Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

PAN-Aadhar Link: तुमचंही पॅन-आधार लिंक फेल होत आहे का? मग या स्टेप्स फॉलो करा

Aadhar Pan Link

आयकर विभागाने पॅन-आधार कार्डवरील डेटा जुळत नसल्याने लिंक करताना अडचण येऊ शकते, याबाबत नागरिकांना सावध केले आहे. जर ही माहिती मिसमॅच होत असेल नागरिकांना इतर पर्याय दिले आहेत. बायोमेट्रिक अथाँटिकेशनद्वारे तुम्ही लिंक करू शकता. तसेच पॅन-आधारकार्ड आधी अपडेट करून पुन्हा लिंक करण्याच प्रयत्न करू शकता. लिंक करण्यासाठी लेखात दिलेल्या स्टेप्स फॉलो करा.

PAN-Aadhar Linking: पॅन-आधार कार्ड लिंक करण्याची शेवटची तारीख 30 जून आहे. अनेकवेळा मुदतवाढ देऊनही नागरिकांनी अद्यापही लिंक केले नाही. आता 30 जूननंतर पॅन आधार करण्यास मुदतवाढ मिळते की नाही याबाबत अद्याप घोषणा झाली नाही. मात्र, अजूनही वेळ गेलेली नाही. तुम्ही 30 जूनच्या आत लिंक करू शकता. 

अनेकांना पॅन-आधार लिंक करताना डेटा मिसमॅच होत असल्याचा एरर येत आहे. म्हणजेच आधार आणि पॅनवरील जन्मतारीख, लिंग, नाव अशी माहिती मॅच होत नाही. त्यामुळे लिंक करण्यात अडचणी येत आहेत. जर तुम्हालाही ही अडचण येत असेल तर खालील स्टेप्स फॉलो करा.

आयकर विभागानेही डेटा जुळत नसल्याने पॅन आधार लिंक करताना अडचण येऊ शकते असे म्हटले आहे. तसेच त्यावरील पर्यायांची माहिती ट्विटद्वारे दिली आहे. जर पॅन-आधारवरील माहिती जुळत नसले तर नागरिकांना दुसरा पर्याय दिला आहे. बायोमेट्रिक अथाँटिकेशनद्वारे तुम्ही लिंक करू शकता. तुमची ओळख पटण्यासाठी बायोमेट्रिकद्वारे प्रक्रिया केली जाईल. PAN कार्ड सेवा पुरवणाऱ्या (Protean & UTIITSL) सेंटर्समध्ये ही सुविधा दिली आहे. तुमच्या परिसरातील या सेंटरमध्ये जाऊन तुम्ही बायोमेट्रिक अथाँटिकेशन करू शकता.

पॅन-आधार लिंक कोणत्या कारणाने फेल होऊ शकते.

नावातील बदल 
जन्मतारिख
लिंग

लिंक करताना अडचण येत असेल तर या स्टेप्स फॉलो करा

स्टेप 1: खालील लिंकवर जाऊन पॅन कार्ड अपडेट करा. 
Protean- https://www.onlineservices.nsdl.com/paam/endUserRegisterContact.html
UTIITSL- https://www.pan.utiitsl.com/

स्टेप 2: खालील लिंकवर जाऊन आधार कार्ड अपडेट करा 

https://ssup.uidai.gov.in/web/guests/update

स्टेप 3: पॅन आधार लिंक करण्याचा पुन्हा प्रयत्न करा. 
https://eportal.incometax.gov.in/iec/foservices/#/pre-login/bl-link-aadhaar

स्टेप 4: पॅन-आधार अपडेट करुनही लिंक होत नसेल तर

पॅन सेंटरवर जाऊन तुम्ही बायमेट्रिक अथाँटिकेशन करू शकता. त्यासाठी 50 रुपये शुल्क द्यावे लागेल. UIDAI संकेतस्थळावरील माहितीनुसार जर आधार नावात किंचित बदल असेल तर मोबाइल नंबरवर ओटीपी पाठवून ओळख पटवली जाते. 

पॅनकार्डवरील नाव, जन्मतारीख आणि फोन नंबर करा अपडेट कराल?

स्टेप 1: NSDL च्या संकेतस्थळाला भेट द्या  
https://www.onlineservices.nsdl.com/paam/endUserRegisterContact.html

स्टेप 2: “अॅपलिकेशन टाइप” या टॅबवर जाऊन 'PAN correction' पर्याय निवडा आणि सर्व माहिती भरा 

स्टेप 3: कॅप्चा कोड टाकून माहिती सबमिट करा. 

स्टेप 4: टोकन क्रमांकासहित एक मेसेज तुम्हाला येईल.

स्टेप 5: "Continue with PAN Application Form" वर क्लिक करा.

स्टेप 6: तुमची पॅन अॅप्लिकेशनवरील माहिती चेक करा. योग्य ते बदल करून पेमेंट करा. त्यानंतर तुम्हाला एक पावती मिळेल. ही पावती तुम्हाला NSDL e-gov office मध्ये जमा करावी लागेल.