Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

सरकारी नोकरी कशी मिळू शकते? Government Jobs

सरकारी नोकरी कशी मिळू शकते? Government Jobs

पूर्वी सरकारी नोकरीत असणं म्हणजे खूप प्रतिष्ठेचं मानलं जायचं. खाजगी नोकरी कितीही पगाराची असली तरी त्याची शाश्वती नसते. सरकारी नोकरीत मात्र शाश्वती असते. त्यामुळे कसलंही काम असलं तरी सरकारी नोकरी मिळावी अशी अनेकांची अपेक्षा असते.

पूर्वी सरकारी नोकरीत असणं म्हणजे खूप प्रतिष्ठेचं मानलं जायचं. खाजगी नोकरी कितीही पगाराची असली तरी त्याची शाश्वती नसते. सरकारी नोकरीत मात्र शाश्वती असते. त्यामुळे कसलंही काम असलं तरी सरकारी नोकरी मिळावी अशी अपेक्षा असते. सरकारी नोकरीच्या जाहिराती कधी येऊन जातात हे अनेकदा बऱ्याच तरुणांना कळतही नाही. सरकारच्या वेगवेगळ्या विभागात अनेक पदे टप्प्याटप्प्याने रिकामे होत असतात. त्याबदल्यात नवीन भरती केली जाते. यामध्ये दहावी पास झालेल्या उमेदवारापासून आयटीआय (ITI) केलेले ते इंजिनिअरिंग केलेल्यांना सरकारी नोकरी मिळू शकते. 

लोकसेवा आयोग (UPSC) आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC), स्टाफ सिलेक्शन (Staff Selection), बँकिंग (Banking), रेल्वे (Railway), पोस्ट ऑफिस (Indian Post), संरक्षण दल (Defence), एलआयसी (LIC) अशा विविध संस्थामार्फत सरकारी नोकरीच्या जाहिराती वेळोवेळी प्रसिद्ध केल्या जातात. या संस्था जाहिरात प्रसिद्ध केल्यानंतर उमेदवारांची लेखी परीक्षा व मुलाखतीद्वारे सदर जागेसाठी निवड करतात. सरकारी नोकरीच्या जाहिराती वर्तमानपत्राद्वारे, तसेच सरकारी संकेतस्थळांवर प्रसिद्ध केल्या जातात. रेल्वे स्थानकावरील पेपर स्टॉल, पुस्तकांच्या दुकानात सरकारी नोकरीच्या जाहिराती आणि फॉर्म विक्रीसाठी उपलब्ध असतात. 

स्पर्धा परीक्षांमधून सरकारी नोकरीची संधी मिळते. दहावी आणि बारावीनंतरही अनेक सरकारी खात्यांमध्ये नोकरीच्या संधी असतात. सुरुवातीला अगदी छोट्या पदाची संधी असली तरी विभागीय परीक्षा देऊन प्रमोशन घेता येतं. एमपीएससी यूपीएससी व्यतिरिक्त पदवी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी बँकिंग क्षेत्रातील स्टेट बॅंक ऑफ इंडिया, रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडिया, इंडियन पोस्ट पेमेंट्स बॅंक, नाबार्ड, आआयबीएफ यांच्या परीक्षा देऊन सरकारी नोकरी मिळवू शकतात. सैन्यदलात जाण्यासाठी कंबाईन डिफेन्स सर्व्हिस,  इंडियन इकॉनॉमिक सर्व्हिस, इंजिनिअरिंग झाली असेल तर इंडियन इंजिनिअरिंग सर्व्हिसच्या परीक्षांद्वारे सरकारी नोकरी मिळवता येते.

तरुणांना विविध प्रकारच्या रोजगारा संदर्भात माहिती मिळावी, यासाठी केंद्र आणि महाराष्ट्र सरकारने जॉब पोर्टल सुरु केले आहेत. केंद्र सरकारने नॅशनल करिअर सर्व्हिस तर महाराष्ट्र सरकारने महाजॉब्स पोर्टल  सुरु केले आहे. यामध्ये विविध प्रकारच्या नोकऱ्यांचे अपडेट दिले जातात. या संकेतस्थळांवर तुम्ही तुमच्या शैक्षणिक आणि कामाच्या  अनुभवानुसार नोकरीचे पर्याय शोधू शकता. यासाठी तुम्हाला पोर्टलवर नोंदणी करावी लागेल. नोंदणी केल्यानंतर तुम्हाला एसएमएस (SMS) आणि ईमेलच्या (Email) माध्यमातून नोकरीच्या संधीचे अपडेट कळवले जातात.