• 05 Feb, 2023 12:39

Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Jio India's Top Brand: जिओ भारताचा सर्वात शक्तीशाली ब्रँड; जगभरात नवव्या क्रमांकावर झेप

Jio India's Top Brand

रिलायन्स जिओ हा भारतातील सर्वात शक्तीशाली ब्रँड बनला आहे. तसेच जगभरातील टॉप ब्रँडमध्ये जिओने नवव्या क्रमांकावर झेप घेतली आहे. टेलिकॉम नेटवर्कमध्ये जिओने भारतामध्ये जी आघाडी घेतली आहे त्याचे यश आता जागतिक पातळीवर दिसून येत आहे.

रिलायन्स जिओ हा भारतातील सर्वात शक्तीशाली ब्रँड बनला आहे. तसेच जगभरातील टॉप ब्रँडमध्ये जिओने नवव्या क्रमांकावर झेप घेतली आहे. टेलिकॉम नेटवर्कमध्ये जिओने भारतामध्ये जी आघाडी घेतली आहे त्याचे यश आता जागतिक पातळीवर दिसून येत आहे. ब्रँड फायनान्सने जाहीर केलेल्या रिपोर्टमधून ही माहिती समोर आली आहे.

कोकाकोला, पोर्शे, अॅसेंचरपेक्षाही जिओ ब्रँड मोठा( Jio is bigger than Coca-Cola and Porshe)

शीतपेय बनवणारी कंपनी कोकाकोला, वाहननिर्मिती क्षेत्रातील आघाडीचा ब्रँड पोर्शे, माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीची कंपनी अॅसेंचर या कंन्यांच्यापुढे जिओ ब्रँड गेला आहे. जिओच्या पुढे गुगल, युट्युब, डेलॉइट, इन्स्टाग्राम असे काही ब्रँड्स आहेत. ब्रँड फायनान्सने Global 500 - 2023 असा रिपोर्ट जाहीर केला असून यामध्ये जगातील सर्वोत्तकृष्ट आणि व्हल्युएबल ब्रँडची नावे देण्यात येतात.

टॉप ब्रँडची निवड कशी केली जाते(How top brands get Selected)

जगातील टॉप 25 ब्रँडच्या यादीमध्येही जिओचा समावेश झालेला आहे. जिओचा ब्रँड स्ट्रेन्थ इंटेक्स स्कोर 90.2 एवढा आहे. एखादा ब्रँड किती मोठा आहे हे समजण्यासाठी काही निकष लावले जातात. त्यानुसार त्या कंपनीला स्कोर देण्यात येतो. कंपनीचा मार्केटिंगवरील खर्च, ब्रँड अवेअरनेस, पत, एनपीएस, ताब्यात घेतलेल्या कंपन्या, बाजारातील हिस्सा, कंपनीचे मूल्य, उत्पानांच्या किंमती अशा गोष्टींचा विचार केला जातो. त्यानुसार एखादा ब्रँड किती मोठा आहे हे ठरवण्यात येते

Jio 5G सेवा भारतातील 100 पेक्षा जास्त शहरांत (Jio 5G is more than 100 cites)

जिओ कंपनीने मोबाईल नेटवर्क आणि इंटरनेट मध्ये भारतीय बाजारपेठेवर कब्जा केला आहे. कंपनीने 5G ही सेवा देशातील 100 पेक्षा जास्त शहरांमध्ये सुरु केली आहे. कंपनीने 4G सेवा भारतात लाँच करून प्रतिस्पर्धी कंपन्यांचे कंबरडे मोडले. सध्या मोबाईल नेटवर्क सेवेमध्ये कंपनीने मक्तेदारी निर्माण केली आहे. एअरटेल ही कंपनीची मुख्य प्रतिस्पर्धी असून त्यांनी भारतातील 30 पेक्षा जास्त शहरांमध्ये 5G इंटरनेट सुविधा सुरू केली आहे.