Shares gave the highest returns: शेअर बाजारात (Stock Market) असे अनेक शेअर्स आहेत, ज्यांनी गुंतवणूकदारांना करोडपती बनवले आहे. बाजारात घसरण झाली असली तरी या शेअर्सनी गुंतवणूकदारांना बंपर परतावा दिला आहे. हे शेअर्स अजूनही तेजीत आहेत, त्यापैकी एक स्टॉक आहे, ज्यामध्ये गुंतवणूक करणारे व्यक्ती आज करोडपती आहेत. या शेअरने सातत्याने गुंतवणुकदारांना मजबूत परतावा दिला आहे.
प्रस्तावनेत ज्या शेअरबाबत एवढे कौतुक केले आहे, तो इन्फोसिस कंपनीचा शेअर आहे. इन्फॉर्मेशन सिस्टीम अर्थात इन्फोसिस ही कंपनी 2 जुलै 1987 साली पुण्यात सुरू झाली होती. ही कंपनी जागतिक आयटी सेवा पुरवते. या कंपनीची स्थापना पुण्यातील सात अभियंत्यांनी केली होती. कंपनीत सध्या तीन लाखांहून अधिक लोक काम करत आहेत. इन्फोसिसचे या काळात आठ लाख कोटी रुपयांचे मूल्यांकन आहे. आज ही जगातील टॉप आयटी कंपन्यांपैकी एक आहे.
इन्फोसिस कंपनीचा आयपीओ (IPO: Initial public offering) 29 वर्षांपूर्वी बाजारात आला होता. इन्फोसिसचे शेअर्स इश्यू किंमतीच्या 52 टक्के प्रीमियमवर लिस्ट केले गेले. त्या काळात गुंतवणुकदारांनी भरघोस नफा कमावला होता. त्यावेळी इन्फोसिसच्या शेअरची इश्यू किंमत सुमारे 95 रुपये होती. अल्पावधीतच इन्फोसिसच्या शेअरची किंमत 1 हजार 510 रुपये (Infosys share price) पर्यंत वाढली आहे. ज्यांनी यात गुंतवणूक केली त्यांना बंपर परतावा मिळाला. मीडिया रिपोर्ट्सनुसार, लिस्टिंग झाल्यापासून इन्फोसिसने आठ वेळा बोनस जारी केला आहे. इन्फोसिसनेही एकदा शेअर विभाजन (Share split) केले आहेत.
गुंतवणुकदार झाले करोडपती! (Investors became millionaires!)
इन्फोसिसच्या समभागांनी सातत्याने गुंतवणूकदारांना उत्कृष्ट परतावा दिला आहे. जर कोणी इन्फोसिसच्या आयपीओमध्ये (IPO) 9 हजार 500 रुपये गुंतवले असतील, तर त्याला 100 शेअर्स मिळाले असते. कंपनीने आठ वेळा बोनस शेअर्स जारी केले आणि एकदा कंपनीने स्टॉक विभाजित केला. या प्रकरणात शेअर्सची संख्या 1 लाख 2 हजार 400 झाली असती. सध्या इन्फोसिसच्या शेअर्सवर नजर टाकली तर सोमवारी म्हणजेच 9 जानेवारी 2023 रोजी ते 1 हजार 485 च्या आसपास चालू आहेत. या प्रकरणात, 1 लाख 2 हजार 400 शेअर्सची किंमत सुमारे 15 कोटी 20 लाख 64 हजार रुपये आहे. या शेअरने गुंतवणुकदारांना श्रीमंत केले आहे.