Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

ITR Filing : मुदतीनंतर आयटीआर फाईल केला तर काय होईल? जाणून घ्या 5 परिणाम

ITR Filing : मुदतीनंतर आयटीआर फाईल केला तर काय होईल? जाणून घ्या 5 परिणाम

Image Source : www.timesofindia.indiatimes.com

आर्थिक वर्ष 2023 चे आयकर भरण्याची मुदत 31 जुलै आहे. त्यामुळे ITR भरण्यासाठी गर्दी केली आहे. कारण अंतिम मुदत चुकली तर करदाते दंडास पात्र होणार आहेत. त्यामुळे करदात्यांना या उरलेल्या दोन दिवसात इन्कम टॅक्स रिटर्न (ITR)भरण्याशिवाय पर्याय नाही. नसेल तर मुख्यत्वे पुढील 5 परिणामांना सामोरे जावे लागू शकते.

प्राप्ती कर (ITR) भरण्यासाठी मोजकेच दिवस शिल्लक राहिले आहेत. तसेच यापूर्वीच आयकर विभागाकडून कर दात्यांना वेळेत आयकर फाईल करण्याशिवाय पर्याय नसल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. त्यामुळे शेवटच्या घडीला अनेक करदाते आयटीआर भरण्यासाठी हात धुवून मागे लागले आहेत. मात्र, आयकर विभागाने दिलेल्या 31 जुलैच्या मुदतीनंतर आयटीआर फाईल केला तर काय होईल. त्याचे नेमके काय परिणाम होतील त्यातील काही महत्त्वाच्या गोष्टी आज आपण जाणून घेऊयात.

आर्थिक वर्ष 2023 चे आयकर  भरण्याची मुदत 31 जुलै आहे. त्यामुळे ITR भरण्यासाठी गर्दी केली आहे. कारण अंतिम मुदत चुकली तर करदाते दंडास पात्र होणार आहेत.त्यामुळे करदात्यांना या उरलेल्या दोन दिवसात  इन्कम टॅक्स रिटर्न (ITR)भरण्याशिवाय पर्याय नाही. नसेल तर मुख्यत्वे पुढील 5 परिणामांना सामोरे जावे लागू  शकते.

आयकर विभागाकडून दंड-

जर या आर्थिक वर्षात तुमचे उत्पन्न 5 लाखांपेक्षा जास्त असेल आणि तुम्ही आयटीआर भरण्यासाठी दिलेल्या मुदतीनंतर म्हणजेच 31 जुलै 2023 नंतर आणि 31 डिसेंबरपूर्वी तुम्ही तुमचा ITR फाइल केला. तर तुम्हाला जास्तीत जास्त 5000 रुपये दंड आकारला जातो. मात्र, जर तुम्ही वर्षाअखेरीस 31 डिसेंबर 2023 नंतर आयटीआर फाइल केले तर तुम्हाल 10 हजार रुपये दंड भरावा लागतो. तसेच जर तुमचे उत्पन्न 5 लाखांपेक्षा कमी असेल तर तुम्हाला 1 हजार रुपये दंड भरावा लागू शकतो. या करदात्यांनी 31 डिसेंबर या तारखेनंतरही रिटर्न फाइल केला तरी 1000 रुपयेच दंड आकारला जातो.

व्याज आकारले जाते-

समजा तुम्ही दिलेल्या मुदतीनंतर आयटीआर फाईल केला तर त्याचा दुसरा परिणाम असा होतो, ते म्हणजे तुम्हाला न भरलेल्या कराच्या रकमेवर व्याज आकारले जाते आणि ते तुम्हाला भरावे लागते. म्हणजे मुदतीनंतर भरल्याचा दंड त्याशिवाय तुमच्या देय कराच्या रकमेसह त्यावर व्याज भरावे लागते. आयकर कायद्यानुसार तुम्हाला दरमहा 1% किंवा कर भरेपर्यंत करपात्र रकमेवर काही प्रमाणात व्याज आकारले जाते.

आर्थिक वर्षातील तोटा सेट करण्यास अडचण

तुम्ही मुदतीमध्ये आयटीआर फाईल नाही केला तर तिसरा परिणाम असा होतो की, तुम्हाला या आर्थिक वर्षात झालेले नुकसान पुढील वर्षातील नफ्यामध्ये सेट करता येत नाही. आयकर विभागाकडे रिटर्न वेळेत दाखल केल्यावरच तुम्हाला संबंधित आर्थिक वर्षात झालेला तोटा पुढे नेण्याची परवानगी आहे.

इन्कम टॅक्स रिफंड मिळण्यास विलंब-

जर तुम्ही दिलेल्या मुदतीमध्ये आयटीआर फाईल केला, तर तुम्हाला लवकरात लवकर इन्कम टॅक्स रिफंड मिळतो. हे रिटर्न्स साधारण 25 दिवसाच्या आत करदात्यांच्या बँकेच्या खात्यात जमा केले जातात. मात्र, तुम्ही आयटीआर दाखल करण्यास उशीर केला तर तुमचा परतावा मिळण्यास विलंब होऊ शकतो.

नोटीस आणि कारवाई

जर एखाद्या करदात्यास मुदतीमध्ये कर भरण्यास उशीर झाला अथवा आयकर फाईल केलाच नाही, तर त्या करदात्यास आयकर विभागाकडून नोटीस पाठवली जाते. तसेच कर दात्याने ही नोटीस मिळाल्यानंतरही आयटीआर दाखल केला नाही तर आयकर कायद्याच्या कलम 276CC नुसार कर चुकवेगिरीसाठी तुमच्यावर खटला भरला जाऊ शकतो. 

तसेच जर करदात्याने 25 लाखांपेक्षा जास्त कर चुकवला असेल तर ITR दाखल न करण्याबद्दल त्याच्यावर दंडात्मक कारवाईसह किमान 6 महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. तसेच ही शिक्षा 7 वर्षांपर्यंत वाढवली जाऊ शकते. याच प्रमाणे आयकर कायद्याशी निगडीत इतर प्रकरणांसाठी, किमान 3 महिन्यांच्या तुरुंगवासासह आर्थिक दंडही ठोठावला जाऊ शकतो.

वरील सर्व परिणामांना सामोरे जाण्याची वेळ टाळण्यासाठी कर दात्यांनी शेवटच्या दिवसाची अथवा मुदत वाढ मिळेल याची अपेक्षा न करता चालु क्षणाला आयटीआर दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करणे हे केव्हाही चांगले आहे. दरम्यान, या आठवड्याच्या सुरवाती पर्यंत आर्थिक वर्ष 2023 साठी एकूण 7.4 कोटी करदात्यांनी ITR दाखल केले असल्याची माहिती अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लोकसभेत दिली होती.