंतवणूक करणे सहज शक्य होते.

कर लाभ (Tax Benefit)

तुम्हाला हे पटणार नाही, पण लग्नानंतर तुम्ही कर लाभ (Tax Benefit) देखील घेऊ शकता. नवरा बायकोने मिळून घेतलेले गृहकर्ज हे जॉईंट होम लोन (Joint home loan) अंतर्गत येते. याचा फायदा असा की, दोन्ही व्यक्ती वेगवेगळा कर लाभ घेऊ शकतात. दोन्ही कर्जदार म्हणजे नवरा बायको इन्कम टॅक्स कायद्याच्या कलम 24b अंतर्गत दरवर्षी 2 लाख रुपयांपर्यंत कर वजावट मिळवू शकतात.