Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Leave Encashment: लिव्ह एनकॅश करताना कर भरावा लागतो का? जाणून घ्या नियम

Leave Encashment

नियुक्तीच्या वेळी पगार रचनेत (Salary Structure) अर्जित रजेबद्दल (Earned Leave) माहिती देण्यात येते. अर्जित रजा (Earned Leave)म्हणजे तुम्ही आजवर केलेल्या कामाच्या बदल्यात कमावलेली रजा होय. वैद्यकीय रजा आणि किरकोळ रजा कॅलेंडर वर्षात न वापरल्यास कालबाह्य होत असतात, परंतु अर्जित रजा (EL) ही पुढील कॅलेंडर वर्षात नेली जाते.लिव्ह एनकॅश करताना कर भरावा लागतो का? जाणून घ्या ...

कंपन्या, सरकारी संस्था, कार्यालये आपल्या कर्मचाऱ्यांना अनेक प्रकारच्या सुट्या देत असतात. काही सुट्ट्या या सार्वजनिक सणांशी संबंधित असतात तर काही पगारी रजा देखील दिल्या जातात.

तसे पाहायला गेले तर रजा हा कुठल्याही कर्मचाऱ्याचा आवडीचा विषय असतो. हक्काच्या सुट्ट्यांचे नियोजन आर्थिक वर्षाच्या सुरुवातीलाच कर्मचारी करत असतात. त्यानुसार लग्नकार्ये, पाहुण्यांच्या घरी भेटी, पर्यटन आदी विषयांचे पद्धतशीर नियोजन करणे सोयीस्कर जाते. सुट्ट्यांचे नियोजन करूनही अनेकदा काही सुट्ट्या शिल्लक राहतात.  

साधारणपणे, जर तुम्ही कंपनीने दिलेल्या सुट्ट्या घेऊ शकत नसाल तर त्याऐवजी तुम्हाला पैसे मिळण्याची सुविधा देखील दिली जाते. कर्मचाऱ्याच्या वेतनावर आधारित ही रक्कम असते.

किरकोळ रजा (Casual Leave), वैद्यकीय रजा (Medical Leave), अर्जित रजा (Earned Leave), प्रसूती रजा (Maternity Leave) इत्यादी प्रकारच्या रजा कामगार कायद्याच्या अनुषंगाने कर्मचाऱ्यांना दिल्या जातात.

लीव्ह एनकॅशमेंट (Leave Encashment)

नियुक्तीच्या वेळी पगार रचनेत (Salary Structure) अर्जित रजेबद्दल (Earned Leave)  माहिती देण्यात येते. अर्जित रजा (Earned Leave)म्हणजे तुम्ही आजवर केलेल्या कामाच्या बदल्यात कमावलेली रजा होय. वैद्यकीय रजा आणि किरकोळ रजा कॅलेंडर वर्षात न वापरल्यास कालबाह्य होत असतात, परंतु अर्जित रजा (EL) ही पुढील  कॅलेंडर वर्षात नेली जाते.

कॅलेंडर वर्षाला जर कुणा कर्मचाऱ्याला 21 अर्जित रजा मिळत असतील, त्यातील केवळ 10 रजा कर्मचाऱ्याने वापरल्या असतील आणि 11 अर्जित रजा जर शिल्लक राहत असतील तर अशा प्रकरणात शिल्लक अर्जित रजांच्या बदल्यात कर्मचाऱ्याला रक्कम दिली जाते. यालाच लीव्ह एनकॅशमेंट (Leave Encashment) म्हणतात.

काही कंपन्यांमध्ये शिल्लक अर्जित रजा एनकॅश करायची नसल्यास पुढच्या आर्थिक वर्षात या रजा समाविष्ट (Carry Forward)  केल्या जातात. लीव्ह एनकॅशमेंटशी संबंधित काही महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला माहिती असायला हव्यात.

Earned Leave किती?

या प्रकरणात, कंपन्यांचे किंवा सरकारी आस्थापनांचे नियम वेगवेगळे असू शकतात. जमा केलेली रजा एकूण अर्जित रजेच्या निम्म्या किंवा अर्जित रजेच्या 30 दिवसांपेक्षा जास्त नसावी.

अनेक कंपन्या वर्ष संपल्यानंतरच सुट्या एन्कॅश करतात. त्याचबरोबर काही कंपन्या कर्मचाऱ्याच्या राजीनाम्यानंतर उरलेल्या एकूण रजेचे (Full and Final) पैसे देतात.

रजा रोखीवर (Leave Encashment) कर लावला जातो का?

जेव्हा एखाद्या कर्मचाऱ्याने कंपनी सोडल्यानंतर जर  लिव्ह एनकॅशमेंट केली तरच त्यावर कर सवलत दिली जाते. जर कर्मचारी सेवेत असताना रजा रोखीचा फाय्दां घेत असेल तर त्याला उत्पन्नच मानले जाते. त्या रकमेवर सरकारी नियमानुसार कर लावला जातो. कर्मचार्‍याच्या मृत्यूनंतर त्याच्या कायदेशीर वारसाला मिळालेली रजा रोख रक्कम देखील करमुक्त आहे.

कोणाला मिळते कर सवलत? 

जर तुम्ही केंद्र किंवा राज्य सरकारचे कर्मचारी असाल तर तुम्हाला तुमच्या लिव्ह एनकॅशमेंटवर कोणताही कर भरावा लागणार नाही. परंतु, जर तुम्ही कुठल्या सरकारी कंपनीत किंवा संस्थेत कार्यरत असाल तर तुमची लिव्ह एनकॅशमेंट कराच्या कक्षेत येईल.