Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

नोकरी करायची की व्यवसाय? जाणून घ्या दोन्ही बाजू!

नोकरी करायची की व्यवसाय? जाणून घ्या दोन्ही बाजू!

शिक्षण पूर्ण झाल्यानंतर सर्वानाच पडणारा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे नोकरी करावी की व्यवसाय? नोकरी काय किंवा व्यवसाय काय यातील काहीही करायचं झालं तर दोन्हीचे फायदे आणि तोटे आहेत.

शिक्षण पूर्ण झाल्यानंतर सगळ्याच तरुणांना किंवा त्यांच्या पालकांच्या मनात येणार प्रश्न म्हणजे आता पुढे काय. नोकरी की व्यवसाय. सर्वसामान्य घरात नोकरीला प्राधान्य दिलं जातं. आईवडील व्यावसायिक असतील तर आपल्या मुलाने किंवा मुलीने आपला व्यवसाय पुढे सांभाळावा, अशी पालकांची अपेक्षा असते. या दोन्ही प्रकारांवर सर्वच प्रकारच्या कुटुंबात दीर्घ चर्चा केली जाते. जर आपण सर्वसामान्य कुटुंबातून असाल तर आधी व्यवसायाचे गणित समजेपर्यंत नोकरी करणे व्यवहार्य ठरू शकते. प्रत्येक नाण्याच्या जशा दोन बाजू असतात. तसेच व्यवसाय आणि नोकरी दोन्हीचे फायदे आणि तोटे आहेत.


नोकरी का करावी?

जर तुमचे शिक्षण नुकतेच पूर्ण झाले आहे; आणि तुम्ही विचार करत आहात की नोकरी करू की व्यवसाय? अशावेळी मध्यमवर्गीय कुटुंबातून भविष्यातील गरजांचा पाढा वाचला जातो. तसेच भविष्यात येणाऱ्या खर्चाचे आकडे डोळ्यासमोर फेर धरू लागतात. अशावेळी आपण साहजिकच नोकरीचा विचार करतो. यामुळे आपल्या हातात महिन्याला ठराविक रक्कम येत असते. पण जर तुम्हाला भविष्यात तुमचा काही व्यवसाय सुरु करायचा असेल तर नोकरीतून येणाऱ्या मासिक पगारातून काही ठराविक रक्कम गुंतवून भविष्यात व्यवसायाचा विचार करू शकता. कारण व्यवसाय छोटा किंवा मोठा सुरु करायचा झाला तरी हातात भांडवल असणे गरजेचे आहे. यासाठी नोकरी करणे गरजेचे आहे. आता पाहुया नोकरी करण्याचे फायदे आणि तोटे.   

नोकरी करण्याचे फायदे 

  • वेळेवर पगार मिळतो.
  • ऑफिसच्या वेळेपुरतेच काम करावे लागते.
  • सुट्ट्या आनंदात घालवायला मिळतात.
  • नफा-तोटा यांच्याशी सामना करावा लागत नाही.
  • कंपनीकडून अनेक सुविधा सुद्धा मिळतात.


नोकरी करण्याचे तोटे

  • दुसर्‍यांसाठी काम करावे लागते.
  • सुट्टी मागावी लागते.
  • नोकरीवरून काढून टाकण्याची भीती असते.
  • नोकरीच्या पैशांतून मोठ्या गरजा भागवता येत नाही.
  • पैशांची वाढ खूप कमी असते.

disadvantage of jobs

व्यवसाय का करावा! 

अनेक वेळा नोकरदार व्यक्ती कंपनीच्या कामाला कंटाळून व्यवसाय करण्याचा विचार करतो. पण जर तुमच्याकडे आर्थिक पाठबळ असेल आणि व्यवसायाची काही कल्पना असेल तरंच व्यवसायाचा विचार करावा. सध्या व्यवसायासाठी सरकारच्या अनेक योजना, कर्ज सुविधा आहेत.  यांचा लाभ घेऊन अनेक व्यक्ती यशस्वी उद्योजक झाले आहेत. नोकरीच्या तुलनेत व्यवसायात आर्थिक फायदा जास्त होतो: पण त्याचबरोबर कधीकधी तोटाही सहन करावा लागतो. आता पाहुयात व्यवसाय करण्याचे फायदे आणि तोटे.   

व्यवसाय/उद्योग करण्याचे फायदे 

  • वेळेचे बंधन नसते.
  • नोकरीवरून काढून टाकण्याची भीती नसते.
  • स्वतःच स्वतःचा मालक असतो.
  • मोठ्या गरजा भागवता येतात.
  • कधीही कामापसून सुट्टी घेता येते.
  • गरजा पूर्ण करून सुद्धा पैसे वाचवता येतात.

disadvantage of business

व्यवसाय/उद्योग करण्याचे तोटे

  • कधीही तोटा सहन करावा लागू शकतो.
  • उद्योगात स्पर्धा अधिक असते. 
  • उत्पन्नात नेहमी चढ उतार असतो.
  • जोखीम घ्यावी लागते.
  • भरपूर पैशांची गुंतवणूक करावी लागते.
  • कामकाजाच्या जबाबदर्‍या वाढतात.
  • काम करण्याची वेळ ठरलेली नसते.


हे आहेत नोकरी व व्यवसाय करण्याचे फायदे आणि तोटे. जर तुम्हाला महिन्याला एक ठराविक रक्कम हातात असणे गरजेचे असेल तर नोकरी करणे सोईचे ठरू शकते. कारण व्यवसायात महिन्याला मिळणारे आर्थिक उत्पन्नाचे प्रमाण ठरलेले नसल्याने अडचणींचा सामना करावा लागू शकतो.