Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Indian Railway : तांत्रिक समस्येमुळे IRCTC ची तिकीट सेवा बंद; ग्राहकांचे पैस झाले कट

Indian Railway : तांत्रिक समस्येमुळे IRCTC ची तिकीट सेवा बंद; ग्राहकांचे पैस झाले कट

काही तांत्रिक अडथळ्यामुळे आयआरसीटीसीची तिकीट (ticket) सेवा बंद पडली आहे. या संदर्भात IRCTC कडून ट्विट करून माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे रेल्वे प्रवाशांनी तुर्तास IRCTC च्या वेबसाईट अथवा ॲपच्या माध्यमातून तिकीट बूक करणे शक्यतो टाळावे. कारण, तांत्रिक अडचणीमुळे तिकीट बुक करण्याच्या प्रयत्नात तुमचे पैसे कापले जाण्याची शक्यता आहे.

रेल्वेने प्रवास करण्यासाठी  आपण IRCTC ची वेबसाईट अथवा ॲपच्या माध्यमातून तिकीट बुकिंग करण्यास प्राध्यान देतो. मात्र, आता काही तांत्रिक अडथळ्यामुळे आयआरसीटीसीची ही तिकीट (ticket) सेवा बंद पडली आहे. या संदर्भात IRCTC कडून ट्विट करून माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे रेल्वे प्रवाशांनी तुर्तास IRCTC च्या वेबसाईट अथवा ॲपच्या माध्यमातून तिकीट बुक करणे शक्यतो टाळावे. कारण, तांत्रिक अडचणीमुळे तिकीट बुक करण्याच्या प्रयत्नात तुमचे पैसे कापले जाण्याची शक्यता आहे.

तिकीट बुकिंगची सेवा काही काळासाठी बंद

Indian Railway Catering and Tourism Corporation (IRCTC) वेबसाईट डाऊन झाल्याने प्रवाशांना तिकीट बुक करण्यासाठी समस्या निर्माण झाल्या आहेत. या प्रकरणी प्राप्त झालेल्या तक्रारीनंतर IRCTC कडून  तूर्तास वेबसाईट आणि अॅपवर  तिकीट बुकिंग सेवा बंद राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. तांत्रिक कारणांमुळे ही समस्या निर्माण झाली असून काही काळासाठी तिकीट बुकिंगची सेवा ग्राहकांसाठी उपलब्ध नसेल. तसेच रेल्वेच्या तांत्रिक विभागाची टीम हा अडथळा व्यवस्थित करत असून सेवा पूर्ववत होताच प्रवाशांना सूचित करण्यात येणार असल्याची माहिती IRCTC ट्विट करून दिली आहे.

तिकिटासाठी इतर माध्यमांचा वापर करावा

IRCTC च्या वेबसाईट आणि अॅपला अडथळा निर्माण झाल्याने प्रवाशांनी तुर्तास इतर ऑनलाईन ॲपच्या माध्यमातून रेल्वेचे तिकीट बूक करण्याचेही आवाहन रेल्वेकडून करण्यात आले आहे. प्रवाशांनी ॲमेझॉन (Amazon) मेकमाय ट्रिप (MakeMyTrip) या सारख्या वेबसाईटचा वापर करून तिकीट बुक करावे असे IRCTC कडून सूचित करण्यात आले आहे.

प्रवाशांचे पैसे झाले कट-

भारतीय रेल्वेच्या IRCTC वेबसाईट आणि ॲपवर काही तांत्रिक अडथळे निर्माण झाल्याने अनेक प्रवाशी ग्राहका्ंना तिकीट बूक करण्यात अडथळे निर्माण होत आहेत. या संदर्भात अनेकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून IRCTC कडे तक्रारी केल्या आहेत. तसेच काही प्रवाशांनी तिकीट बुक करण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्या बँक खात्यातून तिकिटाचे पैसे कट झाले पात्र तिकीट बूक झाले नसल्याचे प्रकार समोर आले आहेत. तसेच तत्काळ तिकीट बुक करण्याचा प्रयत्न केला.त्यासाठी पेमेंट कट झाले मात्र तिकीट बुकिंग झाले नसल्याची तक्रार एका प्रवाशाकडून करण्यात आली आहे. दरम्यान कट झालेल्या पैशासंदर्भात रेल्वेकडून अद्याप कोणतेही स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही.