पीपीएफ या योजनेत चक्रवाढ व्याजाचा लाभ 7.1 टक्के दरानं सध्या उपलब्ध आहे. हमखास परतावा देणारी ही एक सरकारी योजना असून लोकप्रियदेखील आहे. पीपीएफचा कालावधी 15 वर्ष असतो. मॅच्युरिटीच्या वेळी गुंतवणूकदाराला तीन पर्याय (PPF maturity options) दिले जातात. जर तुम्हीही या योजनेत गुंतवणूक केली असेल तर तुम्हाला त्याबद्दल माहिती असणं गरजेचं आहे.
Table of contents [Show]
पहिला पर्याय
पीपीएफच्या मॅच्युरिटीनंतर, तुम्ही व्याजासह संपूर्ण रक्कम काढू शकता आणि तुमच्या गरजेनुसार संबंधित रक्कम कुठेही वापरू शकता. संपूर्ण रक्कम तुमच्या बचत खात्यात ट्रान्सफर करण्यासाठी तुम्हाला पीपीएफ खातं उघडलेल्या बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये एक फॉर्म सबमिट करावा लागणार आहे. काही दिवसातच तुमचे संपूर्ण पैसे व्याजासह खात्यात जमा होतात.
दुसरा पर्याय
तुमची इच्छा असेल तर तुम्ही पीपीएफ खात्यात तुमचं कॉन्ट्रिब्यूशन पुढे चालू ठेवू शकता. पुढच्या 5 वर्षांसाठी हे खातं वाढवता येवू शकतं. यासाठी तुम्हाला बँक किंवा पोस्ट ऑफिस यापैकी जिथं तुमचं खातं असेल त्याठिकाणी अर्ज द्यावा लागेल. हा अर्ज तुम्हाला मॅच्युरिटीच्या तारखेपासून 1 वर्ष पूर्ण होण्याआधी देणं गरजेचं आहे. मुदतवाढीसाठी एक फॉर्म भरावा लागणार आहे.फॉर्म त्याच पोस्ट ऑफिस किंवा बँक शाखेत सबमिट केला करावा ज्याठिकाणी पीपीएफ खातं असेल. हा फॉर्म वेळेत सबमिट करू शकत नसाल तर तुम्ही खात्यात कॉन्ट्रिब्यूशन देऊ शकणार नाहीत. या 5 वर्षांमध्ये गरज असेल त्यावेळी तुम्ही पैसेही काढू शकता.
तिसरा पर्याय
15 वर्षांनंतर तुम्ही गुंतवणूक चालू न ठेवताही तुमच्या ठेवीवर व्याज घेऊ शकता. यासाठी बँक किंवा पोस्ट ऑफिसला कळवण्याचीदेखील गरज नाही. 15 वर्षांच्या मुदतीनंतर जस समजा तुम्ही रक्कम काढलीच नाही तर हा पर्याय आपोआपच लागू होतो. या खात्यातून तुम्ही कधीही आणि कितीही पैसे काढू शकता. तुम्हाला हवं असेल तेव्हा तुम्ही संपूर्ण पैसेही काढू शकता. यामध्ये तुम्हाला एफडी आणि बचत खात्याची सुविधा मिळणार आहे.
पीपीएफचे फायदे
पीपीएफ खात्यात थोडी रक्कम जमा करूनही तुम्हाला अनेक फायदे मिळतात. पैसे चांगल्या प्रकारे जोडू शकता. या योजनेत दरमहा 2000 रुपये जमा केले तर तुम्हाला वार्षिक 24,000 रुपये मिळू शकतात. या हिशोबाने 15 वर्षांमध्ये तुम्ही 3,60,000 जमा होतील. यात 7.1 टक्क्यानुसार 2,90,913 व्याज म्हणून मिळतील. 15 वर्षात 6,50,913 जमा होतील. मॅच्युरिटीनंतर तुम्ही या योजनेत आणखी 5 वर्षे गुंतवणूक करत राहिल्यास 10,65,326 रुपये जोडले जातील.
कलम 80C अंतर्गत कर सूट
पीपीएफवर कर लाभही मिळतात. ही योजना ईईई (EEE) या श्रेणी अंतर्गत येते. त्यामुळे संपूर्ण गुंतवणुकीवर कर सवलतीचा लाभ मिळतो. गुंतवणुकीवर मिळणारं व्याज आणि मॅच्युरिटीच्या एकूण रकमेवर कोणताही कर भरावा लागत नाही. आयकर कलम 80C अंतर्गत वार्षिक 1.5 लाखांपर्यंतच्या गुंतवणुकीवर कर सूटदेखील मिळू शकते.