Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Is Retiring at 40 possible! नोकरीपूर्वीच निवृत्ती अर्थात वयाच्या 40 व्या वर्षी रिटायरमेंट शक्य आहे का? जाणून घ्या

retire at 40

Is Retiring at 40 possible! “अर्ली रिटायरमेंट” म्हणजे तुमच्या करियरचा शेवट नाही, तर आयुष्याची सुरुवात आहे. कोणतेही कर्ज नसेल, समाधानकारक आयुष्य व्यतित व्हावे इतकी पुरेशी बचत असेल. आणि हे आयुष्यध्येय साध्य करण्यासाठी एक संकल्पना, F.I.R.E. अर्थात Financial Independence, Retire Early ही विशेष लोकप्रिय होताना दिसतेय.

Retirement is wonderful. It's doing nothing without worrying about getting caught at it. तुम्हाला देखील असं "अलार्म क्लॉक-रहित" आयुष्य जगायचंय का !!! जेव्हा वॉल-क्लॉक तुमच्यावर नजर ठेवून असणार नाही, रिस्ट-वॉच तुमच्या चालण्या-धावण्याचा वेग ठरविणार नाही, स्क्रीन-क्लॉक तुमचे आवडते गाणे अर्धवट बंद करायला फोर्स करणार नाही, सँड-क्लॉक फक्त एक खेळणं असेल, कॅलेंडर-पेजच्या मागील बाजूला तुम्ही तुमचे आवडते चित्र काढत असाल किंवा तुमच्या "सुपर-बॉस"च्या आवडीची रेसिपी त्या घरी येण्याआधीच तुम्ही प्रिपेअर करून ठेवलेली असेल !!!! आणि हे सर्व करीत असताना तुम्ही नुकताच तुमचा ४० वा वाढदिवस साजरा केला असेल तर !!!!

हे सर्व काही शक्य आहे जर तुम्ही तुमची "अर्ली रिटायरमेंट" अगदी तरुण वयामध्येच प्लॅन करू ठेवली असेल तर !!! तुम्हाला 40 व्या वर्षी निवृत्त व्हायचे असेल तर आर्थिक स्वातंत्र्य (म्हणजेच financial freedom) मिळवणे हे तुमचे लक्ष्य असले पाहिजे. सामान्य भारतीय व्यक्ती वयाच्या ६० ते ६५ वर्षांपर्यंत सेवानिवृत्ती स्वीकारते. पण मग त्यानंतर वाचविलेल्या पैशानी “उर्वरित आयुष्य” जगण्यासाठी जागा शिल्लकच अशी कितीशी असते !!! आणि “अर्ली रिटायरमेंट” म्हणजे तुमच्या करियरचा शेवट नाही, तर आयुष्याची सुरुवात आहे. कोणतेही कर्ज नसेल, समाधानकारक आयुष्य व्यतित व्हावे इतकी पुरेशी बचत असेल. आणि हे आयुष्यध्येय साध्य करण्यासाठी एक संकल्पना,  F.I.R.E. अर्थात Financial Independence, Retire Early ही विशेष लोकप्रिय होताना दिसतेय.

”फायर” संकल्पनेचा गाभा म्हणजे आत्यन्तिक पद्धतशीर बचत करणे आणि गुंतवणुकीसह भरीव फंड उभा करणे. आणि याच करीता तुम्ही तुमची सर्व कर्जे फेडून रिटायरमेंटपूर्वी “निष्क्रिय उत्पन्न” अर्थात एक Passive Income तयार करणे, यांवर लक्ष्य केंद्रित केले असणे आवश्यक आहे. १९९४ साली विल्यम बेन्जेन या अमेरिकन आर्थिक सल्लागाराने मांडलेला नियम “४ टक्क्यांचा  नियम” म्हणून ओळखला जातो. या सूत्रानुसार, तुमचा रिटायरमेंट फंड हा तुमच्या वार्षिक खर्चाच्या २५ पट असला पाहिजे, त्यामुळे तुम्हाला दरवर्षी आपल्या निधीमधून ४% रक्कम काढता येऊ शकेल. मात्र, दरवर्षी ४% रक्कमच खर्च करण्याची अपेक्षा हा नियम ठेवतो. 

महागाई किंवा अनिश्चित आर्थिक आवश्यकता हा नियम गृहीत धरत नाही. याचबरोबर हा नियम हे देखील गृहीत धरतो की  तुमचे उत्पन्न देखील खूप जास्त आहे. अन्यथा, वयाच्या ४० व्या वर्षापर्यंत पुरेशी संपत्ती निर्माण करण्याचा दुसरा मार्ग नाही. आणि म्हणूनच FIRE हा सिद्धांत प्रत्येकासाठी कार्य करत नाही. ६% महागाई दर (inflation rate) आणि नियमितपणे बदलत राहणारा Income Tax slab असणाऱ्या आपल्या भारतासारख्या देशामध्ये तर हा सिद्धांत अगदी मोजक्या लोकांच्या बाबतीमध्ये लागू पडू शकेल. अर्थात त्यासाठी “अर्ली रिटायरमेंट” घेऊ इच्छिणाऱ्या व्यक्तीला त्याच्या वार्षिक खर्चाच्या किमान ३० पटीमध्ये रिटार्यरमेन्ट फंड क्रिएट करून ठेवणे, ही एक सुरक्षित बेट ठरेल.

कर्ज, आर्थिक जबाबदाऱ्यांतून मुक्ती आणि काटेकोर नियोजन  

  • यासाठी सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या नोकरी/व्यवसायाच्या सुरुवातीच्या दिवसापासूनच खूप जास्त पद्धतशीरपणे बचत आणि गुंतवणूक (savings & investments) यावर भर देणे आवश्यक आहे. 
  • तुमच्या वार्षिक खर्चाचा अंदाज लावणे, हे या प्लॅनिंगची पहिली पायरी असू शकेल. शिवाय बचत फक्त कार्यरत असतानाच्या काळातच नव्हे, तर रिटायरमेंट नंतर देखील करत राहण्यासाठी निष्क्रिय उत्पन्नाचा स्रोत क्रिएट केला गेलेला असणे आवश्यक आहे. 
  • यासाठी तुम्ही सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF) आणि म्युच्युअल फंड यांसारख्या तुलनात्मकदृष्ट्या उच्च दराने आणि स्थिर परतावा (Returns) देणारी आर्थिक उपकरणे (financial instruments ) गुंतवणूक करण्यासाठी निवडू शकता. 
  • सर्वात महत्वाचे म्हणजे तुमची बचत आणि तुमचे रिटायरमेंट-काळामधील निष्क्रिय स्त्रोतांपासून येणारे उत्पन्न खाऊ शकणाऱ्या सर्व प्रकारच्या कर्जांपासून आणि आर्थिक जबाबदाऱ्यांपासून तुम्ही मुक्त झालेले असणे आवश्यक आहे.