भारतातील आयटी कंपन्यांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा झाली आहे. तिसऱ्या तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर झाले . यात टीसीएस, विप्रो, एचसीएल टेक्नॉलॉजी या दिग्गज कंपन्यांनी जबरदस्त कामगिरी केली. कंपन्यांच्या व्यावसायिक वृद्धीत 14 ते 20% वाढ झाली आहे.
जागतिक अर्थव्यवस्थेवर मंदीचे सावट आहे. त्याचा मोठा फटका देशातील आयटी कंपन्यांना बसला होता. यामुळे आयटी शेअर्सवर देखील परिणाम झाला होता. मात्र आघाडीच्या आयटी कंपन्यांच्या महसुलाचा विचार केला तर तिसऱ्या तिमाहीत त्यांच्यात 14 ते 20% वाढ झाली. याच तिमाहीत मोठ्या कंपन्यांची 3% ते 8% ने वाढ झाली.
गेल्या वर्षाच्या तुलनेत डिसेंबरमध्ये विप्रोच्या नफ्यात 3% वाढ होण्याची शक्यता आहे. विप्रोचा नफा 19% आणि टीसीएसचा नफा 4% ने वाढला. टीसीएसच्या महसुलात 19.1% वाढ झाली. टीसीएसला 58229 कोटींचा महसूल मिळाला. इन्फोसिसच्या महसुलात डिसेंबरमध्ये 20.2% वाढ झाली. इन्फोसिसला 38318 कोटी रुपयांचा महसूल मिळाला. चालू वर्षासाठी इन्फोसिसने 16 ते 16.5% वृद्धीचा अंदाज व्यक्त केला आहे.
आणखी एक दिग्गज कंपनी एचसीएल टेकला डिसेंबरच्या तिमाहीत 4096 कोटींचा निव्वळ नफा झाला. त्यात 19% वाढ झाली. त्याशिवाय कंपनीला 22331 कोटींचा महसूल मिळाला. विप्रोने सुद्धा तिसऱ्या तिमाहीत 23229 कोटींचा महसूल मिळवला. कंपनीने पूर्ण वर्षासाठी 14.3% वृद्धीचा अंदाज वर्तवला आहे.