Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Life Insurance vs Equity: इन्शुरन्स म्हणजे मानसिक समाधान आणि आर्थिक स्वातंत्र्य!

Life Insurance vs Equity

Life Insurance vs Equity: इन्शुरन्स पॉलिसीचा मूळ हेतु पॉलिसीधारकाला मानसिक समाधान आणि त्याच्या पश्चात प्रियजनांना आर्थिक स्वातंत्र्य आणि सुरक्षितता देणे हा असतो. त्या तुलनेत इक्विटीमध्ये केलेली गुंतवणूक आर्थिक सुरक्षिततेची किंवा लाईफ कव्हरची कोणतीही हमी देत नाही.

“शेअर मार्केटमध्ये आपला कष्टाचा पैसा गुंतवणे म्हणजे लाखाचे बारा हजार करून घेण्यासारखे” हा पारंपरिक “असमज” दूर होऊन तीन दशकांहून अधिक काळ लोटला. JP Morgan, Morgan Stanley सारख्या इन्व्हेस्टमेंट बॅंकांतले उच्चभ्रू बँकर्सपासून ते गृह-उद्योग चालविणाऱ्या गृहिणींपर्यंत शेअर मार्केटमधील “उछाल-गिरावट” यांबद्दल उत्सुकतेने बोलताना दिसू लागलंय. अभ्यासपूर्ण गुंतवणूक केल्यास बाजारातील चढ-उताराचे फायदे मिळवता येतातही. मात्र शेअर मार्केटपेक्षा सुरक्षित आणि दीर्घकालीन आर्थिक स्थैर्य आणि मानसिक समाधान देणाऱ्या आर्थिक पर्यायाविषयी आज आपण चर्चा करणार आहोत आणि ती गोष्ट म्हणजे “लाईफ इन्शुरन्स पॉलिसी”(Life Insurance Policy).

इन्शुरन्स म्हणजे मानसिक समाधान आणि आर्थिक स्वातंत्र्य!

लाईफ इन्शुरन्स पॉलिसी खरेदीचा हेतूच मुळात पॉलिसीधारकाला स्वतःला मानसिक समाधान आणि त्याच्या पश्चात त्याच्या प्रियजनांना आर्थिक स्वातंत्र्य आणि सुरक्षितता देणे हा असतो. लाईफ इन्शुरन्स पॉलिसीमध्ये अतिशय कमी प्रीमियम भरून देखील तुलनेने खूप जास्त रक्कमेचे लाईफ कव्हर खरेदी करता येते. हे लाईफ कव्हर पॉलिसीच्या अगदी पहिल्या दिवसापासून संपूर्ण पॉलिसी टर्मकरीता मिळत असते. मात्र शेअर मार्केटमध्ये केलेली गुंतवणूक आर्थिक सुरक्षिततेची किंवा लाईफ कव्हरची कोणतीही हमी कधीही देत नाही.

नियमित प्रीमिअममुळे आर्थिक शिस्त लागते

लाईफ इन्शुरन्स पॉलिसीचे संपूर्ण फायदे मिळवायचे असतील तर नियमित प्रीमियम भरावे लागतात. तुलनात्मकदृष्ट्या अतिशय किफायतशीर असणारे परंतु नियमितपणे भरावे लागणारे प्रीमियमस् आपल्याला सेव्हिंग करायची आर्थिक शिस्त लावतात. आणि कालांतराने एक चांगला आर्थिक फंड (कॉर्पस) तयार होतो. शेअर मार्केटमध्ये समभाग खरेदी-विक्री करण्यासाठी नियमितपणे गुंतवणूक करणे बंधनकारक नसते. पण त्याचमुळे दीर्घकालीन आर्थिक ध्येय साध्य होण्यासाठी, संपत्तीची निर्मिती (Wealth Creation) होण्यासाठी सर्वात मोठा अडथळा असतो, ते निश्चित गुंतवणूक करण्याचे बंधन नसण्याचा.

इन्शुरन्समधील काही रक्कम मार्केटमध्ये गुंतवली जाते

लाईफ इन्सुरन्स पॉलिसीची खरेदी केल्यानंतर पॉलिसीधारक जे प्रीमियमची रक्कम इन्शुरन्स कंपनीकडे भरत असतो. त्यापैकी काही रक्कम ही शेअर मार्केटमध्ये गुंतविली जाते. फंड मॅनेजर आपल्या व्यावसायिक ज्ञानाचा वापर करीत गुंतवणूकदारांच्यावतीने हा अवाढव्य निधी हाताळत असतो. हा निधी विविध पोर्टफोलिओमध्ये गुंतविण्यात येत असल्याने पैशाचे विकेंद्रीत गुंतवणूक (Diversification) होते. त्यामुळे शेअर मार्केटमधील चढ-उतारांचा धोका देखील लवचिक (Risk Reduced) होतो. वैयक्तिकरित्या शेअर मार्केटमध्ये केलेली गुंतवणूक ही जास्त जोखीमयुक्त असते.

किमान लॉकइन पिरियडमुळे सक्तीची गुंतवणूक! 

लाईफ इन्शुरन्स पॉलिसीचा  किमान “5 वर्षे लॉक इन पिरियड” असल्याने इन्सुरन्समध्ये केलेली गुंतवणूक सहजपणे काढून घेता येत नाही. त्यामुळेही फोर्सफुली का होईना पण एक चांगला कॉर्पस तयार होतो. शेअर मार्केट मध्ये केल्या जाणाऱ्या गुंतवणुकीमध्ये असा “लॉक इन पिरियड” नसल्याने आणि वारंवार “समभागांची (शेअर्सची)  खरेदी-विक्री” हा पर्याय सहजपणे उपलब्ध असल्याने एक चांगला फंड (कॉर्पस) तयार होण्यासही खूपदा अडथळा होतो.

इन्शुरन्स पॉलिसीवर टॅक्स सवलत मिळते

प्रतिवर्ष 1.5 लाखांपर्यंत केल्या जाणाऱ्या करमुक्त गुंतवणूकीचा “लाईफ इन्शुरन्स पॉलिसी” हा भाग असल्यास भारतीय आयकर कायदा, 1961 च्या कलम 80 (C) आणि 10(10 (D)) अंतर्गत अनुक्रमे कर भरण्यापासून सवलत आणि करमुक्त परताव्याची हमी मिळते. मात्र शेअर मार्केटमध्ये केलेली गुंतवणूक कलम 80 (C) ची अशी कोणतीही सवलत देत नाही. या उलट शेअर मार्केटमध्ये खरेदी केलेल्या इक्विटी शेअर्सची विक्री करताना मिळालेल्या रक्कमेवर 15% इतका “शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्स” भरावा लागतो.

त्यामुळे दीर्घकालीन संपत्ती निर्माण करताना आणि शिस्तबद्ध गुंतवणूक व बचतीचे धडे देतानाच लाईफ कव्हरची छत्री देणारा इन्शुरन्स हा निश्चितच आर्थिक गुंतवणुकीचा किफायतशीर पर्याय ठरू शकतो.