Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Indeed layoffs: अमेरिकेतील 'इंडिड'ची नोकर कपात, जॉब देणाऱ्या कंपनीतीलच 2200 कर्मचाऱ्यांवर नोकरी गमावण्याचे संकट!

Indeed layoffs

Image Source : www.playstore.com

Indeed layoffs : नोकर कपातीच्या मोहीमेत आता इंडिड कंपनी सुद्धा सामील झाली आहे. नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांना संधी देणाऱ्या इंडिडमधील 2200 कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर गदा आली आहे. कंपनीने 15% कर्मचारी कमी करण्याचा निर्णय घेतला. कंपनीतील प्रत्येक विभागात मनुष्यबळ कमी करण्यात आल्याची माहिती इंडिडचे सीईओ ख्रिस हेम्स यांनी दिली.

नोकरीची संधी देणाऱ्या इंडिड कंपनीने कर्मचारी कपातीची घोषणा केली आहे. (Job listing platform Indeed lays off 2,200 employees) ट्विटर,  मेटा, अॅमेझॉन, मायक्रोसॉफ्ट, गुगल,झूम, याहू यासारख्या बड्या कंपन्यांप्रमाणेच इंडिड 15% कर्मचाऱ्यांना कामावरुन काढून टाकणार आहे. इंडिड ही अमेरिकेतील आघाडीचे जॉबसर्च  प्लॅटफॉर्म आहे.

अमेरिकेत महागाई आणि मंदीने कहर केला आहे. बड्या कॉर्पोरेट्सने खर्च कमी करण्यासाठी नोकर कपातीचा धडाका लावला आहे. वर्ष 2022 च्या दुसऱ्या सहामाहीत कंपन्यांनी नोकर कपात सुरु केली होती. ती वर्ष 2023 मध्ये सुरुच आहे.  जानेवारी 2023 मध्ये जगभरातील जवळपास 85000 कर्मचाऱ्यांनी नोकरी गमावली. फेब्रुवारी 2023 मध्ये 36500 कर्मचारी बेरोजगार झाले.यात प्रामुख्याने माहिती तंत्रज्ञान तसेच बड्या टेक कंपन्यांनी हजारो कर्मचाऱ्यांना घरी पाठवले आहे. कोविड संकट आणि रशिया-युक्रेन युद्धाने जगभरात मंदीचा प्रभाव वाढला आहे. वर्ष 2023 आणि 2024मध्ये आयटी आणि टेक कंपनीच्या महसुलात मोठी घसरण होण्याचा अंदाज विविध संस्थानी व्यक्त केला आहे.

दरम्यान, या नोकर कपातीच्या मोहीमेत आता इंडिड कंपनी सुद्धा सामील झाली आहे. नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांना संधी देणाऱ्या इंडिडमधील 2200 कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर गदा आली आहे. कंपनीने 15%  कर्मचारी कमी करण्याचा निर्णय घेतला. कंपनीतील प्रत्येक विभागात मनुष्यबळ कमी करण्यात आल्याची माहिती इंडिडचे सीईओ ख्रिस हेम्स (Indeed CEO Chris Hyams) यांनी दिली. विशिष्ट विभागात कोणी राहावे आणि कोणाला कमी करावे हा कटु निर्णय अत्यंत काळजीपूर्वक घेण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.इंडिडचे एकूण 14600 कर्मचारी आहेत. त्यातील 2200 कर्मचाऱ्यांना कमी केले जाणार आहे.

काटकसर करत सीईओंनी वेतनाला लावली कात्री  

कंपनीचा खर्च कमी करण्यासाठी इंडिडच्या व्यवस्थापनाने नोकर कपातीचा कटु निर्णय घेतला. त्याचबरोबर इंडिडचे सीईओ ख्रिस हेम्स यांनी मूळ वेतनात स्वेच्छेने 25% कपात केली आहे. हेम्स यांना 16 आठवड्यांची बेसिक सॅलरी किंवा वर्षातील दोन आठवड्यांचा पगार त्यांच्या सॅलरी पॅकेजमध्ये देण्याची घोषणा कंपनीने केली आहे.

Amazon ने 9000 कर्मऱ्यांना कमी केले

काही दिवसांपूर्वी मेटाने (Meta) 10000 कर्मचाऱ्यांना कामावरुन कमी केले होते. याआधी Amazonने 18000 कर्मचाऱ्यांना कमी केले होते. कर्मचारी कमी करण्याची ही दुसरी वेळ होती. टेक कंपन्यांची वाढती नोकर कपात अनेकांसाठी डोकेदुखी ठरली. यामुळे अनेकांना नोकरीवर गदा येण्याची शक्यता आहे. गेल्या तीन महिन्यात कंपनीने एकूण 27000 कर्मचारी कपात केली आहे. AWS (Amazon Web Services) व ट्विच  विभागात ही 9000 कर्मचारी कपातीची प्रक्रिया सुरू झाली आहे. जाहिरात क्षेत्रातील कर्मचाऱ्यांचा यात समावेश असेल.  

(News Source : Forbes, Business World)