ईएलएसएसच्या (ELSS) माध्यमातून मोठी करसवलत मिळत असते. कलम 80C अंतर्गत कर लाभ या माध्यमातून मिळत असतो. त्यामुळे महागाईच्या काळात परतावा मिळत असल्यानं गुंतवणूकदारांनादेखील एक दिलासा मिळतो. ईएलएसएस या फंडांमध्ये तीन वर्षांचा लॉक-इन टर्म असतो. इक्विटी (Equity) किंवा इक्विटीशी संबंधित सिक्युरिटीजमध्ये गुंतवणूक केली जाते. मुदत ठेवी, सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF) आणि इतर पोस्ट ऑफिस बचत योजना आहेत. यातून कर-बचत साध्य होते. ईएलएसएस फंड हा कराचा बोजा कमी करण्याची इच्छा असणाऱ्या गुंतवणूकदारांमध्ये लोकप्रिय आहे. यातून मिळणारा परतावादेखील चांगला आहे.
Table of contents [Show]
तज्ज्ञ काय म्हणताहेत?
साधारणपणे म्युच्युअल फंडाचा विचार केला तर एसआयपीला प्राधान्य दिलं जातं. कर सवलतीचे पर्याय अनेक आहेत, मात्र त्यातून कोणता पर्याय योग्य आहे, याची निवड करणंही गरजेचं आहे. नवीन आर्थिक वर्ष सुरू झालंय. गुंतवणूकदार ईएसएसएसच्या फंडांमध्ये गुंतवणूक करण्यास इच्छुक आहेत, की एसआयपी अथवा एकरकमी अशा कोणत्या पर्यायाचा वापर करावा, याविषयी तज्ज्ञांनी 'मिंट'शी बोलताना आपली मतं व्यक्त केलीत.
'मासिक आणि वार्षिक एसआयपी'
ईएलएसएस किंवा एकरकमी गुंतवणुकीनं म्युच्युअल फंडात कसलाही फरक पडत नाही. इक्विटीमध्ये गुंतवणूक करण्याचे हे दोन्ही मार्ग आहेत. एकरकमी गुंतवणुकीवर एसआयपीचा फारसा काही फायदा होत नाही. भारतीय बाजारपेठेत दीर्घकाळापासून चढ-उतार पाहायला मिळतो. त्यामुळे गुंतवणूक केली तर तुमची कामगिरी चांगली होईल. मासिक एसआयपी रिटर्नची तुलना वेगवेगळ्या कालावधीतल्या वार्षिक एसआयपीशी केली आहे. वार्षिक एसआयपीमधला परतावा टक्केवारीनुसार चांगला आहे, असं ईटी मनीचे चीफ ऑपरेटिंग ऑफीसर संतोष नवलानी यांनी सांगितलं.
'एसआयपी हा सर्वोत्तम पर्याय'
आर्थिक वर्ष 24मध्ये एसआयपी हा ईएलएसएस गुंतवणुकीचा सर्वात योग्य पर्याय असेल. बाजारात मोठी घसरण होते, त्यावेळी एकरकमी करता येते, असं पीजीडीबीएफ, लिमरा, एमडीआरटी, एएमएफआयचे फायनान्शिअल पोर्टफोलिओ मॅनेजर अंकुश बाली म्हणाले.
'एकरकमी गुंतवणुकीला प्राधान्य'
ईएलएसएसमध्ये एकरकमी मार्गानं गुंतवणूक हा एक चांगला पर्याय आहे. मी स्वत: या पर्यायाला प्राधान्य देतो. यातल्या गुंतवणुकीच्या दोन मार्गांपैकी एक निवडण्यातला सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे एखाद्या व्यक्तीनं तयार केलेला रोख प्रवाह होय. जसं की एखाद्या उद्योजकाकडे अनिश्चित कॅशफ्लो असू शकतो. म्हणून एकरकमी मार्ग निवडायला हवा. तर पगारदार व्यक्तीनं निश्चित गुंतवणुकीची निवड करायला हवी, असं जैनम ब्रोकिंग लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक आणि सह-संस्थापक मिलन पारीख यांनी म्हटलं.
'आपल्या गरजेवर अवलंबून'
एसआयपी किंवा लंपसम मधील निवड करणे नेहमीच तुमची गुंतवणुकीची उद्दिष्टे, जोखीम घेण्याची क्षमता आणि निधीची उपलब्धता यावर अवलंबून असते.
गुंतवणूक कुठे करावी हे सर्वस्वी आपल्या गरजेवर अवलंबून असतं. तुमच्या गुंतवणुकीचं नेमकं उद्दिष्ट काय, जोखीम घेण्याची तुमची क्षमता आणि निधीची उपलब्धता यावर एसआयपीमधली गुंतवणूक निवड करण्यास प्राधान्य दिलं जातं, असं विश्लेषण आर्थिक सल्लागार राजीव अग्रवाल यांनी केलं.
बाजारातल्या ट्रेंडबद्दल खात्री हवी
गुंतवणुकीसाठी एकरकमी रक्कम आपल्याकडे उपलब्ध असेल, तसंच बाजारातल्या ट्रेंडबद्दल खात्री असेल तर सर्वच रक्कम एकाच वेळी गुंतवण्याचा विचार करता येवू शकतो. मात्र बाजारातल्या परिस्थितीबद्दल, अस्थिरतेबद्दल काहीच माहिती नसेल आणि जोखीम कमी करायची असेल तर एसआयपीचा गुंतवणुकीचा विचार करता येईल. यातून ठराविक अंतरानं ठराविक रक्कम गुंतवण्याची परवानगी दिली जाते.
आर्थिक लागण्यास मदत
ईएलएसएसमध्ये एसआयपीद्वारे गुंतवणूक करण्याचा आणखी एक फायदा म्हणजे आर्थिक बाबतीत यानिमित्तानं शिस्त लागते. गुंतवणुकीच्या संधी न गमावता नियमितपणे गुंतवणूक केली जाते. त्यामुळे सर्व घटकांचा विचार केल्यास एक मुद्दा महत्त्वाचा आहे, तो म्हणजे या आर्थिक वर्षात ईएसएसएसमध्ये गुंतवणूक करताना एसआयपी आणि एकरकमी असे दोन पर्याय आहेत. हे तुमच्या गरजेवर, आर्थिक परिस्थितीवरच अवलंबून आहेत, हे स्पष्ट होतं.