जर तुम्हाला धार्मिक स्थळाला भेट द्यायची असेल तर रेल्वे (IRCTC Tour Package) तुमच्यासाठी खास ऑफर घेऊन आली आहे. या ऑफर अंतर्गत तुम्ही ज्योतिर्लिंगाचे दर्शन (Jyotirlinga Yatra) घेऊ शकाल. हा प्रवास 9 दिवसांचा असला तरी त्याचे भाडे खूपच कमी आहे. 9 दिवसांच्या संपूर्ण प्रवासासाठी तुम्हाला फक्त 21,390 रुपये मोजावे लागतील. विशेष म्हणजे या रेल्वे प्रवासात तुम्हाला राहण्याची आणि जेवणाची सर्व सुविधा मोफत मिळणार आहेत.
आयआरसीटीसीचे ट्विट
आयआरसीटीसी (IRCTC) ने ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासंदर्भात अधिकृत ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये IRCTC ने सांगितले आहे की, प्रवासी 5 ज्योतिर्लिंगांना भेट देऊ शकतील. जयपूर येथून हा प्रवास सुरू होईल. त्याच्या पॅकेजची संपूर्ण माहिती मिळवूया.
- पॅकेजचे नाव - 05 ज्योतिर्लिंग यात्रा
- सहलीचा कालावधी - 8 रात्री / 9 दिवस
- प्रवासाची तारीख - 4 फेब्रुवारी 2023
- प्रवासाची सुरुवात आणि शेवट - जयपूर - नाशिक - औरंगाबाद - पुणे - द्वारका - वेरावळ - जयपूर
- जागांचा क्रमांक - 600
- बोर्डिंग आणि डी-बोर्डिंग पॉइंट - जयपूर - अजमेर - भिलवाडा - चंदेरिया – उदयपूर
पॅकेज किंमत
IRCTC च्या या पॅकेजमध्ये 600 जागा आहेत. ज्यामध्ये 300 स्टँडर्ड जागा आहेत आणि 300 सुपीरिअर जागा आहेत. स्टँडर्ड सीटवरील सिंगल ऑक्युपन्सीचे भाडे प्रति व्यक्ती 27,810 रुपये आहे. तर डबल आणि ट्रिपल ऑक्युपन्सीत प्रति व्यक्ती 21,390 रुपये असेल. त्याचप्रमाणे, सिंगल ऑक्युपन्सीसाठी स्टँडर्ड श्रेणीमध्ये प्रति व्यक्ती 31,500 रुपये भरावे लागतील. येथे, डबल ऑक्युपन्सीसाठी 24,240 रुपये भरावे लागतील. 05 ज्योतिर्लिंग यात्रेत 5 ते 11 वर्षे वयोगटातील मुलासाठी सुपेरिअर कॅटेगरीसाठी 21,810 रुपये आणि स्टँडर्ड कॅटेगरीसाठी 19,260 रुपये द्यावे लागतील.