Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Investment in Gold and Silver : सोने आणि चांदीमध्ये गुंतवणूक करताय हे मुद्दे लक्षात घ्या

gold investment

जे लोक मौल्यवान धातूंमध्ये गुंतवणूक करण्याचे नियोजन करतात, त्यांच्यासाठी सध्याच्या घडीला सोने आणि चांदी या दोन प्रमुख पसंती आहेत. भारतीय दागिन्यांच्या वापरासाठी सोन्याचा वापर करतात तसेच गुंतवणुकदारांसाठी ती सहज उपलब्ध असलेली वस्तू आहे. कारण यात गुंतवणुकीचे विविध पर्याय उपलब्ध आहेत. डिजिटल सोन्याचा पर्याय आल्यामुळे गुंतवणुकादारांमध्ये तो अधिक लोकप्रिय झाला. डिजिटल गोल्डमुळे कमॉडिटी गुंतवणूक अधिक कि

जे लोक मौल्यवान धातूंमध्ये गुंतवणूक करण्याचे नियोजन करतात, त्यांच्यासाठी सध्याच्या घडीला सोने आणि चांदी या दोन प्रमुख पसंती आहेत. भारतीय दागिन्यांच्या वापरासाठी सोन्याचा वापर करतात तसेच गुंतवणुकदारांसाठी ती सहज उपलब्ध असलेली वस्तू आहे. कारण यात गुंतवणुकीचे विविध पर्याय उपलब्ध आहेत.  

पुरवठ्यातील टंचाईमुळे सोने हे चांदीपेक्षा महाग

किंमतीच्या बाबतीत सोन-चांदीचे गुणोत्तर विरोधात्मक आहे. एक औंस सोने खरेदीच्या तुलनेत आपल्याला कित्येक औंस चांदी खरेदी करावी लागते.  यावरून असे दिसते की, दर एक औस चांदीच्या तुलनेत सोने हे 80 पटींनी मौल्यवान आहे. .

चांदीपेक्षा सोने कमी अस्थिर असते

अल्पकालीन चढ-उतार असल्याने गुंतवणूकदारांना चालना मिळते, तरीही दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी सोन्याला प्राधान्य दिले जाते. दुसरीकडे, चांदीतील अस्थिरता यापेक्षा जवळपास दुप्पट असते. तसेच, सोन्याच्या बाजाराच्या तुलनेत चांदीच्या बाजाराची उलाढाल प्रामुख्याने कमी असते. सोन्याच्या बाजारातील उलाढाल जवळपास 28 ट्रिलियन डॉलर आहे तर चांदीची 6 ट्रिलियन डॉलर एवढी आहे. मात्र किंमत कमी होण्याच्या लाटेत या दोहोंवर समान परिणाम दिसून येतात. उपरोक्त वक्तव्यानुसार, सोन्याच्या बाजारापैकी एका भागाच्या मूल्याची तुलना एकूण चांदीच्या बाजारमुल्याशी करता येते. अल्प मुदतीच्या चढ-उतारांच्या एकाच पैलूनुसार चांदी ही सोन्यापेक्षा जास्त आकर्षक ठरते.  

वैविध्याच्या दृष्टीकोनातून गुण वैशिष्ट्ये

आपल्या पोर्टफोलिओत मौल्यवान धातूचा समावेश करणे, ही गुंतवणुकदारांची सामान्य वृत्ती आहे. इतर स्टॉक्स किंवा बाँड्सप्रमाणे या मौल्यवान धातूंची किंमत परस्परांवर अवलंबून नाही. त्यामुळे एकूणच पोर्टफोलिओतील जोखीम कमी होते. यामुळे गुंतवणुकीचे पर्याय वाढतात व सोन्या-चांदीकडे गुंतवणुकदार आकर्षित होतात. जेव्हा वैविध्याचा विचार येतो, तेव्हा सोने हे दोन्ही धातूंमध्ये महत्त्वाचे मानले जाते.  

वैयक्तिक प्रस्तावांबाबतीत तुलना

औद्योगिक वापरासाठी सोन्याच्या तुलनेत चांदीचा जास्त वापर होतो. या गरजेमुळे चांदी ‘हाय डिमांड कमोडिटी’ ठरते. चांदीत परावर्तन, औष्णिक आणि इलेट्रॉनिक दृष्टीने अनुकुल असे गुणधर्म आहेत. मागील दोन दशकांत, सोन्यापेक्षा चांदीसाठी अधिक पेटंट्स दिसून आले. तथापि, मागील दहा वर्षांत ग्राहकोपयोगी उत्पादनांमध्ये १ अब्ज औंस चांदीचा वापर करण्यात आला. या एका पैलूवर चांदीने सोन्यापेक्षा जास्त चमक प्राप्त केली. त्यामुळे पुढील वर्षांत चांदीचे दर वाढतील, अशी अपेक्षा करणे तर्कसंगत आहे.

सोन्याची मालमत्ता आता एक्सचेंज ट्रेडेड फंड आणि ई-गोल्डच्या स्वरुपातही खरेदी करता येऊ शकते. एक्सचेंज ट्रेडेड फंड हे डिमॅट अकाउंटमधूनही ऑपरेट करता येतात. याद्वारे डिजिटल फॉर्ममधील सहज ट्रान्झॅक्शनची सुविधा मिळते. यासोबतच, ई-वॉलेट्स आणि पेमेंट गेटवेदेखील बदलत्या प्रमाणानुसार व्यापाराचे पर्याय दिले जात आहेत. ज्यामुळे सध्याच्या संकटकाळात प्रत्यक्ष सोने मिळवणे कठीण झाले असताना स्मार्टफोन आधारित व्यवहार आणि रिवॉर्ड्स मिळू शकतात.