Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Investment in Gold : केवळ शेअर बाजारातच नव्हे तर सोन्यातही करा गुंतवणूक

Investment in Gold

सोन्यामधील गुंतवणूक (Investment in Gold) महागाई नियंत्रणात महत्त्वाची भूमिका बजावते. सध्या बाजारात गुंतवणुकीसाठी इतर विविध सिक्युरिटीज पर्याय उपलब्ध असूनही सोने हे लोकांमध्ये गुंतवणुकीचे लोकप्रिय माध्यम आहे.

शतकानुशतके सोने हे गुंतवणुकीचे सर्वाधिक पसंतीचे साधन आहे. या पिवळ्या चमकदार धातूचा खूप उपयोग होतो. चलनाचे मूल्य नियंत्रित करण्यासाठी आणि सर्वात महत्त्वाच्या जोखमीपासून संरक्षण देण्यासाठी याचा वापर केला जातो. सोन्यामधील गुंतवणूक (Investment in Gold) महागाई नियंत्रणात महत्त्वाची भूमिका बजावते. सध्या बाजारात गुंतवणुकीसाठी इतर विविध सिक्युरिटीज पर्याय उपलब्ध असूनही सोने हे लोकांमध्ये गुंतवणुकीचे लोकप्रिय माध्यम आहे.

सोने ही मोठी संपत्ती बनत आहे

जेफरीज या वित्तीय सेवा पुरवणाऱ्या फर्मच्या मते, 10.7 ट्रिलियन डॉलर भारतीय घरगुती संपत्तीपैकी सुमारे 15% सोन्याचा समावेश होतो. सोन्यात 15% पर्यंत गुंतवणूक केल्याने चांगला परतावा मिळतो तसेच पोर्टफोलिओमधील जोखीम कमी होते. या व्यतिरिक्त, जर पोर्टफोलिओमध्ये जास्त परताव्याच्या इक्विटीमध्ये गुंतवणूक केली असेल, तर या काळात सोने जास्त जोखमीपासून संरक्षण देते. म्हणजेच ते मोठ्या नुकसानापासून वाचवू शकते. जरी इक्विटीमधील 100% गुंतवणूक जास्त परतावा देऊ शकते, तरीही या गुंतवणूक पर्यायामध्ये गुंतलेली जोखीम जास्त आहे. सोन्यामुळे होणाऱ्या अनेक फायद्यांसह, काही निश्चित कालावधीत सोन्यात गुंतवणूक करणे हा आर्थिकदृष्ट्या योग्य निर्णय असू शकतो. मंदीचा अंदाज, चार दशकांतील सर्वाधिक महागाई आणि युक्रेनवर रशियाचे आक्रमण यामुळे सोने ही मोठी संपत्ती बनली आहे.

तुमच्या पोर्टफोलिओमध्ये सोन्याची भूमिका

गुंतवणूकदाराच्या दृष्टीकोनातून एसेट अलोकेशन पाहता, गेल्या 20 वर्षांत आंतरराष्ट्रीय सोन्याच्या किमतींनी अंदाजे 9% (CAGR) परतावा दिला आहे, तर S&P 500 ने त्याच कालावधीत अंदाजे 10% परतावा दिला आहे. 20 वर्षांच्या कालावधीत देशांतर्गत सोन्याच्या किमतींनी 11% च्या CAGR सह चांगला परफॉर्मन्स दिला आहे, तर सेन्सेक्सने 18% चा CAGR दिला आहे. दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी इक्विटी हा चांगला पर्याय असला तरी त्यात जोखीम जास्त असते. सोने पोर्टफोलिओला अत्यंत आवश्यक संरक्षण प्रदान करते आणि चांगल्या प्रकारे राखलेल्या पोर्टफोलिओमध्ये, परताव्याशी तडजोड न करता जोखीम पातळी लक्षणीयरीत्या कमी करते.

केंद्रीय बँकाही सोने ठेवतात

तुमच्या पोर्टफोलिओमध्ये विविधता आणण्यासाठी सोन्यामध्ये गुंतवणूक करणे केवळ गुंतवणूकदारांपुरते मर्यादित नाही. उलट, बाजारातील जोखीम टाळण्यासाठी मध्यवर्ती बँकाही ते त्यांच्याकडे सोनं ठेवतात. यूएस फेडरल रिझर्व्ह (Fed) त्याचे अँसेट्स सुरक्षित करण्यासाठी आणि त्याच्या होल्डिंगमध्ये डायव्हर्सिफाय करण्यासाठी सोन्यात गुंतवणूक करत आहे. यूएस मध्यवर्ती बँकेकडे 8,000 टनांहून अधिक सोन्याचा साठा आहे, जो जगातील सर्वाधिक आहे. त्यानंतर जर्मनी, इटली आणि फ्रान्सचा क्रमांक लागतो. भारताकडे सुमारे 786 टन सोने आहे, जे जगातील साठ्यापैकी 7.7% आहे.

या वेबसाईटवरील मजकुरात कोणताही आर्थिक किंवा व्यावसायिक सल्ला दिलेला नाही. मात्र लोकांना आर्थिक घडामोडींशी संबंधित शैक्षणिक मार्गदर्शन करण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न करत आहोत. आर्थिक किंवा व्यवसायिक विषयांशी संबंधित सल्ला हवा असल्यास आपण नोंदणीकृत वित्त सल्लागाराची मदत घ्यावी.