नवीन आर्थिक वर्षात जर तुम्ही गुंतवणुकीचा (Investment) पर्याय शोधत असाल तर आम्ही तुम्हाला एक मजबूत पर्याय सांगत आहोत. सोन्यात (Gold) गुंतवणूक केल्यास ती इतर मार्गांमध्ये सर्वात पुढे असल्याचंच दिसून आलंय. चांदी, निफ्टी, याशिवाय बाकीचे परतावा देणारे पर्याय म्हणजे म्युच्युअल फंड असोत किंवा क्रिप्टोकरन्सी असोत, हे सर्वच कमाईच्या बाबतीत फिके पडल्याचं दिसून आलं. यामागे आणखी एक कारण आहे. युक्रेन-रशिया युद्धासारखे भू-राजकीय तणाव आणि चीनच्या खुल्या अर्थव्यवस्थेमुळे वाढलेली मागणी अशी काही कारणं आहेत. टीव्ही 9नं याविषयीचं वृत्त दिलंय. आर्थिक संकटामुळे लोकांना असुरक्षित वाटत आहे. त्यामुळे ते आपले सुरक्षित गुंतवणुकीचे मार्ग शोधत आहेत. त्यामुळे कमाईसाठी सोनं हा एक चांगला पर्याय आहे. कसा ते आकडेवारीवरूनच पाहुया..
Table of contents [Show]
निफ्टीमध्ये किंमत दर्शविली नाही
गेल्या आर्थिक वर्षात शेअर बाजाराच्या हेवीवेट निर्देशांकात तशी कोणतीही ताकद दिसून आली नाही. संपूर्ण वर्षभर निफ्टीनं गुंतवणूकदारांना 3 टक्केदेखील परतावा दिला नाही. आकडेवारी पाहिली तर आर्थिक बाबतीत 12 महिन्यांपैकी 8 महिने तर तोट्यातच गेले आहेत. त्यापैकी 4 महिने असे आहेत, ज्यामध्ये गुंतवणूकदारांना 3 टक्क्यांहूनही अधिक नकारात्मक परतावा मिळाला. यातल्या जून 2022 या महिन्यात सर्वात मोठा तोटा दिसून आला. त्यावेळी निफ्टी सुमारे 5 टक्क्यांनी घसरला होता.
महिना आणि निफ्टीचा परतावा असा होता
एप्रिल - -2.07
मे - -3.03
जून - -4.85
जुलै - 8.73
ऑगस्ट - 3.50
सप्टेंबर - -3.74
ऑक्टोबर - 5.37
नोव्हेंबर - 4.14
डिसेंबर - -3.48
जानेवारी - -2.45
फेब्रुवारी - -2.03
मार्च - -0.16
चांदीने भरपूर पैसा कमावला
गेल्या आर्थिक वर्षात चांदीची कामगिरी 50-50 टक्के होती. चांदीनं 6 महिन्यांत नकारात्मक परतावा दिला मात्र सकारात्मक परतावा असलेल्या 6 महिन्यांत कोणतीही कसर सोडली नाही. नोव्हेंबरमध्ये 10 टक्के आणि डिसेंबर महिन्यात 9 टक्क्यांहून अधिक परतावा चांदीनं दिला. त्याचवेळी, मार्च महिन्यातही चांदीने सुमारे 12 टक्के परतावा दिला. त्याआधी, सप्टेंबर 2022मध्ये चांदीने 7 टक्क्यांहून अधिक परतावा दिला होता. दुसरीकडे, ऑगस्ट महिन्यात चांदी सर्वात स्वस्त झाली होती. त्या महिन्यात किंमत सुमारे 9 टक्क्यांनी कमी झाली.
महिना आणि चांदीचा परतावा असा होता
एप्रिल - -4.65
मे - 5.01
जून - -3.66
जुलै - -0.88
ऑगस्ट - -8.94
सप्टेंबर - 6.97
ऑक्टोबर - 1.44
नोव्हेंबर - 10.03
डिसेंबर - 9.38
जानेवारी - -0.84
फेब्रुवारी - -6.11
मार्च - 11.59
सोन्याचा परतावा सर्वात चांगला
चांदी आणि निफ्टीतला परतावा तर पाहिला. त्या तुलनेत मागचं आर्थिक वर्ष सोन्यासाठी उत्तम ठरलं. 5 महिने सोडले तर इतर सर्व महिन्यांमध्ये गुंतवणूकदारांना सोन्यामधून सकारात्मकच परतावा मिळालेला आहे. तर या 5 महिन्यांमध्ये तोटाही फार दिसला नाही. सोन्याच्या दरात केवळ ऑगस्ट 2022मध्ये 1.97 टक्के आणि फेब्रुवारी महिन्यात 2.51 टक्क्यांची घसरण झाली. दुसरीकडे, सप्टेंबर 2022 ते जानेवारी 2023 या पाच महिन्यांत सोन्यानं चांगला परतावा दिला. विशेष म्हणजे सोन्याचा सरासरी परतावा 18.02 टक्के दिसून आला.
महिना आणि सोन्याचा परतावा असा होता
एप्रिल - -0.79
मे - -1.75
जून - -0.65
जुलै - 1.80
ऑगस्ट - -1.97
सप्टेंबर - 0.44
ऑक्टोबर - 0.26
नोव्हेंबर - 5.18
डिसेंबर - 3.94
जानेवारी - 3.95
फेब्रुवारी - -2.51
मार्च - 7.45
जाणकारांचं काय मत?
नवीन आर्थिक वर्षात इक्विटी मार्केटची कामगिरी फारशी चांगली होण्याची शक्यता नसल्याचं यातले जाणकार सांगतात. एकीकडे निवडणुका, महागाई यासारख्या देशांतर्गत कारणांमुळे 5 ते 6 टक्क्यांची वाढ दिसून येईल. दुसरीकडे, मंदी आणि व्यापार युद्धासारख्या जागतिक तणावामुळे गुंतवणूकदारांचा कल कुठे असेल, हेही सांगता येत नाही. सराफा बाजारात सोन्यासाठी 10-12 टक्के आणि चांदीसाठी 30 टक्के उच्च परतावा मिळू शकतो.