Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Small Cap Funds investment: इक्विटी फंडातली गुंतवणूक मे महिन्यात निम्म्यावर, 'स्मॉल कॅप'कडे गुंतवणूकदारांचा ओघ

Small Cap Funds investment: इक्विटी फंडातली गुंतवणूक मे महिन्यात निम्म्यावर, 'स्मॉल कॅप'कडे गुंतवणूकदारांचा ओघ

Image Source : www.economictimes.indiatimes.com

Small Cap Funds investment: इक्विटी फंडामधली गुंतवणूक कमी होत असल्याचं दिसून येत आहे. मे महिन्यात तर यातल्या गुंतवणुकीचं प्रमाण अक्षरश: निम्म्यावर आलं. दुसरीकडे स्मॉल कॅप चांगली कामगिरी करत आहेत. गुंतवणूकदार स्मॉल कॅपला पसंती देत असल्याचं दिसत आहे.

एएमएफआय (Association of Mutual Funds of India) वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या महिन्यात इक्विटी फंडांमध्ये (Equity funds) एकूण 3240 कोटी रुपयांचा ओघ आला. एप्रिलमध्ये हा आकडा 6480 कोटी रुपये होता. स्मॉल कॅप फंडांनी मागच्या महिन्यात सर्वाधिक 3282 कोटी रुपयांचा इनफ्लो नोंदवला. इक्विटी प्रकारात लार्ज कॅप फंडांमधून जास्तीत जास्त 1362 कोटी रुपये काढले गेले. निव्वळ आधारावर डेब्ट फंडात 45,959 कोटी रुपये गुंतवण्यात आले. एप्रिलमध्ये ते 1,06,677 कोटी रुपये इतके होते.

एकूण एयूएम वाढलं 

म्युच्युअल फंड कंपन्यांची एकूण मालमत्ता अंतर्गत व्यवस्थापन (Takeaways Assets under management ) मे महिन्यात 43.20 लाख कोटी रुपये इतकी होती. एप्रिल महिन्यात ती 41.61 लाख कोटी रुपये इतकी होती. इक्विटी फंड प्रकाराविषयी माहिती घेतल्यास असं दिसतं, की निव्वळ आधारावर 3240 कोटींचा ओघ होता. स्मॉलकॅप फंडांमध्ये 3282 कोटी रुपये, मिड कॅप फंडांमध्ये 1195 कोटी रुपये, लार्ज आणि मिड कॅप फंडांमध्ये 1133 कोटी रुपये आले आहेत. 582 कोटी रुपयांची गुंतवणूक व्हॅल्यू फंडांमध्ये, 289 कोटी लाभांश उत्पन्न फंडांमध्ये आणि 104 कोटी मल्टी कॅप फंडांमध्ये आली.

लार्ज कॅप फंडातून काढण्यात आले सर्वाधिक पैसे

लार्ज कॅप फंडांमधून सर्वाधिक 1362 कोटी रुपये काढण्यात आले. त्यानंतर इतर फंडांमधून काढण्यात आलेल्या पैशाचं प्रमाण कमी होतं. त्यात फ्लेक्सी कॅप फंडातून 368 कोटी रुपये, ईएलएसएस फंडातून 504 कोटी रुपये, सेक्टरल आणि थीमॅटिक फंडातून रुपये 169 कोटी, फोकस्ड फंडातून रुपये 943 कोटी काढण्यात आले.

डेब्ट फंडची कामगिरी

फंड प्रकाराबद्दल बोलायचं झाल्यास 45,959 कोटींची गुंतवणूक निव्वळ आधारावर करण्यात आली. या कॅटेगरीत लिक्विड फंडांमध्ये सर्वाधिक 45234 इतका इनफ्लो नोंदवण्यात आला. एप्रिलमध्ये 63219 कोटी रुपये होता. ओव्हरनाइट फंडातून सर्वाधिक 18,910 कोटी रुपये काढण्यात आले. एप्रिलमध्ये या श्रेणीत 6107 कोटी रुपयांची गुंतवणूक आली.