सध्या सगळीकडे फेस्टिव्ह ऑफर्सची धूम पाहायला मिळत आहे. त्यात आता IRCTC ने देखील ग्राहकांना ऑफर दिली असून IRCTC Air वरुन फ्लाईटचे तिकीट बुक केल्यावर सुविधा शुल्क माफ केले जाणार आहे. यासाठी तुम्हाला बुकींग 25 सप्टेंबर ते 27 सप्टेंबरपर्यंत करावी लागणार आहे. कंपनीला 27 सप्टेंबरला 24 वर्ष पूर्ण होत आहे. त्यामुळे IRCTC ने त्यांच्या ग्राहकांना ही छोटी भेट दिली आहे.
IRCTC Air वेबसाईटवरुन करा बुकींग
तुम्हाला या ऑफर्सचा लाभ घ्यायचा असल्यास, तुम्हाला बुकींग 25, 26 आणि 27 सप्टेंबरपर्यंत करता येणार आहे. या तारखांना तुम्ही फ्लाईटचे तिकीट बुक केल्यास तुम्हाला सुविधा शुल्क देण्याची गरज पडणार नाही. त्यामुळे तुमचा या तारखांदरम्यान बाहेर फिरायला जायचा प्लॅन असल्यास तुम्ही या ऑफर्सचा लाभ घेऊ शकणार आहात. यासाठी तुम्हाला IRCTC Air च्या वेबसाईटवर जाऊन बुकींग करावी लागणार आहे.
It's time to create great #travel ? plans with #IRCTCAir as IRCTC unveils its zero-convenience fee offer for flight ✈️ bookings as part of its foundation day celebrations. #IRCTC24Years #IRCTCAirOfferLaunch #FlightDeals pic.twitter.com/A1rLXO61A0
— IRCTC (@IRCTCofficial) September 21, 2023
किती होईल बचत?
जेव्हा आपण तिकीट बुक करतो, तेव्हा तिकीटांच्या पैशांव्यतिरिक्त ही पैसे चार्ज केल्या जातात, ज्यालाच सुविधा शुल्क म्हटल्या जाते. मात्र, तुम्हाला IRCTC Air ऑफरमुळे जास्तीचे पैसे चार्ज करायची गरज पडणार नाही. त्यामुळे तुम्ही IRCTC Air च्या वेबसाईटवरुन या तारखांदरम्यान बुक केल्यास 59 रुपयांची बचत करु शकणार आहात. कारण, IRCTC Air 59 रुपये सुविधा शुल्क आकारते.
अन्य ऑफर्सचा घेता येणार लाभ
IRCTC ग्राहकांना वेळोवेळी फ्लाईट बुकींग ऑफर देत असते. जर तुमच्याजवळ SBI VISA कार्ड असेल तर तुम्हाला 5 टक्क्यांपर्यत व्हॅल्यू बॅक देण्यात येतो. तसेच, तुम्ही EMI नेटवर्क कार्डचा वापर करत असल्यास BJFINIRCTC कोडचा वापर करुन 300 रुपयांपर्यतचा डिस्काउंट मिळवू शकणार आहात.