Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Income Tax Refund: आयटीआर भरल्यानंतर किती दिवसांत मिळतो रिफंड आणि तो चेक कसा करायचा?

How to check Income Tax Refund Status

Image Source : www.businessleague.in

Income Tax Refund: अनेक जण दंड लागू नये म्हणून वेळेत आयटीआर भरतात आणि कापलेला टॅक्स रिफंड स्वरूपात कधी मिळेल याची वाट पाहतात. तर आज आपण नुसती वाट न पाहता त्याचे स्टेटस कसे चेक करायचे आणि रिफंड कधी मिळणार याची अधिकृत आणि खात्रीशीर माहिती कशी मिळवायची हे जाणून घेणार आहोत.

Income Tax Refund: इन्कम टॅक्स रिटर्न हा जर तुम्ही वेळेत किंवा त्यापूर्वी भरला तर त्याच्यावरील प्रक्रिया लवकर सुरू होऊन तुम्हाला तुमचा रिफंड लवकर मिळू शकतो. 31 जुलै, 2023 ही आयटीआर भरण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे जसजशी ही तारीख जवळ येईल. तसे मोठ्या संख्येने इन्कम टॅक्स रिटर्न भरणाऱ्यांची संख्या वाढेल. त्यामुळेही तुमचा रिफंड उशिरा मिळू शकतो.

इन्कम टॅक्स भरूनही अनेक जणांना वेळेत कापलेला टॅक्स रिफंड स्वरूपात मिळत नाही. त्याची वेगवेगळी कारणे असू शकतात. पण आयटीआर भरल्यानंतर रिफंड मिळवण्यासाठी किमान 15 ते 20 दिवसांचा कालावधी जाणे आवश्यक आहे. त्यानंतर तुम्हाला इन्कम टॅक्स विभागाकडून मोबाईल किंवा ईमेलवर काही मॅसेज आला आहे का? ते तपासावे. त्यातूनही तुम्हाला रिफंडचे स्टेटस कळू शकते. त्यानंतर तुमच्या बँक खात्याचे स्टेटमेंट चेक करा. त्यातून रिफंड जमा झाला आहे की नाही, हे कळू शकते. हे दोन पर्याय तपासूनही तुम्हाला तुमच्या रिफंडचे स्टेटस कळत नसेल तर काय करायचे? त्याची आपण सविस्तर माहिती जाणून घेऊ.

टॅक्स रिफंड आला नसेल तर काय करायचे?

जर तुम्ही इन्कम टॅक्स रिटर्न भरून देखील तुमच्या खात्यात रिफंडची रक्कम जमा झाली नसेल, तर तुम्ही त्याचे स्टेटस इन्कम टॅक्सच्या वेबसाईटवरून चेक करू शकता. वेबसाईटवर हे स्टेटस कसे चेक करायचे ते आपण पाहू.

Income Tax Returns Stauts
Image Source: cleartax.in
  • इथे उपलब्ध असलेल्या माहितीतून तुम्हाला ज्या वर्षाचा रिफंड चेक करायचा आहे. त्याचे योग्य ते मूल्यांकन वर्ष (Assessment Year) निवडा आणि खालील चित्रात दाखवल्याप्रमाणे त्यातील View Details यावर क्लिक करा.
ITR Refund details
Image Source: cleartax.in
  • View Details वर क्लिक केल्यानंतर आयटीआर भरल्याची आणि रिफंडची माहिती दिसेल. तुमची आयटीआरची प्रक्रिया पूर्ण झाली आहे पण अजून रिफंड आला नसेल तर इथे Processed with refund due असा मॅसेज दिसेल.
  • इथे जर Refund Issued असा मॅसेज दिसत असेल तर त्याची माहिती तारखेसह तुम्हाला इथून कळू शकते. तसेच डिपार्टमेंटने कोणत्या प्रकारे हा रिफंड दिला आहे, हे सुद्धा कळते. जसे की, NEFT, e-PAYMENT etc.

साधारण ITR-1 आणि ITR-4 फॉर्म भरल्यानंतर 10 ते 15 दिवसांत तुम्हाला रिफंड मिळू शकतो आणि ITR-2 आणि ITR-3 साठी हाच कालावधी 15 ते 30 दिवसांचा असू शकतो.

याशिवाय एनएसडीएल वेबसाईटवरूनही इन्कम टॅक्स रिफंडचे स्टेटस चेक करता येते. इन्कम टॅक्स विभागांतर्गत येणाऱ्या एनएसडीएलच्या या वेबसाईटवरून तुम्ही रिफंडचा ट्रॅक ठेवू शकता.

Tax Refund Status

  • सर्वप्रथम तुमचा पॅन क्रमांक टाका
  • त्यानंतर मूल्यांकन वर्ष (Assessment Year) निवडा.
  • कॅप्चा कोड टाका आणि Proceed या बटणावर क्लिक करा.


अशाप्रकारे तुम्ही तुमच्या इन्कम टॅक्स रिफंडचे स्टेटस चेक करू शकता किंवा त्याबाबतची डिटेल माहिती पाहू शकता.