Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Income Tax: आयकर विभागाने 1 लाख करदात्यांना पाठवली नोटीस, अर्थमंत्र्यांनी सांगितलं कारण…

Income Tax

Image Source : www.rightsofemployees.com

आयकर रिटर्न भरताना करदात्यांना त्यांच्या उत्पन्नाचे स्त्रोत, वर्षभरात कमावलेला गुंतवणुकीवरील नफा, मालमत्तेच्या खरेदी-विक्रीतून कमावलेला नफा आदींचे विवरण द्यावे लागते. करदात्यांनी सादर केलेले विवरण आणि आयकर विभागाकडे असलेली उपलब्ध माहिती याचा ताळमेळ लागत नसल्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे.

सध्या देशभरात आयकर भरण्याची घाईगर्दी सुरु आहे. तुमच्यापैकी अनेकांनी आपला आयकर भरला असेलच, जर भरला नसेल तर लवकरात लवकर आयकर भरा. आयकर विभागाने जवळपास 1 लाख करदात्यांना नोटीस पाठवली आहे. हे करदाते वैयक्तिक करदाते आहेत. या करदात्यांनी आयकर रिटर्नमध्ये (ITR) घोषित केलेलं उत्पन्न आणि आयकर विभागाकडे असलेली माहिती याचा ताळमेळ लागत नसल्यामुळे हे पाऊल उचलण्यात आले आहे. याबद्दलची माहिती खुद्द अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली आहे. या 1 लाख नोटिसांचा निपटारा मार्च 2024 पर्यंत करण्याचे आव्हान आता आयकर विभागासमोर असणार आहे.

कुणाला पाठवली गेली नोटीस?

अर्थमंत्र्यांनी देलेल्या माहितीनुसार 50 लाखांपेक्षा जास्त आर्थिक उत्पन्न असलेल्या वैयक्तिक करदात्यांना आयकर विभागाने नोटीस पाठवली आहे. आयकर रिटर्न भरताना करदात्यांना त्यांच्या उत्पन्नाचे स्त्रोत, वर्षभरात कमावलेला गुंतवणुकीवरील नफा, मालमत्तेच्या खरेदी-विक्रीतून कमावलेला नफा आदींचे विवरण द्यावे लागते. करदात्यांनी सादर केलेले विवरण आणि आयकर विभागाकडे असलेली उपलब्ध माहिती याचा ताळमेळ लागत नसल्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे.

सर्व करदात्यांनी हे लक्षात घेतले पाहिजे की, तुमच्या बँक खात्याशी PAN कार्ड सलंग्न असते, तसेच आधार कार्ड देखील सलग्न असते. तुम्ही करत असलेल्या प्रत्येक आर्थिक व्यवहाराचा तपशील आयकर विभागाला मिळत असतो. त्यामुळे आयकर विवरण भरताना कुठलीही माहिती लपवू नका. करपात्र उत्पन्न जितके असेल तितके दाखवा आणि आवश्यक तो कर भरा. तसे न केल्यास तुम्हांला नाहक त्रास सहन करावा लागू शकतो.

काय होईल कारवाई?

आयकर विभागाच्या नियमानुसार करचोरीचा प्रयत्न केल्यास करदात्यांवर दंडात्मक कारवाई केली जाऊ शकते. तसेच उत्पन्नापेक्षा अधिक संपत्ती आढळल्यास आयकर विभाग त्याची शहनिशा करते आणि अवैध मार्गाने मिळवलेल्या संपत्तीची जप्ती देखील करू शकते. त्यामुळे एक सुजाण करदाता म्हणून आपण आपले आयकर विवरण वेळेत आणि योग्यरीत्या भरले पाहिजे. जेणेकरून संभाव्य अडचणी टाळता येऊ शकतील.