Covid Variant: चीनमध्ये कोरोना रूग्णांच्या संख्येत पुन्हा एकदा झपाट्याने वाढ होऊ लागली. त्या पार्श्वभूमीवर G20 मध्ये प्रथमच फायनान्स आणि हेल्थ टास्क फोर्सची एकत्रित बैठक घेण्यात आली. या बैठकीला G20 चे प्रतिनिधित्व करणाऱ्या देशांतील फायनान्स आणि हेल्थ सेक्टमधील प्रतिनिधी उपस्थित होते. तसेच केंद्र सरकार आणि राज्य सरकारनेही कोरोना रूग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन टास्क फोर्सची स्थापना केली.
इतर देशात विशेषत: चीन आणि अमेरिका या देशांमध्ये कोरोना रूग्णांची संख्या वाढत असताना केंद्र सरकारने सर्व राज्यांना खबरदारीच्या सूचना घेण्यास सांगितले. संसदेतही लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला आणि राज्यसभेचे चेअरमन जगदीप धनकर यांनी सभागृहात मास्क वापरण्यास सुरूवात केली. काही खासदारही सभागृहात मास्क घालून आले होते. तसेच महाराष्ट्रातही सरकारने कोरोनाचा नवीन व्हेरिएंटबाबत आणि त्या रूग्णांची संख्या वाढत असल्याचे लक्षात घेऊन या नवीन व्हेरिएंटबाबत माहिती घेण्यासाठी राज्य सरकार केंद्र सरकारसोबत समन्वय साधण्यासाठी एक समन्वय समिती आणि टास्क फोर्सची स्थापना करणार असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात सांगितले.
फायनान्स आणि हेल्थ सेक्टर टास्क फोर्स!
G20चे सदस्य असलेल्या देशांनी कोरोनाच्या वाढत्या रूगणांची संख्या गांभिर्याने घेत यावर तातडीने टास्कफोर्सची बैठक घेतली. या बैठकीच्या माध्यमातून कोरोनाच्या काळात देशाची अर्थव्यवस्था आणि आरोग्य व्यवस्था कशाप्रकारे असावी, याबाबत चर्चा झाल्याची शक्यता आहे. कारण कारण 2019 चा अनुभव बऱ्याच देशांना असल्याने, त्यावेळी अनेक देशांच्या अर्थव्यवस्थेवर आणि आरोग्य व्यवस्थेवर ताण आला होता.
जर संपूर्ण जगभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला तर पुन्हा लॉकडाऊन होण्याची शक्यता आहे. यामुळे पुन्हा उद्योगधंदे, कारखाने बंद केले जाऊ शकतात. यामुळे काही जणांच्या नोकरीवर गदा येऊ शकते. काही व्यवसाय पूर्णपणे करावे लागू शकतील. या शक्यता लक्षात घेऊन स्थिती उद्भवू यासाठी आताच उपाययोजना करणे गरजेचे आहे.
केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉक्टर मनसुख मांडविया यांनी चीन आणि अमेरिकामध्ये कोरोनाच्या रूग्णांच्या संख्येत होत असलेल्या वाढीच्या पार्श्वभूमीवर देशातील विविध राज्यांशी चर्चा करून त्यांना यावर देखरेख आणि प्रतिबंध आणण्यासाठी सूचना दिल्या आहेत. केंद्र सरकारने यासाठी एक उच्चस्तरीय समिती तयार केली आहे. या समितीत केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. मनसुख मांडविया, राज्यमंत्री डॉ. भारती पवार, नीती आयोगाचे आरोग्य सदस्य डॉ. व्ही. के. पॉल, संबंधित विभागाचे सचिव आणि इतर वरिष्ठ अधिकारी यांचा यात समावेश आहे.
संसदेत सभागृहाच्या कामकाजाला सुरूवात होण्यापूर्वी लोकसभा अध्यक्षांनी सर्व खासदारांना मास्क घालण्यास सांगून कोविडची संभाव्य परिस्थिती लक्षात घेऊन सभागृहातील नियम पाळावेत, अशा सूचना दिल्या आहेत.