Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

ITR डेडलाईन चुकली! आता किती भरावा लागेल दंड, कधीपर्यंत भरता येईल रिटर्न

ITR डेडलाईन चुकली! आता किती भरावा लागेल दंड, कधीपर्यंत भरता येईल रिटर्न

मागील आठवडाभर टॅक्सपेअर्स आणि नेटिझन्सकडून ITR साठी मुदतवाढ मिळावी याकरिता जोरदार मागणी करण्यात आली होती. मात्र केंद्र सरकार 31 जुलै 2022 या अंतिम मुदतीवर शेवटपर्यंत ठाम राहिले.

वैयक्तिक आयकर भरणा करण्यासाठीची मुदत अखेर रविवारी 31 जुलै 2022 रोजी संपुष्टात आली. केंद्र सरकारने मुदतवाढ न दिल्याने ज्यांनी रिटर्न फाईल केला नाही, अशा टॅक्सपेअर्सना विलंब शुल्कासह ITR भरावा लागणार आहे. 31 डिसेंबर 2022 पर्यंत करदात्यांना ITR भरता येईल.

इन्कम टॅक्स विभागाच्या ताज्या आकडेवारीनुसार रविवारी ITR रिटर्न फायलिंगच्या अखेरच्या दिवशी रविवारी 31 जुलै रोजी रात्री 11 वाजेपर्यंत तब्बल 65 लाख रिटर्न ऑनलाईन भरण्यात आले. 2022 या आर्थिक वर्षात किमान पाच कोटींहून अधिक रिटर्न भरले जातील, असा अंदाज आहे.  

मागील आठवडाभर टॅक्सपेअर्स आणि नेटिझन्सकडून ITR साठी मुदतवाढ मिळावी याकरिता जोरदार मागणी करण्यात आली होती. मात्र केंद्र सरकार 31  जुलै 2022 या अंतिम मुदतीवर शेवटपर्यंत ठाम राहिले. आता टॅक्सपेअर्स 31 डिसेंबर, 2022 पर्यंत रिटर्न फाईल करू शकता. पण यासाठी विलंब शुल्क भरावे लागेल. मात्र वार्षिक 2.5 लाखांहून कमी उत्पन्न असणाऱ्या करदात्यांना कोणतेही विलंब शुल्क नाही. ते 31 डिसेंबर 2022 पर्यंत ITR भरु शकतात. त्यांना विलंब शुल्कातून वगळण्यात आले आहे.  

विलंब शुल्क (Late fee)

जर तुम्ही 31 जुलै, 2022 च्या आत आयटीआर रिटर्न (Income Tax Return) फाईल करू शकला नाही. तर तुम्ही 31 डिसेंबर, 2022 पर्यंत रिटर्न फाईल करू शकता. पण यासाठी तुम्हाला विलंब शुल्क भरावे लागेल. तुमचे वार्षिक उत्पन्न 5 लाखांपेक्षा जास्त असेल तर तुम्हाला विलंब फी म्हणून 5 हजार रुपये दंड भरावा लागेल आणि जर तुमचे वार्षिक उत्पन्न पाच लाखापेक्षा कमी असेल तर लेट फी म्हणून 1 हजार रूपये दंड (ITR Late Filing Penalty) भरावा लागेल.

देय असलेल्या टॅक्सवर व्याज (Interest on unpaid tax)

जर तुम्ही 31 जुलै, 2022 पर्यंत इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केले नाही तर तुमच्या देय असलेल्या टॅक्सवर 31 जुलैनंतर 1 टक्का व्याज लागू होते. करदात्याने 31 जुलैनंतर रिटर्न फाईल केल्यास त्याला सर्वप्रथम त्या दिवसापर्यंतचे व्याज दंडासह भरावे लागते. त्यानंतर त्याला रिटर्न फाईल करण्याची सुविधा उपलब्ध होते.

तोटा पुढील वर्षात दाखवता येणार नाही (No Carry forward of losses)

करदात्यांना इतर उत्पन्नाच्या तुलनेत व्यवसायिक उलाढालीतून किंवा मालमत्तेच्या विक्रीतून होणारे नुकसान भरून त्याचे उत्तरदायित्व (Tax Liability) कमी करण्याची परवानगी आहे. म्हणजेच त्या वर्षात होणारा तोटा कायद्याने पुढील वर्षांपर्यंत नेण्याची परवानगी आहे. पण, ही सुविधा मुदतीनंतर रिटर्न फाईल करणाऱ्यांना लागू होत नाही. जर करदात्यांनी 31 जुलै 2022 पूर्वी आयटीआर दाखल केला तरच त्यांना यावर्षी होणारा तोटा पुढील वर्षात दाखवण्याची सुविधा घेता येईल.