Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Intel's Historic Collapse: इंटेल कंपनीची ऐतिहासिक घसरण; कंपनीचे बाजार भांडवल 8 अब्ज डॉलरने घसरले

Intel's Historic Collapse

Image Source : www.zdnet.com

Intel's Historic Collapse: इंटेल कंपनीने पहिल्या तिमाहीत मोठे नुकसान होण्याचा अंदाज वर्तवला होता. त्याप्रमाणे डेटा सेंटर बिझनेसमध्ये मंदीचे वातावरण असल्यामुळे कंपनीने महसुलचा अंदाज 3 अब्ज डॉलरपेक्षा कमी नोंदवला होता.

Intel's Historic Collapse: कॉम्प्युटरसाठी आवश्यक असणाऱ्या चिप बनवणाऱ्या कंपनीने येणाऱ्या काळात कंपनीच्या नफ्यात घरसण होण्याचा अंदाज व्यक्त केल्यानंतर इंटेल कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार अब्ज डॉलरने घसरले. यामुळे पर्सनल कॉम्प्युटर मार्केटमध्येही निराशाजनक वातावरण निर्माण झाले. इंटेल कंपनीने पहिल्या तिमाहीत कंपनीला मोठया तोट्याला सामोरे जावे लागेल, असा अंदाज वर्तवला होता. तसेच सध्या सुरू असलेल्या डेटा सेंटर बिझनेसमध्ये मंदीचे वातावरण असल्यामुळे कंपनीने अंदाजित महसुलामध्ये 3 अब्ज डॉलरने कपात केली.

‘इंटेल’च्या शेअरमध्ये 6.4 टक्क्यांनी घसरण

कॉम्प्युटरसाठी आवश्यक असणाऱ्या चिप बनवणाऱ्या कंपनीने येणाऱ्या काळात कंपनीच्या नफ्यात घरसण होण्याचा अंदाज व्यक्त केल्यानंतर इंटेल कंपनीचा शेअर 6.4 टक्क्यांनी घसरून बंद झाला. त्याचवेळी इंटेल कंपनीच्या प्रतिस्पर्धी कंपन्या अडव्हान्स मायक्रो डिव्हायसेस (Advanced Micro Devices) आणि निविडिया (Nvidia) या कंपन्यांच्या शेअर्समध्ये अनुक्रमे 0.3 आणि 2.8 टक्के वाढ झाली. तर वरील निराशाजनक बातमीमुळे इंटेल कंपनीला सप्लाय करणाऱ्या केएलए कॉर्पोरेशन (KLA Corp.) कंपनीच्या शेअर्समध्येही 6.9 टक्क्यांनी घसरण होऊन तो बंद झाला.

Intel AMD Shares Graph-1
इंटेल आणि एएमडी कंपन्यांच्या शेअर्समधील चढ-उताराची घसरण. इंटेलच्या शेअर्समध्ये सासत्याने घसरण दिसून येत आहे.  Image Source: www.reuters.com

इंटेल कंपनीच्या शेअर्समध्ये झालेल्या या ऐतिहासिक घसरणीबाबत आश्चर्य व्यक्त करत यावर भाष्य करण्यासाठी शब्द नाहीत, अशी प्रतिक्रिया रोसेनब्लाट सिक्युरिटीजचे हॅन्स मोझेसमन यांनी दिली. हॅन्स मोझेसमन हे इंटेलच्या शेअर्सची किंमत कमी का झाली. याचे विश्लेषण करणाऱ्या 21 विश्लेषकांपैकी एक आहेत.

कंपनी आणि अमेरिका आणि युरोपमध्ये नव्याने कारखाने उभे करून कंपनीचा विस्तार करून पुन्हा एकदा या क्षेत्रात वर्चस्व स्थापित करण्याचा प्रयत्न करत होती. त्याला या अपपेक्षित घटनेमुळे धक्का बसल्याचे सांगितले जाते आहे. इंटेल कंपनीने आपले प्रोडक्शन वाढवण्यासाठी येत्या काही वर्षात अमेरिका आणि युरोपमध्ये नवीन कंपन्या सुरू करण्याची योजना आखली होती. यावर विपरित परिणाम होण्याची शक्यता असल्याने कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पॅट गेलसिंगर यांच्यासमोरील आव्हानात वाढ झाली. 
एएमडीसारख्या कंपन्यांनी तैवानमधील टीएसएमसी (TSMC) कंपनीच्या मदतीने चिप निर्मितीच्या क्षेत्रात शिरकाव केल्यामुळे इंटेल कंपनीला त्याचा थेट फटका बसू लागला आहे. त्याच्या शेअर्समध्ये दिवसेंदिवस घसरण होऊ लागली आहे.