या वर्षापासून राज्यातील शेतकऱ्यांना एक रुपयात पंतप्रधान पीक विमा योजनेचा (PMFBY) लाभ घेता येणार आहे. खरीप हंगामासाठी पीक विमा भरण्याची अंतिम तारीख 31 जुलै 2023 पर्यंत आहे. दरम्यान या पीक विमा योजनेसाठी शेतकऱ्यांना ऑनलाईन पीक नोंदणी करणे आवश्यक ही नोंदणी कशा प्रकारे करायची त्यासाठी कोणकोणती कागदपत्रे आवश्यक आहेत. त्याबाबतची माहिती आज आपण जाणून घेऊयात.
Table of contents [Show]
काय ही योजना काय आहे?
Pradhan Mantri Fasal Bima Yojana (PMFBY) अंतर्गत शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी ‘विमा संरक्षित रकमेच्या 2 टक्के रक्कम’ रब्बी हंगामासाठी विमा संरक्षित रकमेच्या 1.5 टक्के रक्कम तर नगदी पिकांसाठी खरीप आणि रब्बी हंगामात विमा संरक्षित रकमेच्या 5 टक्के रक्कम भरावी लागत होती.मात्र, यंदाच्या हंगामासाठी राज्य सरकारने शेतकऱ्यांना एक रुपयात पीक विमा योजना सुरु केली आहे. यासाठी शेतकऱ्यांना पीक विमा संकेतस्थळावर नावनोंदणी करावी लागणार आहे. त्यानुसार शेतकऱ्यांची नोंदणी एक रुपयात होणार असून उर्वरित रक्कम राज्य सरकार भरणार आहे.
पीक विमा योजना कोणासाठी आहे?
एक रुपयात पीक विमा (crop Insurance in one rupees) ही योजना राज्यातील अधिसूचित पिकांसाठी आणि अधिसूचित क्षेत्रासाठीच लागू आहे. त्यानुसार कर्जदार आणि बिगरकर्जदार शेतकऱ्यांसाठी ही ऐच्छिक योजना आहे. कुळाने, खंडाने शेती करणारे शेतकरी यासाठी पात्र आहेत. मात्र यासाठी भाडेकरार हा नोंदणीकृत असला पाहिजे. तसेच मृत शेतकऱ्यांच्या नावाने विमा काढता येणार नाही. तो रद्द केला जाणार आहे.
कोणकोणत्या पिकांसाठी विमा?
पीक पेरणीपासून काढणीपर्यंतच्या काळामध्ये जर नैसर्गिक आपत्ती आल्यास पिकाचे जे नुकसान होईल यासाठी हा पीक विमा दिला जाणार आहे. कापूस, कांदा भात, ज्वारी, बाजरी, नाचणी, मूग, उडीद, तूर आणि मका. गहू, हरभरा,भुईमूग, कारळे, तीळ, सूर्यफूल, सोयाबीन. या पिकासांठी ही विमा योजना लागू असेल शिवाय ई-पीक पाहणीतील क्षेत्र गृहीत धरले जाणार आहे.
शेतकऱ्यांना कधीपर्यंत नोंदणी करता येईल?
या योजनेला लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना खरीप हंगामातील पिकांसाठी पीक विमा नोंदणी मूदत 31 जुलैपर्यंत आहे. यासाठी पीक विमा संकेतस्थळावर (https://pmfby.gov.in/) ऑनलाइन नोंदणी करावी लागणार आहे. तसेच रब्बी हंगामातील पिकांना पीक विमा घेण्यासाठी 30 नोव्हेंबपर्यंत संकेतस्थळावर नोंदणी करावी लागणार आहे.
आवश्यक कागदपत्रे-
- पीक पेरणी केलेल्या क्षेत्राचा 7/12 बारा उतारा आणि 8 अ
- भाडेकराराने शेती केली असल्यास कराराची प्रत
- बँक खाते क्रमांक
- आधार कार्ड, आधार कार्ड रजिस्टर मोबाईल क्रमांक
- पीक पेरा प्रमाणपत्र
कसा करायचा अर्ज-
- सर्वप्रथम तुम्हाला प्रधानमंत्री फसल विमा योजनेच्या अधिकृत वेबसाइट (https://pmfby.gov.in/ ) वर जावे लागेल.
- यानंतर वेबसाइटवर फार्मर कॉर्नर (Farmer Corner)वर क्लिक करा.
- यानंतर Farmer Application पेजवर Guest Farmer या पर्यायावर क्लिक करा
- तेथील नोंदणी फॉर्ममध्ये तुमची आवश्यक असलेली सर्व माहिती भरा
- शेतकरी आयडी मध्ये तुम्ही तुमचा आधार कार्ड क्रमांक टाका
- सर्व माहिती भरल्यानंतर खाली दिलेला कॅप्चा कोड टाकून सबमिट करा.
- त्यानंतर तुमचे नोंदणी खाते तयार होईल.
नोंदणी पूर्ण झाल्यानंतर तुम्ही पीक विमा योजनेसाठी पुन्हा Farmer Corner page वर क्लिक करा.
- तिथे Apply For crop Insiurance या पर्यायावर क्लिक करा
- त्यानंतर तिथे तुमचा फॉर्म ओपन होईल, त्यात तुमची माहिती दिसेल
- तिथे तुम्हाला वारसदाराचे नाव भरायचे आहे
- पुढे बँके खात्याची माहिती द्यायची आहे
- पुढे तुम्हाला शेती आणि पिकाची माहिती द्यायची आहे
- तुमच्या क्षेत्रफळाची माहिती, महसूल मंडळाची माहिती द्यावी
- पीक पद्धतीची माहिती द्यावी एक पीक , बहु पीक याची माहिती द्यावी
- पीक विम्याचा रेशो तुम्हाला (एकूण लागवडीखालील क्षेत्रफळाची माहिती तुम्हाला द्यायची आहे)
- त्यानंतर तुम्हाला पेरणीची तारीख टाकायची आहे.
- सातबाऱ्यावरील सर्वे क्रमांक टाकायचा आहे( भूमापक क्रमांक, खासरा -8अ वरील माहिती)
- त्यानंतर पीक हंगाम (रब्बी / खरीप), वर्ष, योजनेचे नाव, तुमच्या राज्याचे नाव, जिल्हा आणि पीक इ माहिती द्यावी
कागदपत्रे अपलोड करणे आणि एक रुपया भरणे-
- बँक पासबूक कॉपी
- डिजिटल 7/12 बारा उतारा आणि 8 अपलोड करा
- पीक पेरा प्रमाणपत्र अपलोड करा
- गरजेचे असल्यास सामाईक सहमतीपत्र जोडावे
- ही कागदपत्रे अपलोड केल्यानंतर तुम्हाला हा फॉर्म सबमिट करायचे आहे
- त्यानंतर तुम्हाला Payment करायचे आहे
- तुम्हाला फक्त एक रुपया भरायचा आहे.
- तुम्ही UPI च्या माध्यमातून भरू शकता (फोन पे, गुगल पे, ई)
- त्यानंतर तुम्ही तुमचा अर्ज भरल्याची माहिती प्रिंट करून घेऊ शकता
अशा पद्धतीने तुम्ही एक रुपयात पीक विमा घरबसल्या भरू शकता