Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

IPO: सध्या चर्चेत असलेला 'IPO' नक्की आहे तरी काय? जाणून घेण्यासाठी सविस्तर वाचा

IPO

IPO: आयपीओ काढल्यामुळे ज्याप्रकारे कंपनीला फायदा होतो तसाच तो खरेदी करणाऱ्यालाही होतो. अधिक माहितीसाठी सविस्तर वाचा.

Initial Public Offering: सध्या जिकडे तिकडे एकाच गोष्टीची चर्चा चाललीये, ती म्हणजे 'आयपीओ(IPO)'. मागील काही दिवसांपासून अनेक कंपन्यांच्या IPO संदर्भातील बातम्या वाचायला मिळत आहेत. पण हा 'IPO' म्हणजे काय? आणि IPO बाजारात आणण्याची कोणती कारणे आहेत, याबद्दल तुम्हाला काही ठाऊक आहे का? चला तर याबद्दल थोडक्यात समजून घेऊयात.

IPO म्हणजे काय?

आपण सगळ्यांनीच शेअर मार्केटबद्दल(Share Market) वाचले किंवा ऐकले नक्कीच असेल. बरेच जण या शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक(Investment) ही करत असतील. याठिकाणी एका दिवसात लाखो रुपये कमावणारा व्यक्ती दुसऱ्या दिवशी पुन्हा खाली सुद्धा येतो. त्यामुळे शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करताना जोखिमेचा विचार करून गुंतवणूक करावी लागते. सध्या शेअर मार्केटमध्ये तरुण वर्गाची संख्या मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करताना पाहायला मिळत आहे. हल्लीच्या बातम्यांमध्ये सतत ऐकायला मिळणारा शब्द म्हणजे 'IPO'. 
आयपीओ(IPO) म्हणजेच 'इनिशिअल पब्लिक ऑफरिंग(Initial Public Offering)' होय. कोणतीही एखादी मोठी कंपनी शेअर बाजारात(Share Market) पहिल्यांदाच त्यांचे शेअर विक्रीसाठी काढते तेव्हा त्यांना आयपीओ(IPO) म्हणतात. या प्रक्रियेमध्ये त्या कंपनीचे शेअर्स सामान्य नागरिकांना खरेदीसाठी खुले करण्यात येतात म्हणजेच सामान्य माणूस त्या कंपनीचे शेअर्स खरेदी(Share Buying) करू शकतो. कंपनी त्यांच्या व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी शेअर्सच्या माध्यमातून निधी जमा करते. हा निधी वापरून कंपनी त्यांचा व्यवसाय(Business) वाढण्यास सुरुवात करते. त्या बदल्यात सामान्य लोकांना कंपनीचे शेअर्स  मिळतात. जेव्हा तुम्ही एखाद्या कंपनीचे शेअर्स विकत घेता तेव्हा तुम्ही त्या कंपनीचे अधिकृत भागीदार झालेले असता. तुमचे जितके शेअर्स खरेदी करता तितकी तुमची भागीदारी जास्त. एखादी कंपनी अनेकदा त्यांच्या कंपनीचे आयपीओ(IPO) बाजारात आणू शकते. IPO च्या माध्यमातून कंपन्याना त्यांचा विस्तार करणे सोपे जाते.

IPO बाजारात आणण्याची कारणे कोणती?

लोन ऐवजी IPO केव्हाही चांगला

जेव्हा एखादी कंपनी प्रॉफीटमध्ये(Profit) असते तेव्हा ती व्यवसायाचा विस्तार करण्याच्या दृष्टिकोनाने IPO काढण्याचा विचार करते. व्यवसाय विस्तारासाठी कंपनी बँकांकडून कर्ज(Bank Loan) घेऊ शकते पण त्या कर्जाला ठराविक वेळेत आणि व्याजदरासहित(With Interest) फेडावे लागते. याउलट IPO  काढला तर मिळालेले पैसे परत ही करावे लागत नाहीत आणि त्यासोबतच व्याजदरही भरावे लागत नाही. त्यामुळे व्यवसाय विस्ताराच्या दृष्टिकोनातून कंपन्या IPO काढतात. 
IPO  काढल्यामुळे ज्याप्रकारे कंपनीला फायदा होतो तसाच तो खरेदी करणाऱ्यांनाही होतो. जर तुम्ही एखाद्या कंपनीचे IPO द्वारे दोन टक्के शेअर्स विकत घेतले आहेत, म्हणजे तुमची त्या कंपनीचे 2 टक्के मालक झाला आहात. त्यामुळे आयपीओमध्ये ग्राहक आणि कंपनी असा दोघांचा फायदा होतो.

कर्ज कमी करण्यासाठी मदत  

एखादी कंपनी जेव्हा कर्जबाजारी होते तेव्हा देखील IPO काढला जातो. त्या कंपनीवरील कर्ज(Loan) कमी करण्यासाठी कंपनीचा काही भाग IPO द्वारे विक्रीसाठी काढला जातो. यामुळे कंपनीला नवीन भागीदार आणि गुंतवणूकदार(Investor) मिळतात. कर्जबाजारी झालेल्या कंपनीला मदतही मिळते. बँकेकडून कर्ज घेण्यापेक्षा अनेक कंपन्या त्यांचा समभाग IPO द्वारा विक्रीला काढतात.

नवीन उत्पादनाच्या प्रमोशनकरिता

कंपनी त्यांचे नवीन उत्पादन(New Product Launch) बाजारात यावे आणि ते अधिक प्रसिद्ध व्हावे यासाठी सुद्धा IPO काढते. नवीन लॉंच केलेल्या उत्पादनाचे मोठ्या प्रमाणावर प्रमोशन व्हावे यासाठी IPO काढला जातो. आयपीओमुळे उत्पादन अधिक लोकांपर्यंत पोहचण्यास मदत होते.