Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

ITR Due Date Extension 2023: आयटीआर भरण्याची मुदत वाढण्याची वाट पाहू नका; आजच रिटर्न फाईल करा!

No Extension for ITR Return

Image Source : www.housing.com

ITR Filing Due Date: ज्यांच्या बँक खात्याचे ऑडिट करण्याची गरज नाही, अशा करदात्यांसाठी मूल्यांकन वर्ष 2023-24 (Assessment Year 2023-24) साठी 31 जुलै ही आयटीआर भरण्यासाठी अंतिम तारीख आहे.

ITR Filing Due Date AY 2023-24: इन्कम टॅक्स विभागाकडून अजून तरी आयटीआर भरण्याच्या तारखेत वाढ करण्याच्या हालचाली दिसत नाहीत. ज्या वैयक्तिक करदात्यांच्या बँक खात्याचे ऑडिट करण्याची गरज नाही. अशा करदात्यांची संख्या मोठी आहे. त्यांच्यासाठी आयटीआर भरण्याची अंतिम तारीख 31 जुलै आहे. त्यांच्याकडे अजून 17 दिवस बाकी आहेत.

इन्कम टॅक्स विभागाच्या वेबसाईटवर उपलब्ध असलेल्या माहितीनुसार, 9 जुलैपर्यंत 1.89 कोटी करदात्यांनी आयटीआर भरलेले आहे. तर मागील वर्षी म्हणजे मूल्यांकन वर्ष 2022-23 (Assessment Year 2022-23) साठी 31 जुलैपर्यंत 5.8 कोटीपेक्षा जास्त करदात्यांनी इन्कम टॅक्स रिटर्न भरले होते. म्हणजे बाकी असलेल्या 17 दिवसांमध्ये अजून जवळपास 4 कोटी करदात्यांना आयटीआर भरायचे आहे.


ज्या करदात्यांनी अजून आयटीआर भरलेले नाही. ते जर अंतिम तारीख वाढण्याची वाट पाहत असतील तर त्यांना कदाचित आर्थिक फटका बसू शकतो. इन्कम टॅक्स विभागाने अजूनतरी मुदत वाढवण्याची तयारी दाखवलेली नाही. जरी विभागाने मुदत वाढवली तरी, ती शेवटच्या दिवशी वाढवली जाऊ शकते. पण अंतिम मुदत वाढवली नाही तर तुम्हाला आर्थिक दंड भरावा लागू शकतो. त्याचबरोबर शेवटच्या क्षणी आयटीआर भरणाऱ्यांची संख्या खूप असल्यामुळे वेबसाईटवर लोडिंगचा इश्यू होऊ शकतो.

मागील वर्षी मुदत वाढवली नव्हती

इन्कम टॅक्स रिटर्न वेळेत भरणे गरजेचे आहे, कारण यावेळी आयटीआर भरण्याची मुदतवाढ यावेळी दिली जाणार आहे. मागीलवर्षीही इन्कम टॅक्स विभागाने 31 जुलैनंतर करदात्यांना रिटर्न भरण्यासाठी मुदतवाढ दिली नव्हती. त्याचबरोबर वेळेत आणि मुदतीत आयटीआर भरण्याचे बरेच फायदे आहेत.

रिफंड लवकर मिळू शकतो

मुदतीपूर्वी तुम्ही जर आयटीआर भरले तर शेवट्या क्षणाला होणारी धावपळ तुम्ही टाळू शकता. तुम्ही जर आयटीआर वेळेपूर्वीच म्हणजे लवकर भरला असेल तर तुम्हाला रिफंडसुद्धा लवकर मिळण्याची शक्यता अधिक आहे. जे उशिरा रिटर्न भरतात. त्यांच्या रिटर्नची पडताळणी आणि तपासणी उशिरा होते. परिणामी त्यांना रिफंड उशिरा मिळू शकतो.

चुका टाळू शकता

जर तुम्ही इन्कम टॅक्स रिटर्न लवकर भरत असाल तर तुमच्याकडून चुका शक्यतो होणार नाहीत. त्याच्यासाठी जी आवश्यक कागदपत्रे लागतात. ती जमा करण्यासाठी तुमच्याकडे पुरेसा वेळ असू शकतो. तसेच रिटर्न भरताना काही चुका झाल्या तरी त्या सुधारण्यासाठी तुम्हाला पुरेसा वेळ मिळू शकतो.

दंड टाळू शकता

वेळेपूर्वी इन्कम टॅक्स रिटर्न भरल्याने लेट फी आणि दंडाची रक्कम भरण्यापासून तुम्ही सुरक्षित राहता. पण जे उशिरा किंवा मुदतीनंतर आयटीआर भरतात. त्यांना दंड भरून आयटीआर भरावा लागतो.

अशाप्रकारे वेळेत आणि मुदतीत इन्कम टॅक्स रिटर्न भरून तुम्ही तुमचे आर्थिक नियोजन व्यवस्थित करू शकता. पगारदार आणि नोकरदार व्यक्तींना इन्कम टॅक्स विभागाच्या वेबसाईटवर जाऊन रिटर्न भरणे खूपच सोपे आहे. त्याचबरोबर तुम्ही व्यावसायिक टॅक्स तज्ज्ञांच्या मदतीने सुद्धा आयटीआर भरू शकता.