Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

ग्रामीण भागात कमी पैशात कोणता व्यवसाय करू शकतो?

ग्रामीण भागात कमी पैशात कोणता व्यवसाय करू शकतो?

ग्रामीणभागात नोकरीच्या संधी शहराच्या तुलनेत फार कमी असतात. नोकरी करायची झाल्यास तालुक्याच्या किंवा शहराच्या ठिकाणे जावे लागते. जर आपण आपल्या गावात कोणत्या गोष्टीची कमी आहे हे जाणून तो व्यवसाय केला तर, गावाचा आणि तुमचाही फायदा होऊ शकतो.

ग्रामीणभागात नोकरीच्या संधी शहराच्या तुलनेत फार कमी असतात. नोकरी करायची झाल्यास तालुक्याच्या किंवा शहराच्या ठिकाणे जावे लागते. जर आपण आपल्या गावात कोणत्या गोष्टीची कमी आहे हे जाणून तो व्यवसाय केला तर, गावाचा आणि तुमचाही फायदा होऊ शकतो. व्यवसाय म्हटले की भांडवल आले. आपल्याकडे खूप पैसे असतील तरच आपण व्यवसाय करू शकतो, असा काही जणांचा समज असतो. तर काहींना व्यवसाय करण्याची भीती वाटत असल्याने आपण नोकरी केलेलीच बरी असे वाटते.

व्यवसाय हा व्यवसाय असतो. लहान आणि मोठं असं काही नसतं. कारण आज लहान व्यवसायातून सुरुवात केली तरच पुढे व्यवसाय मोठा करण्याची संधी मिळते. ग्रामीण भागात आपण खूप असे लहान आणि कमी भांडवलात व्यवसाय सुरू करू शकतो. तसेच शेतकरीही आपल्या शेतीला जोडधंदा म्हणून व्यवसाय करू शकतात. ग्रामीण भागात पिकवल्या जाणाऱ्या  भाजीपाल्याला शहरात मोठी मागणी असते. स्वतःच्या शेतातील माल शेतकरी थेट ग्राहकांच्या दाराशी आणून विकू शकतो. तसेच शेतकरी जर कोंबडी, गाय पळत असतील तर यातूनही रोजचा खर्च निघू शकतो. तसेच आपल्या पिकासोबत शेताच्या बाजूला भाजी लावून त्यातूनही आपला भाजीचा व्यवसाय सुरु करू शकतो. याशिवाय ग्रामीण भागात आपण कमी पैशात आणखी कोणते व्यवसाय सुरू करू शकतो हे पाहुयात.

छोटेखानी हॉटेल

गावात मोक्याचं ठिकाण पाहून सुरुवातीला चहाचा व्यवसाय सुरु करू शकता. यात गुंतवणूक कमी आहे आणि पैसे बऱ्यापैकी मिळतात. तसेच चहाची विक्री पाहून तुम्ही हळुहळु नाष्ट्याचे पदार्थ किंवा स्नॅक्स ठेवू शकता. जर तुमच्या गावाजवळूनच महामार्ग (हायवे) जात असेल किंवा जवळच कारखानना असेल तर जेवणाची थाळीही तुम्ही ठेऊ शकता.

तयार कपड्याचे किंवा फॅन्सी दागिन्यांचे दुकान

मुंबई, गुजरात अशा शहरांमध्ये तयार कपडे आणि फॅन्सी दागिने व इतर वस्तू होलसेल भावापेक्षाही स्वस्त मिळतात. ते आणून तुम्ही गावात व्यवसाय सुरु करू शकता. हा व्यवसाय सुरु करताना तुम्हाला एक खबरदारी घ्यावी लागेल की, हे कपडे अधिक महाग नसावेत. गावातील लोक या वस्तू घेऊ शकतील, त्यांना परवडेल अशाच त्याच्या किमती असाव्यात.

स्टेशनरी दुकान

स्टेशनरीच्या दुकान हे कधीही तोट्यात जात नाही. गावात शाळा किंवा महाविद्यालयाच्या आसपास तुम्ही स्टेशनरीचे दुकान सुरु करू शकता. तसेच या दुकानात झेरॉक्स मशीन सुद्धा ठेऊ शकता. यासाठी एक गाळा आणि साहित्यासाठी लागणारे भांडवल आवश्यक आहे.

ब्युटी पार्लर

जर तुमच्याकडे सौंदर्यप्रसाधन या व्यवसायाचे ज्ञान असेल तर तुम्ही हा व्यवसाय राहत्या घरातून देखील सुरु करू शकता. तसेच या संबंधीचे क्लासेस सुद्धा घेऊ शकता. यासाठी आवश्यक साहित्य हे होलसेल भावात शहराच्या ठिकाणी उपलब्ध होते.

इन्व्हर्टर आणि बॅटरीजचे दुकान

गावाच्या ठिकाणी लोडशेडिंगची मोठी समस्या असते. अशा ठिकाणी इन्व्हर्टर आणि बॅटरीचे दुकान कायम नफ्यात चालू शकते. इन्व्हर्टर आणि बॅटरी विकण्यासोबत त्याची सर्व्हिसिंग आणि मेन्टेनन्सची सेवा दिली तर त्यातूनही चांगले पैसे मिळू शकतात.

पिण्याचे शुद्ध पाणी विकणे

ग्रामीण भागात उन्हाळा आणि पावसाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी फार वणवण करावी लागते. उन्हाळ्यात तापमान वाढल्याने पाणी मिळत नाही तर पावसाळ्यात अनेकदा अशुद्ध पाणी मिळतं. यासाठी तुम्ही शुद्ध केलेलं पाणी मोठ्या जारमध्ये किंवा बाटलीत भरून विकू शकता. तसेच तुमच्याकडे स्वत:ची जागा असेल आणि पाणी शुद्धीकरणाची मशीन असेल तर तुम्ही पाणी शुद्धीकरणाचा प्लांट सुरू करू शकता.

दुधाची विक्री

गावच्या ठिकाणी आता दुभती जनावरे कमी झाली आहेत. अशा वेळी गावातील लोकांना किंवा तेथील दुकानदारांना पिशवीतून पाश्चराईज्ड केलेले दूध पुरविण्याचा व्यवसाय करू शकता. अमूल, वारणा, गोकुळ, यासारखे मोठे उत्पादक अशा संधी देतात.

बेकरी

ग्रामीण भागात बेकरी व्यवसायही चांगला चालू शकतो. यात तुम्ही स्वतः बनवलेले बेकरी प्रॉडक्ट ठेऊ शकता किंवा बाहेरून खरेदी केलेले प्रॉडक्ट ही ठेवू शकता.

शैक्षणिक क्लासेस

जर तुमच्याकडे पदवी आणि पदव्युत्तर शिक्षणाची डिग्री असेल आणि शिकवण्याची आवड व अनुभव असेल तर तुम्ही तुमच्या गावात क्लासेस सुरु करू शकता. क्लासेस सुरू करण्यासाठी मोठ्या भांडवलाची गरज लागत नाही.

खेळण्याचे दुकान आणि गिफ्ट शॉपी

खेळण्याचे दुकान आणि गिफ्ट शॉपीमध्ये तुम्ही तुमच्या भांडवलानुसार आणि गावातील लोकांना परवडतील अशी खेळणी आणि भेटवस्तू, शोभेच्या वस्तू ठेऊ शकता.

टेलरिंग

तुम्हाला जर टेलरिंगचे ज्ञान असेल तर छान असे फॅशनेबल कपडे तुम्ही शिवू शकता. यात कपडे शिवायची मशीन हा एकदाच मोठा खर्च करावा लागतो. या व्यवसायात तुम्ही तुमच्या कौशल्याच्या जोरावर पैसे कमवू शकता. शिवणकामासोबत भरतकाम येत असेल तर त्यालाही चांगली मागणी आहे.

जर आपल्याला व्यवसायच करायचा आहे तर खूप संधी आहेत. त्यातील कोणत्या संधीच आपण सोनं करू शकतो ते आपल्यावर आहे. राहिला प्रश्न भांडवलाचा त्यासाठी बँक किंवा सरकारच्या कर्ज योजनेचा आपण लाभ घेऊ शकतो.