Reliance Digital on EMI: भारतातील दिग्गज उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स जिओने जिओ एनबीएफसीची पायलट प्रोजेक्ट म्हणून चाचणी सुरू केली आहे. आकाश अंबानीच्या जिओ फायनान्शियल सर्व्हिसेसने ग्राहक वित्त कार्यक्रमाचा पायलट सुरू केला आहे. जिओचा हा पायलट रिलायन्स डिजिटलच्या अनेक आउटलेटवर सुरू करण्यात आला आहे. रिलायन्स डिजिटल वरून इलेक्ट्रॉनिक्स किंवा इलेक्ट्रिकल्स खरेदी करणाऱ्या ग्राहकांना त्यांच्या खरेदीची रक्कम समान मासिक हप्त्यांमध्ये (EMI) परत करण्याची ऑफर दिली जात आहे.
ग्राहकांना मिळणार ईएमआय सुविधा
रिलायन्स जिओने अलीकडेच आपल्या NBFC चा हा कार्यक्रम रिलायन्स डिजिटल स्टोअरमध्ये सुरू केला आहे, जेणेकरून जिओचे ग्राहक इलेक्ट्रॉनिक्स खरेदी करू शकतील. विशेष म्हणजे सध्या रिलायन्स डिजिटल स्टोअर, पीआर बजाज फिनसर्व्ह आणि एचडीएफसी बँक इत्यादींची ईएमआय सुविधाही सुरू आहे. Jio NBFC (Non-Banking Financial Companies) ने उपलब्ध असलेल्या NBFC ऑफर्ससोबत जुळून आपले कार्य सुरू केले आहे.
जिओचे फायनान्स मधील पाऊल
जिओ या वित्तपुरवठा (Financing) ऑफरमध्ये सुधारणा करून ग्राहकांना आकर्षित करू इच्छित आहे. रिलायन्स डिजिटल रिलायन्स रिटेलच्या व्यवसायातील मार्जिन वाढवण्याच्या योजनेवर काम करत आहे आणि गृहोपयोगी वस्तू खरेदी करणाऱ्या ग्राहकांना उत्तम फायनान्स ऑफर देत आहे. परंतु, अकाश अंबानीच्या जियोला या व्यवसायात फार स्कोप मिळणार नाही. टेलीकॉम किंवा NBFC क्षेत्रात रिलायन्स किंमतींमध्ये हेराफेर करुन पूढे जाऊ शकत नाही.
ग्राहकांचा फायदा
या व्यवसायात, आकाश अंबानीच्या Jio NBFC च्या यशासाठी फक्त दोन गोष्टी आवश्यक आहेत एक म्हणजे स्केल आणि दुसरे म्हणजे ब्रँड. रिलायन्स जिओकडे एक उत्तम ब्रँड आहे, जो त्याची सर्वात मोठी ताकद बनू शकतो. रिलायन्स डिजिटलचे 20,000 पेक्षा जास्त आउटलेट आहेत. यासोबतच Jio कडे अनेक ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म आहेत, जिथे त्यांच्या आर्थिक उत्पादनांना मोठा वाव आहे. कालांतराने, आकाश अंबानीची जिओ एनबीएफसी क्षेत्रात आपले कार्य कसे वाढवते आणि प्रतिस्पर्धी कंपन्यांशी स्पर्धा कशी करते हे पाहणे सामान्य ग्राहकांसाठी मनोरंजक ठरेल आणि याच स्पर्धेचा लाभ ग्राहकांना होईल.