एव्हिएशन टर्बाइन फ्युलच्या नावाने (ATF) च्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या जेट फ्यूलच्या किमतीत सलग दुसऱ्या महिन्यात वाढ झाली आहे. तेल वितरक कंपन्यांनी सलग दुसऱ्या महिन्यात ही दर वाढ केली आहे. आज मंगळवार 1 ऑगस्ट 2023 पासून लागू करण्यात आले आहे. तेल कंपन्यांनी देशांतर्गत येणाऱ्या विमान कंपन्यांसाठी एविएशन टर्बाइन फ्युलच्या किमतीत बदल केला आहे. त्यामुळे मुंबई, दिल्ली, कोलकत्ता यासह देशातील प्रमुख शहरांमध्ये ATF च्या किमतीत वाढ झाली. याआधी सरकारने हस्तक्षेप करीत अनेकदा दरवाढ समतोल राखली होती.
कुठे किती किंमत
देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई येथे एटीएफची किंमत 92,124.13 रुपये प्रति किलो लिटर झालेली आहे. दिल्लीत प्रति किलो लिटर एटीएफची किंमत 98,508.26 रुपये झाली आहे. तर कोलकाता येथे एटीएफ ची किंमत 1,07,383.08 रुपये प्रति किलो लिटर झालेली आहे. चेन्नईमध्ये एटीएफची किंमत 1,02,391.64 रुपये प्रति किलो लिटर झालेली आहे. भारतातील प्रमुख शहारांमध्ये असलेले असे एअरपोर्ट ज्यावरुन देशाअंतर्गत आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणे भरली जातात, तेथे एटीएफच्या नव्या किमती जाहीर करण्यात आल्या आहेत. ATF ची दरवाढ झाल्याने त्याचा परिणाम मुख्यत: ऑपरेशन कॉस्टवर होणार असल्याने यापूढे विमान प्रवास महाग होण्याची दाट शक्यता आहे.
डॉलरनुसार एटीएफची किंमत
मुंबईत एटीएफच्या किमती 900.73 रुपये प्रति लीटर डॉलर प्रमाणे वाढवण्यात आली आहे. कोलकत्ता येथे एटीएफच्या किमती 941.09 रुपये प्रति लीटर डॉलर प्रमाणे वाढवण्यात आली आहे. चेन्नई येथे एटीएफची किंमत 897.83 रुपये प्रति लीटर डॉलर प्रमाणे वाढवण्यात आली आहे. तर दिल्ली येथे एटीएफची किंमत 902.62 रुपये प्रति लीटर डॉलर आहे. दिल्ली येथून सर्व आंतरराष्ट्रीय विमाने उडाण घेत असल्यामुळे या दरांचा परिणाम तिकिटांच्या किमतींवर होणार आहे. त्यामुळे आता परदेशवारी आणखीनच महाग होण्याची शक्यता आहे.