Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Investment Trends : गुंतवणूकीचे नवीन ट्रेंड्स

Investment Trends

Investment Trends : गुंतवणूकीचे वाढते महत्त्व ध्यानात घेता अलीकडे गुंतवणूकीचे पर्याय, क्षेत्र आज विस्तारत आहेत. पारंपारिक गुंतवणूकीसह आधुनिक मार्गाचा अवलंब करण्यावर गुंतवणूकदारांचा ओढा आहे. तुम्ही गुंतवणूकीचा विचार करत असाल तर या नविन गुंतवणूकीच्या मार्गाचा पूर्ण विचार करून गुंतवणूक करणं गरजेचं आहे.

Investment Trends :  अलीकडे सर्वांना गुंतवणूकीचे महत्त्व पटत आहे. त्यामुळे गुंतवणूक करण्यांकडे सगळ्यांचाच कल दिसून येतो. त्यामुळे गुंतवणूकीचे क्षेत्रेही विस्तारत आहेत. साधारणपणे बँकामध्ये फिक्स डिपॉझिट, सोने-चांदी, रियल इस्टेट, जमीन खरेदी , शेअर बाजार, म्युच्युअल फंड, बाँड्स यामध्ये सर्वाधिक गुंतवणूक केली जायची. मात्र, आता गुंतवणूकीचे क्षेत्रं आणि उद्देशासोबत गुंतवणूकीचे पर्याय  सुद्धा बदलत आहे. पाहुयात आताचे गुंतवणूकीमधल्या नवीन संधी आणि त्याचे फायदे.  

शाश्वत क्षेत्रातील गुंतवणूक

बदलत्या जीवनशैलीनुसार गुंतवणूकीचे उद्देश हे बदलत आहे. पैशाने पैसा कमावण्या बरोबरच सामाजिक दायित्वाची जाणीव सुद्धा गुंतवणूकदारांना होत आहे. याबरोबर शाश्वत विकास, पर्यावरण रक्षण या विषयाचं महत्त्व सुद्धा लोकांना पटत आहे. त्यामुळे शाश्वत विकासाला चालना मिळेल अशा क्षेत्रातील प्रकल्पांमध्ये गुंतवणूक करण्याचा उद्देश वाढत चालला आहे. जागतिक पातळीवर ग्रीन एनर्जी, इलेक्ट्रिक वाहने, कार्बन क्रेडिट अशा क्षेत्रांमध्ये सध्या मोठ्या प्रमाणावर काम सुरू आहे. तेव्हा अधिकाधिक कंपन्यासुद्धा गुंतवणूकीसाठी,  विकासासाठी या क्षेत्रात उतरत आहेत.

या विविध म्युच्युअल फंड, शेअर बाजारच्या माध्यमातून आता या क्षेत्रात गुंतवणूक करणं सोपं झालं आहे. तरी या क्षेत्रात दीर्घकाळासाठी गुंतवणूक करणं गरजेचं असून यातून मिळणारा परतावा  सुद्धा मोठा व दीर्घकालीन असू शकतो. दरम्यान, तुमचा पैसा हा सामाजिक दायित्वासाठी, पर्यावरणाच्या रक्षणासाठी व शाश्वत विकासासाठी वापरून त्यातून चांगला मोबदला मिळवण्यासाठी या क्षेत्रात गुंतवणूक करण्याचा ट्रेंड सुरू झाला आहे.

पर्यायी गुंतवणूक

गुतंवणूक करताना ती केवळ एकाच क्षेत्रामध्ये न करण्याचा सल्ला गुंतवणूक सल्लागार देत असतात. कारण एकाच क्षेत्रात गुंतवणूक केल्याने नुकसानची शक्यता अधिक असते. त्यामुळे कधिही विविध क्षेत्रामध्ये गुंतवणूक करण्याला प्राधान्य द्यायला हवे. यामध्ये रियल इस्टेट, कमोडिटी मार्केट, इक्विटी फंड असे विविध पर्याय उपलब्ध आहेत. या क्षेत्रामध्ये अधिकतर गुंतवणूक केली जाते. या गुंतवणूकीमध्ये गुंतवणूक कालावधी हा गुंतवणूकदार सोयीनुसार ठरवू शकतो.  या गुंतवणूकीमधून मोठ्या प्रमाणावर परतावा मिळतो. मात्र, या गुंतवणूकीमधील परतावा हा बाजारभावावर अबलंबुन असल्याने रिस्क सुद्धा असते. तसंच पारदर्शकता ही कमी असते. मात्र, अशा प्रकारच्या गुंतवणूकीमध्ये विविध प्लान्स असतात. जर मार्केटचा चांगला अभ्यास केला आणि विचारपूर्वक गुंतवणूक केली तर गुंतवणूकदाराला फायदा होतो.

तंत्रज्ञान क्षेत्रातील गुंतवणूक

गुंतवणूक क्षेत्रामध्ये गुंतवणूकीसाठी अलीकडे आणखी एका क्षेत्राला महत्त्व दिलं जातंय ते म्हणजे तंत्रज्ञान क्षेत्र. आज जागतिक पातळीवर तंत्रज्ञान क्षेत्राची भरभराट होत आहे. विकासामध्ये तंत्रज्ञानाच्या प्रगतीला सर्वाधिक महत्व प्राप्त होत आहे. त्यामुळे तंत्रज्ञान क्षेत्राती नाविन्यपूर्ण बदलांमध्ये, संशोधनासाटी गुंतवणूक करण्यावर  गुंतवणूकदारांकडून भर दिला जात आहे. यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स, सायबर सेक्यूरिटी, क्लाऊड कम्प्युटिंग अशा क्षेत्रात गुंतवणूकदारांचा ओघ वाढत आहे.

क्रिप्टोकरन्सी

गुंतवणूक क्षेत्रामध्ये क्रिप्टोकरन्सीचा चांगलाच बोलबाला आहे. डिजीटल चलन म्हणून या क्रिप्टो करन्सीला ओळखले जाते. जागतिक पातळीवर इथरियम, बिटकॉइन सारख्या करन्सीमध्ये अलीकडे मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली जात आहे. अनेक क्रिप्टोकरन्सी कंपनीच्या माध्यमातून या करन्सीमध्ये गुंतवणूक करता येते. यातून चांगला परतावा सुद्धा मिळत आहे. मात्र, या गुंतवणूक क्षेत्रात गुंतवणूक करणं काही प्रमाणात धोकादायक आहे. आपल्या देशात जरी या गुंतवणूकीमध्ये काही अनुचित प्रकार घडल्यास ईडी अंतर्गत कारवाई केली जाणार असली तरी कायदेशीर मान्यता दिलेली नाहीये. पुर्णत: कायदेशीर संरक्षण मिळण्याची शाश्वती नसल्याने व या क्षेत्रात पूर्णत: पारदर्शता नसल्याने या क्षेत्रात गुंतवणूक करताना गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे अत्यावश्यक आहे.