Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

IPO Investment 2022 : या आठवड्यात ₹2387 कोटी किमतीचे तीन आयपीओ बाजारात

IPO INVESTMENT

या आठवड्यात फर्टिलायजर कंपनी पारादीप फॉस्फेटस (Paradeep Phosphates), महागडी घड्याळं बनवणारी कंपनी इथॉस (Ethos Limited) आणि ई मुद्रा (eMudhra) या 3 कंपन्यांचा आयपीओ येत आहे. या तीन कंपन्यांची मार्केट साईज 2386.81 कोटी रुपये आहे.

एलआयसीच्या आयपीओने मे महिन्यात सर्व प्रकारच्या गुंतवणूकदारांना चांगलीच भुरळ घातली होती. प्रथमच आयपीओमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या बरीच होती. अखेर एलआयसीचा आयपीओ (LIC IPO) आला. मंगळवारी दि. 17 मे रोजी त्याचे लिस्टिंग होणार आहे. गुंतवणूकदारांनी एलआयसीच्या आयपीओला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. पण ग्रे मार्केटमधील प्रीमियममुळे गुंतवणूकदारांमध्ये चिंतेचे वातावरण होते. दरम्यान, आता पुन्हा एकदा गुंतवणूकदारांना आयपीओद्वारे (Initial Public Offer - IPO) पैसे कमावण्याची तिहेरी संधी उपलब्ध झाली आहे. फर्टिलायजर कंपनी पारादीप फॉस्फेटस (Paradeep Phosphates) कंपनीचा आयपीओ 17 मे, महागडी घड्याळं बनवणारी कंपनी इथॉसचा (Ethos Limited) आयपीओ 18 मे आणि ई मुद्राचा (eMudhra) आयपीओ 20 मे रोजी येणार आहे. या तीन कंपन्यांची मार्केट साईज 2386.81 कोटी रुपये आहे.

पारादीप फॉस्फेटस (Paradeep Phosphates)

पारादीप फॉस्फेट्स ही कंपनी भारतातील नॉन-युरिया खतांची उत्पादक असून याची स्थापना 1981 मध्ये झाली आहे. कंपनी जय किसान-नवरत्न आणि नवरत्न या ब्रँडच्या नावाखाली विविध प्रकारच्या खतांचे उत्पादन, व्यापार, वितरण आणि विक्री करते. 

पारादीप फॉस्फेटस लिमिटेड कंपनीचा आयपीओ मंगळवारी दि. 17 मे रोजी ओपन होणार असून गुरूवारी दि. 19 मे रोजी बंद होणार आहे. याची एकूण किंमत 1501.73 कोटी रूपये आहे. याची प्राईस बॅण्ड 39 ते 42 रुपये या दरम्यान निश्चित केली आहे आणि याचा लॉट साईज 350 आहे. केंद्र सरकार या आयपीओद्वारे या कंपनीतील 19.55 टक्के हिस्सा विकणार आहे. कंपनी आयपीओद्वारे 1004 कोटी रुपयांचे नवीन शेअर्स जारी करणार आहे. तर प्रमोटर्स आणि इतर गुंतवणूकदारांसाठी 11.85 कोटी रुपयांचे इक्विटी शेअर्स विक्रीसाठी उपलब्ध असतील.

इथॉस लिमिटेड (Ethos Limited)

इथॉस लिमिटेड ही भारतातील सर्वात मोठी लक्झरी आणि प्रीमियम घड्याळ्यांची विक्री करणारी कंपनी आहे. कंपनी वेबसाइट्स, सोशल मीडिया आणि लक्झरीअस स्टोअरद्वारे प्रीमियम लक्झरी घड्याळ्यांची विक्री करते.
इथॉसचा आयपीओ 18 मे रोजी ओपन होणार असून 20 मे रोजी बंद होणार आहे. याची एकूण साईज 472.29 कोटी रुपये आहे आणि प्राईस बॅण्ड 836 ते 878 रुपये प्रति शेअर अशी निश्चित करण्यात आली. कंपनीने आयपीओद्वारे 375 कोटी रुपये उभे करण्याचं उद्दिष्ट निश्चित केलं आहे. कंपनी 11.08 लाख इक्विटी शेअर्सची विक्री करणार आहे. यातून मिळणाऱ्या रकमेचा उपयोग कर्ज परतफेड आणि इतर कामांसाठी करण्यात येणार आहे.

ईमुद्रा लिमिटेड (eMudhra)

ईमुद्रा लिमिटेड (eMudhra) बंगळुरी स्थित 2008 मध्ये माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत स्थापन केलेली कंपनी आहे. ती डिजिटल स्वाक्षरी प्रमाणपत्रे जारी करणारी एक परवानाकृत प्रमाणन प्राधिकरण (licensed Certifying Authority) कंपनी आहे. ईमुद्रा कंपनीचा आयपीओ 20 मे रोजी ओपन होणार असून 24 मे पर्यंत खुला असणार आहे. कंपनीने आयपीओद्वारे 412.79 कोटी रुपये उभारण्याचं उद्दिष्ट ठेवलं आहे. ईमुद्राच्या आयपीओची प्राईस बॅण्ड 243 ते 256 रुपये प्रति इक्विटी शेअर इतकी ठेवण्यात आली आहे. सध्याचे कंपनीचे शेअर्सधारक आणि प्रमोटर्स 98.35 लाख शेअर्सची विक्री करणार आहेत.

पारादीप फॉस्फेट्सच्या आयपीओचे वाटप 24 मे रोजी तर 27 मे रोजी त्याचे लिस्टिंग होऊ शकतं. इथॉस लिमिटेड कंपनीच्या आयपीओचे वाटप 25 मे आणि ईमुद्रा कंपनीच्या आयपीओचे लिस्टिंगक 1 जून 2022 रोजी होण्याची शक्यता आहे. दरम्यान, प्रुडंट कॉर्पोरेट (Prudent Corporate), विनस पाईप्स (Venus Pipes) आणि डेलीव्हेरी (Delhivery) या कंपन्यांच्या आयपीओ शेअर्स वाटपाची घोषणा देखील पुढील आठवड्यात अपेक्षित आहे. त्यामुळे येत्या आठवड्यात प्राथमिक बाजारात चांगल्या परिणामांची अपेक्षा आहे.