Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Annual Information Statement: करचुकवेगिरी पडेल महागात, आयकर विभागाकडे असते तुमच्या सर्व आर्थिक व्यवहारांची माहिती

Annual Information Statement

Income Tax: तुम्ही वर्षभरात कोणकोणते आर्थिक व्यवहार केले आणि किती नफा मिळवला, तसेच वेळेत कर भरला किंवा नाही याची माहिती आयकर विभागाकडे असते. त्यामुळे तुम्ही कर चुकविण्याचा प्रयत्न करत असाल तर सावधान! Annual Information Statement म्हणजे नेमके काय हे जाणून घ्या या लेखात.

तुम्ही कुठल्या कंपनीत पगारदार कर्मचारी म्हणून कामाला असाल तर तुम्ही तुमच्या पगारावर निर्धारित असलेला कर भरता. तो भरणे अनिवार्यच आहे. परंतु नोकरीतील पगाराव्यतिरिक्त  इतर कुठल्या मार्गाने जर तुम्ही पैसा कमावला असेल तर त्यावर देखील तुम्हाला कर भरावा लागतो. तुम्ही जर म्हणाल की पगारावरील कर भरला आहे, मग सरकारच्या नजरेत आपली दुसरी कमाई येणार नाही, तर जरा थांबा!

तुम्ही म्युच्युअल फंड, शेयर मार्केट आदी गुंतवणुकीतून जर नफा मिळवला असेल आणि त्यावर लागू असलेला कर दिला नसेल तर तुम्हांला हे महागात पडू शकते हे लक्षात घ्या. तुमचे Annual Information Statement आयकर विभागाकडे असते आणि त्याद्वारे तुम्ही वर्षभरात कोणकोणते आर्थिक व्यवहार केले आणि किती नफा मिळवला, तसेच वेळेत कर भरला किंवा नाही याची माहिती आयकर विभागाकडे असते.

Annual Information Statement म्हणजे काय?

वार्षिक माहिती विधान (AIS) हे एक दस्तऐवज आहे जे वित्तीय संस्थांद्वारे त्यांच्या ग्राहकांना जारी केले जाते, ज्यामध्ये आर्थिक वर्षातील त्यांच्या आर्थिक व्यवहारांचा तपशील असतो. तुम्ही तुमच्या आयकर खात्यावर जाऊन ऑनलाईन हे बघू शकता. 
1 नोव्हेंबर 2021 पासून भारत सरकारने ही प्रणाली आणली आहे. AIS ग्राहकाने वर्षभरात केलेल्या सर्व आर्थिक व्यवहारांचा सारांश सादर करते, त्यात मिळालेले व्याज, मिळालेला लाभांश आणि भांडवली नफा किंवा तोटा यांचा देखील यांत समावेश असतो. त्यामुळे आपण करत असलेल्या सर्व आर्थिक व्यवहारांची माहिती आयकर विभागाला असते. त्यामुळे जर करचुकवेगिरी करण्याचा प्रयत्न केला तर महागात पडू शकते हे लक्षात घ्या.

खाली दिलेल्या स्टेप्स वापरून तुम्ही तुमचे Annual Information Statement मिळवू शकता: 

  • स्टेप 1: https://www.incometax.gov.in/ URL वर लॉग इन करा
  • स्टेप 2: ई-फायलिंग पोर्टलवर यशस्वी लॉगिन केल्यानंतर ई-फायलिंग पोर्टलवरून "सेवा" टॅब अंतर्गत "Annual Information Statement(AIS)" वर क्लिक करा.
  • स्टेप 3: होमपेजवरील AIS टॅबवर क्लिक करा.
  • स्टेप 4: संबंधित FY (आर्थिक वर्ष) निवडा आणि Annual Information Statement वर क्लिक करा.

Annual Information Statement (AIS) चा सामान्य करदात्यांना देखील फायदा होत असतो.करदात्यांना याचा होणारा फायदा खालीलप्रमाणे:

कर भरताना स्पष्टता ( Helps in Tax Compliance): AIS वर्षभरात केलेल्या सर्व आर्थिक व्यवहारांचे एकत्रित माहिती करदात्याला उपलब्ध करून देते. त्यामुळे व्यक्ती आणि व्यवसायांना त्यांच्या करपात्र उत्पन्नाची माहिती मिळवणे, त्यांचे कर विवरण अचूकपणे भरणे सोपे जाते. हे कर कायद्यांचे योग्यरीत्या पालन करण्यास उपयोगी ठरते.

कर कपातीची पडताळणी Verification of Tax Deducted at Source (TDS): AIS मध्ये बँका, म्युच्युअल फंड आणि विमा कंपन्या यांसारख्या वित्तीय संस्थांद्वारे स्रोतावर वजा केलेल्या कराचे (TDS) तपशील असतात. AIS करदात्याला वित्तीय संस्थेने कापून घेतलेल्या TDSची पडताळणी करण्यास मदत करते. तसेच योग्य कर कापला गेला आहे किंवा नाही तसेच उत्पन्नापेक्षा अधिक कर कापला गेल्यास त्याचा परतावा मिळण्याची देखील खात्री याद्वारे केली जाते.

गुंतवणुक नियोजनात मदत Helps in Planning Investments: AIS वर्षभरात केलेल्या सर्व आर्थिक व्यवहारांचा सारांश प्रदान करते, ज्यामध्ये मिळालेले व्याज, मिळालेला लाभांश आणि भांडवली नफा किंवा तोटा यांचा समावेश होतो. ही माहिती व्यक्ती आणि व्यवसायांना त्यांच्या गुंतवणुकीचे अधिक चांगल्या प्रकारे नियोजन करण्यास मदत करते. याद्वारे आपण भरत असलेला कर वाचविण्यासाठी कोणत्या योजनांमध्ये गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल याचा अंदाज बांधता येतो.तसेच वर्षाचे आर्थिक नियोजन करण्यास देखील याचा फायदा होतो.