Kawasaki Big Offer: नवीन वर्षात बाइक खरेदी करण्याचा प्लॅन असेल, तर तो लगेच रद्द करा. कारण सरत्या वर्षाच्या शेवटी कावासकी कंपनीने खास बाइक प्रेमींसाठी डबल धमाका ऑफर आणली आहे. त्यामुळे ऑफरमध्ये बाइक खरेदी करण्यास बिलकुल उशीर करू नका. ही ऑफर काय आहे व या ऑफरचा कालावधी काय आहे थोडक्यात जाणून घेऊयात.
Table of contents [Show]
काय आहे ऑफर (Kawasaki Offer)
कावासकी कंपनीने दोन बाइकवर ऑफर जाहीर केली आहे. एक म्हणजे कावासकी निंजा 300 या बाइकवर कंपनीने 10 हजार रूपयांचा डिस्काउंट दिला आहे. तर दुसरी बाइक कावासकी झेड 650 या बाइकवर कंपनी चक्क 35 हजार रूपयांचा डिस्काउंट देत आहे. त्यामुळे त्वरित या शानदार ऑफरचा लाभ घ्या व नवीन वर्ष आनंदात साजरे करा.
ऑफर कालावधी
बाइकवर ही धमाकेदार ऑफर साधारण 21 डिसेंबर ते 31 डिसेंबर आहे. या कमी कालावधीत आपण आपल्यासाठी अगदी मोठा आनंद लुटू शकता. या दोन्ही ऑफरचा लाभ आपण कावासकी डीलरशीपवर जाऊन घेऊ शकता म्हणजेच ऑफरमध्ये गाडी बुक करू शकता..कावासाकी निंजा 300 यावर्षी एप्रिलमध्ये 3.37 लाख रुपयाच्या किंमतीत लाँच करण्यात आली होती. यानंतर या बाइकच्या किंमतीत 3 हजार रूपयांची वाढ केली होती. आता, या बाइकची एक्स शोरूम किंमत 3.40 लाख रूपये आहे
कावासाकी निंजा 300 चे फीचर्स
कावासाकी निंजा 300 मध्ये 296 सीसीचे पॅरेलल ट्विन, लिक्विड कूल्ड, 4 स्ट्रोक, फ्युएल इंजेक्टर इंजिन आहे. हे इंजिन 11,000 आरपीएमवर 38.4 बीएचपीचे पॉवर व 10 हजार आरपीएमवर 26.1 एनएमचे पीक टॉर्क जनरेट करते. इंजिनला 6 स्पीड मॅन्यूअल गिअरबॉक्सशी जोडण्यात आले आहेत. बाइकमध्ये सेमी डिजिटल इंस्ट्रूमेंट क्लस्टर दिले आहे. यात 37 एमएम टेलिस्कोपिक फ्रंट फोर्क्स दिले आहे. ब्रेकिंगसाठी या बाइकमध्ये ड्युअल चॅनेल एबीएस सोबत दोन्ही व्हीलवर पेडल डिस्क ब्रेक मिळते.
कावासाकी झेड 650 चे फीचर्स
कावासाकी झेड 650 मध्ये 649 सीसी पॅरेलल ट्विन, लिक्विड कूल्ड इंजिन दिले आहे. हे इंजिन 8 हजार आरपीएमवर 67 बीएचपीचे पॉवर आणि 6700 आरपीएमवर 64 एनएमचे पीक टॉर्क जनरेट करते. ट्रान्समिशनसाठी बाइक मध्ये 6 स्पीड गियर बॉक्सशी जोडले आहे. बाइकमध्ये फ्रंट आणि रियर डिस्क ब्रेक सोबत अँटी लॉकिंग ब्रेकिंग सिस्टम दिली आहे. या बाइकचे वजन 191 किलो असून 15 लिटर पेट्रोलची टाकी दिली आहे. या बाइकची एक्स शोरूम किंमत 6.43 लाख रुपये असून ही बाइक ग्राहकांमध्ये लोकप्रिय आहे.