Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

युपीआयद्वारे (UPI) पैसे पाठवताना लाभार्थ्याची नोंदणी आवश्यक आहे का? जास्तीत जास्त किती पैसे पाठवू शकतो?

युपीआयद्वारे (UPI) पैसे पाठवताना लाभार्थ्याची नोंदणी आवश्यक आहे का? जास्तीत जास्त किती पैसे पाठवू शकतो?

युनीफाईड पेमेंट्स इंटरफेस (UPI) ही भारतीय नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन (NPCI) द्वारे विकसित केलेली एक झटपट पेमेंट प्रणाली आहे. UPI हे IMPS इन्फ्रास्ट्रक्चरवर तयार करण्यात आले आहे. या प्रणालीद्वारे ग्राहकाला दोन वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये लगेच पैसे ट्रान्सफर करता येतात.

Table of contents [Show]

युपीआय (UPI) म्हणजे काय?

UPI म्हणजे काय (1)

युनीफाईड पेमेंट्स इंटरफेस (UPI) ही भारतीय नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन (NPCI) द्वारे विकसित केलेली एक झटपट पेमेंट प्रणाली आहे. UPI हे IMPS इन्फ्रास्ट्रक्चरवर तयार करण्यात आले आहे. या प्रणालीद्वारे ग्राहकाला दोन वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये लगेच पैसे ट्रान्सफर करता येतात.

युपीआय-पिन (UPI-PIN) म्हणजे काय?

register-sign-up-membership-concept

युपीआय-पिन (UPI-PIN) हा 4 ते 6 अंकांचा पर्सनल आयडेंटिफिकेशन नंबर आहे; जो तुम्ही अॅप डाऊनलोड केल्यानंतर नोंदणीसाठी तयार करता. युपीआयद्वारे केल्या जाणाऱ्या बॅंकेच्या सर्व व्यवहारांसाठी UPI-PIN टाकावा लागतो. तुम्ही इतर युपीआय अॅप्ससह आधीच UPI-PIN सेट केला असल्यास तुम्ही तो भीम अॅपवर (BHIM App) वापरू शकता. 
(सूचना : बँकांनी जारी केलेला MPIN हा युपीआयमधील UPI-PIN पेक्षा वेगळा असतो. भीम अॅपमध्ये नवीन UPI-PIN तयार करावा लागेल. तुमचा UPI-PIN कोणाशीही शेअर करू नका.)

युपीआय IMPS पेक्षा वेगळे कसे आहे?

UPI मध्ये खालीलप्रमाणे IMPS (Immediate Payment Service) पेक्षा वेगळे आहे:
1. पिअर टू पिअर (Peer to Peer) पूल कार्यक्षमता प्रदान करते
2. व्यापारी पेमेंट सुलभ करते
3. पैसे पाठवण्यासाठी एकच अॅप
4. एकाच क्लिकवर दोन घटकांचे प्रमाणीकरण

युपीआय (UPI) द्वारे ऑनलाईन पैसे कसे देता येतात?'

money-transfer-gfa6f70e0c_1280

ऑनलाईन खरेदी केल्यावर युपीआय (UPI) द्वारे पेमेंट करू शकता. जेव्हा तुम्ही पैसे देताना  UPI पेमेंट पर्याय निवडता. तेव्हा त्यावर क्लिक केल्यावर, तुम्हाला तुमचा पेमेंट अॅड्रेस (Payment Address) उदाहरणार्थ xyz@upi टाकावा लागतो. पेमेंट अॅड्रेस टाकल्यावर, BHIM अॅपवर कलेक्ट रिक्वेस्ट मिळेल. तिथे UPI-PIN टाकला की तुमचे पेमेंट पूर्ण होईल.

पैसे ट्रान्सफर करण्यापूर्वी लाभार्थीची नोंदणी करणे आवश्यक आहे का? लाभार्थीचे कोणते तपशील आवश्यक असतात?

businessmen-signed-joint

पैसे ट्रान्सफर करण्यापूर्वी लाभार्थीची नोंदणी करणे आवश्यकता नाही. कारण युपीआयद्वारे पैसै पाठवताना ते व्हर्च्युअल आयडी/खाते+IFSC/आधार क्रमांकाच्या आधारे ट्रान्सफर केले जातात.

व्यवहार "प्रलंबित" दर्शवत असताना, रक्कम डेबिट किंवा जमा झाली नाही तर काय होते? 

small-business-qr-code-cashless-payment-store

अशावेळी तुमचा व्यवहार यशस्वीरीत्या झालेला असतो. पण, ज्याला पैसे पाठवले आहेत, त्याच्या बॅंकेतील काही तांत्रिक अडचणीमुळे किंवा ती प्रक्रिया पूर्ण होण्याच्या प्रक्रियेमुळे प्रलंबित (Pendign) असा संदेश दिसतो. बँकेकडून ती प्रक्रिया पूर्ण झाल्यावर 48 तासांत ट्रान्सफर केलेली रक्कम संबंधिताला मिळते.

युपीआयसाठी बँक खाते आवश्यक आहे का? की ते कार्ड किंवा वॉलेटशी जोडले जाऊ शकते?

credit-card-g9c9db3d45_1280

पूर्वी युपीआयसाठी संबंधिताला फक्त बँक खाते लिंक करण्याची परवानगी होती. पण आता UPI मध्ये PPI (Prepaid Payment Instruments) वॉलेट (Wallet) देखील लिंक करू शकतात. 

युपीआयद्वारे पैसे ट्रान्सफर करण्यासाठी कोणती माध्यमे आहेत?

omni-channel-technology-online-retail-business

युपीआयद्वारे पैसे ट्रान्सफर करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची माध्यमे आहेत. जसे की, व्हर्च्युअल आयडीद्वारे पैसे पाठवता किंवा स्वीकारता येतात. तसेच बॅंक खाते क्रमांक + आयएफएससी क्रमांक (IFSC) आणि आधार क्रमांकाद्वारे पैसे पाठवता येतात.

खात्यातून पैसे डेबिट झाले, पण तरीही व्यवहार पूर्ण न झाल्यास काय करावे?atm-operation-bank

अशावेळी युपीआयद्वारे डेबिट झालेली रक्कम त्वरित पैसे पाठवणाऱ्याच्या खात्यात जमा केली जाते. जर ती रक्कम त्वरित जमा न झाल्यास बँकेशी संपर्क साधू शकता.

युपीआय व्यवहाराशी संबंधित तक्रार कोठे नोंदवता येते?

complaint-form-computer-office

युपीआय अॅपद्वारे युपीआय व्यवहाराची स्थिती तपासू शकतो किंवा त्याबाबत तक्रार ही नोंदवू शकतो.

युपीआयद्वारे पैसे पाठवण्यावर काही मर्यादा आहे का?

piggy-bank-gbdd81b323_1280

सध्या, प्रति युपीआय व्यवहाराची कमाल मर्यादा 2 लाख रूपये आहे.

युपीआयद्वारे केलेला व्यवहार अयशस्वी झाला आहे. पण बँक खात्यातून पैसे डेबिट झाले असतील तर काय?

credit-card-data-security-unlock-payment-shopping-online-smartphone

युपीआयद्वारे केलेला व्यवहार अयशस्वी झाल्यास पैसे खात्यात परत जमा केले जातात. काहीवेळा यास जास्त वेळ लागतो. जर 1 तासाच्या आत पैसे जमा झाले नाही तर बँकेशी संपर्क साधा.