भारतीय व्यवसाय क्षेत्राचा विचार केल्यास, रिलायन्स इंडस्ट्रीजचे मालक आणि भारतातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani, Industrialist) यांच्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. रिफायनिंग, तेल आणि वायू, पेट्रोकेमिकल्स, दूरसंचार, रिटेल आणि मीडिया यासारख्या भारतीय अर्थव्यवस्थेतील काही महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये त्यांनी आपल्या कामगिरीचा ठसा उमटवला आहे. वर नमूद केलेल्या क्षेत्रातील महसूल, नफा आणि बाजारातील वाटा यातील वाढ पाहून, मुकेश अंबानी आता JioMart नावाच्या त्यांच्या नवीन उपक्रमाद्वारे ई-कॉमर्समध्ये आपला हात आजमावण्यासाठी तयार आहेत. त्यामुळे ई-कॉमर्स क्षेत्रात दबदबा असलेल्या अँमेझॉन (Amazon) आणि फ्लिपकार्टशी (Flipkart) जिओ मार्टची थेट स्पर्धा होणार आहे. तर JioMart म्हणजे नक्की काय? ते कसे कार्य करते? ते आज आपण पाहणार आहोत.
JioMart - हे कसे कार्य करते? (JioMart - How does it work?)
JioMart हे एक ऑनलाइन किराणा दुकान आहे. हे एक्सप्रेस डिलिव्हरी प्रणालीचा वापर करत ग्राहकांच्या दारात 50,000 हून अधिक किराणा उत्पादने सवलतीच्या दरात पुरवते. ऑन-डिमांड मॉडेल या सूत्राने जिओ मार्ट चालते. कंपनी गोदामांची व्यवस्था टाळेल आणि त्याऐवजी स्थानिक किरकोळ विक्रेत्यांशी भागीदारी करेल. हे किरकोळ विक्रेते किराणा मालाचे उत्पादन घेतील आणि ते ग्राहकांपर्यंत पोहोचवतील. चीनमधील अलिबाबा या कंपनीच्या कार्यपद्धतीनुसार स्थानिक दुकानदारांना ऑनलाइन टू ऑफलाइन बाजारपेठ उपलब्ध करण्याचे काम रिलायन्स जिओ मार्ट करणार आहे. जानेवारी 2020 मध्ये JioMart ने ग्राहकांना सेवा देण्यास सुरुवात केली. सध्या नवी मुंबई, ठाणे आणि कल्याण या ठिकाणी कंपनीची सेवा कार्यरत आहे. कंपनी लवकरच भारतातील इतर भागांमध्ये आपली सेवा सुरू करण्याची योजना आखत आहे.
या मॉडेलने चालते जिओ मार्ट (This model runs Jio Mart)
जिओ मार्ट ऑनलाइन टू ऑफलाइन व्यवसाय मॉडेलचा वापर करत आहे. ‘देश की नयी दुकान’ या टॅगलाईनने ते ग्राहकांची सेवा करत आहेत. स्थानिक किरकोळ विक्रेत्यांशी जोडले जावून ग्राहकांच्या आसपासच्या दुकानातून वस्तू खरेदी करून ग्राहकांना वस्तू वितरीत करणे हा जिओ मार्टचा फंडा आहे. हे मॉडेल Grofers आणि Amazon Now द्वारे वापरलेल्या वेअरहाऊस मॉडेलपेक्षा वेगळे आहे.
जिओ मार्टची वैशिष्ट्ये (Features of Jio Mart)
- मोफत होम डिलिव्हरी (Free home delivery) : जवळच्या दुकानातून वस्तू खरेदी करून तुमच्या दारात कोणतेही शुल्क न घेता वस्तू पोहोचवण्याचा फंडा जिओ मार्टने अवलंबला आहे. त्यामुळे जी सुविधा 'किराणे वाला भैया' कदाचित तुम्हाला देऊ शकत नाही ती सुविधा जिओ मार्ट देत आहे.
- किमान मूल्य नाही (No minimum charges) : सामान्यतः, ई-कॉमर्स साइट विनामूल्य वितरण प्रमाणित करण्यासाठी खरेदीचे किमान मूल्य सेट करतात. उदाहरणार्थ, Grofers कडे INR 500 च्या किमान खरेदीवर मोफत डिलिव्हरीवरच मोफत डिलिव्हरी देते. पण JioMart 'किमान पेमेंट'ची अपेक्षा करत नाही आणि ऑर्डर केलेल्या अगदी लहान वस्तूंसाठीही डिलिव्हरी शुल्क टाळते.
- एक्सप्रेस डिलिव्हरी (Express delivery) : एक्सप्रेस डिलिव्हरी मध्ये 24 तासांच्या आत तुम्हाला सेवा मिळते. म्हणजे रोजच्या सामान्य सेवांपेक्षा एक्सप्रेस डिलिव्हरीमध्ये वितरण जलद होते.
- रिटर्न पॉलिसीमध्ये कोणतेही प्रश्न विचारले जात नाही (No questions asked for return policy) : जेव्हा तुम्ही ऑनलाइन ऑर्डर केलेल्या वस्तू परत करायच्या असतील तेव्हा तुमच्यावर नेहमीच अनावश्यक प्रश्नांचा भडिमार केला जातो. आणि बहुतेक वेळा ते प्रश्न ग्राहक टाळू शकत नाहीत. पण JioMart वरील खरेदी करताना तुम्हाला या त्रासाला सामोरे जावे लागत नाही.
- अर्ली बर्ड सवलत (Early bird discount) : जिओ मार्टने पूर्व-नोंदणीचे प्रचारात्मक धोरण अवलंबले आहे. ज्यामध्ये लोक भविष्यातील खरेदीवर 3000 रुपयांपर्यंत बचत करू शकतात.