Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

ITR Deadline: पॅनकार्ड इनऑपरेटिव्ह असले तरीही रिटर्न फाईल करता येणार

Income Tax Return

ITR Deadline : आयकर विवरणपत्र सादर करण्याची अंतिम मुदत 31 जुलै 2023 रोजी संपुष्टात येईल. त्यानंतर रिटर्न फायलिंग करताना करदात्याला दंडात्मक शुल्क भरावे लागणार आहे. शेवटचे काही दिवस शिल्लक असल्याने ऑनलाईन रिटर्न फायलिंग गतीमान झाली आहे.

इन्कम टॅक्स रिटर्न फायलिंगसाठी आता केवळ दोनच दिवस शिल्लक आहेत.  मात्र जर तुमचे पॅनकार्ड आणि आधार कार्ड एकमेंकांशी सलग्न नसेल आणि तुमचे पॅनकार्ड कारवाईमुळे इनऑपरेटिव्ह झाले असले तरीही चिंता करण्याची आवश्यकता नाही. अशा पॅनकार्डधाकरांना देखील इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करण्याची सुविधा आयकर विभागाने उपलब्ध केली आहे.

आयकर विवरणपत्र सादर करण्याची अंतिम मुदत 31 जुलै 2023 रोजी संपुष्टात येईल. त्यानंतर रिटर्न फायलिंग करताना करदात्याला दंडात्मक शुल्क भरावे लागणार आहे. शेवटचे काही दिवस शिल्लक असल्याने ऑनलाईन रिटर्न फायलिंग गतीमान झाली आहे.

पॅनकार्ड आणि आधारकार्ड एकमेकांशी लिंक करण्यासाठी 30 जून 2023 ही अंतिम मुदत होती. या दरम्यान ज्यांनी पॅन आधार लिंक केले नाही अशांचे पॅनकार्ड कारवाई म्हणून इनऑपरेटिव्ह अर्थात निष्क्रिय करण्यात आले आहे. मात्र त्यांच्यासाठी आयकर विभागाने महत्वाचा निर्णय घेतला आहे.  

आयकर विभागाच्या ई फायलिंग पोर्टलवर रिटर्न फायलिंगसाठी पॅन-आधार लिंक झाले की नाही हे तपासण्यासाठी कोणतीही यंत्रणा नाही. त्यामुळे ज्यांनी पॅन आधार लिंक केलेली नसेल, अशांना रिटर्न फाईल करण्यास कोणतीही अडचण येणार नाही, असे निरीक्षण टीएएस लॉ या कंपनीचे वरिष्ठ अधिकारी हिमांशू सचदेवा यांनी इकॉनॉमिक्स टाईम्स या वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीमध्ये नोंदवले.

पॅनकार्ड निष्क्रिय असले तरी रिटर्न फाईल करण्यासाठी कोणतीही वेगळी पद्धत नाही. जसे सर्वसामान्य करदाते करतात तशीच पद्धत पॅनकार्ड निष्क्रिय असलेले देखील अवलंबून रिटर्न फाईल करु शकतात, असे त्यांनी सांगितले. मात्र या इन्कम टॅक्स रिटर्नचे आधारबेस व्हेरिफिकेशन होणार नाही. त्यामुळे करदात्याला ओटीपी येणे आणि ई व्हेरिफिकेशन ऐवजी बंगळुरु येथे आयटीआर कॉपी पाठवावी लागेल.

एखाद्याला टॅक्सपेअरला जेव्हा कर भरावा लागणार असेल तर तिथे पॅनकार्ड सक्रिय असणे आवश्यक आहे. सक्रिय पॅनकार्ड म्हणजे आयकर विभागाकडून असे पॅनकार्ड जे रद्द करण्यात आलेले नाही किंवा ते निष्क्रिय करण्यात आलेले नाही. ऑपरेटिव्ह पॅनकार्ड म्हणजे ज्या पॅनकार्डला आधार क्रमांकाशी जोडलेले आहे असे पॅनकार्ड ऑपरेटिव्ह पॅनकार्ड असतात.