Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Inflation Indicators : आर्थिक मंदीची गमतीशीर निर्देशांक

Inflation Indicator

Unconventional Economic Indicators - आर्थिक मंदी आहे की नाही हे ठरवण्यासाठी अनेक मापकं आहेत. मात्र, मुलींच्या स्कर्टची उंची, केस कापण्याचे प्रमाण असे काही गमतीशीर निर्देशांक सुद्धा अस्तित्वात आहेत. अर्थात हे निर्देशांक सगळीकडेच लागू होतात असे नाही. पण, महागाई वाढल्यावर कोण-कोणत्या गोष्टीवर फरक पडतो आणि त्यावरून महागाई संदर्भात कसा निष्कर्ष काढला जातो, हे आपल्याला पाहायला मिळते.

Inflation Indicators : आर्थिक मंदी संदर्भात अनेक अर्थतज्ज्ञ, सत्ताधाऱ्यांमध्ये दुमत असते. सर्वसामान्यपणे दैनंदिन वापरातील वस्तुंच्या किंमती वाढणे, अनेकांच्या नोकऱ्या जाणे, व्याजदर कमी होणे, देशाचा जीडीपी कमी होणे, रियल इस्टेटमधील गुंतवणूक घटणे यावरून आर्थिक मंदी असल्याचे निष्कर्ष काढले जातात. मात्र, दैनंदिन आयुष्यातील काही सवयी बदलण्यावरूनही मंदी आहे की नाही हे आपण सांगू शकतो. यावरून काही निर्देशांक प्रचलित झाले आहेत.  तर पाहुयात हे गमतीशीर निर्देशांक.

जपानमधील केस कापण्याचा निर्देशांक

ज्यावेळेला एखाद्या महिलेची आर्थिक स्थिती चांगली असते तेव्हा ती महिला आपल्या केसाची निगा राखत असते. पार्लेरमध्ये जाऊन वेगवेगळे हेअरकट करणे किंवा वेगवेगळ्या ट्रिटमेंट  घेऊन स्वत:च्या ग्रुमिंगवर (Grooming) जास्त लक्ष देत असते. मात्र, मंदीच्या वा महागाईच्या काळात केसाच्या स्टायलिंगवर अधिक लक्ष देणे हे त्या महिलेला परवडण्याजोगे नसते. त्यावेळी हा खर्च महिलेकडून थांबवला जातो. जपानमध्ये या निर्देशांकावर 20 वर्षाहून अधिक काळ निरीक्षण केल्यावर जॅपनीझ हेअरकट इंडिकेटर (Japanese Haircut Indicator) प्रचलित झाला.

Inflation Indicators

कचऱ्यासंदर्भात निर्देशांक (Garbage Indicator)

नावावरूनच हा निर्देशांक काय असेल हे आपल्याला समजले असेल. पण कचऱ्याचा आणि मंदीचा काय संबंध हा प्रश्न पडला असेल. हे खूप सोप्प आहे. जेव्हा आपल्या खिशात चांगला पैसा असतो तेव्हा आपण खाण्यावर जास्त पैसे खर्च करतो. दिवसाच्या शेवटी तेवढेच वेस्टेज फेकून देतो. कचऱ्याचे प्रमाण वाढते. मात्र, जेव्हा मंदीच्या काळात पैसे कमी असतात तेव्हा खाण्यावर पैसे खर्च करण्याचे प्रमाण कमी होते. त्यामुळे ते फेकण्याचे प्रमाण ही कमी होते. परिणामी कचरा कमी होतो. अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेचा अभ्यास करत असताना अमेरिकेतल्या अर्थतज्ज्ञांकडून  या निर्देशांकामध्ये 82 टक्के अचूकता असल्याचे निदर्शनास आले.

हेमलाइन निर्देशांक ( HEMLINE INDEX)

हेमलाइन म्हणजे आपल्या कपड्याची उंची. ज्यावेळेला आर्थिक स्थिती उत्तम असते तेव्हा आपल्या कपड्याची उंची आपण हवी तशी ठेवत असतो. छोटी उंची असलेले कपडे जर चांगल्या आर्थिक परिस्थितीवेळी खरेदी केल्यावर ते अधिक छोटे व्हायला लागल्यावर आपण नवे कपडे घेत असतो. मात्र, ज्यावेळी आर्थिक परिस्थिती बदलते वा मंदीचा काळ सुरू होतो तेव्हा आपण दीर्घकाळ वापरता येतील अशा कपड्यांच्या खरेदीवर भर देतो. थोडक्यात नेहमीपेक्षा जास्त उंची असलेले कपडे आपण खरेदी करतो जेणेकरून कपड्यावर जास्त खर्च करावा लागणार नाही. 1929 साली वॉल स्ट्रीट क्रॅशच्या (Wall Street Crash) घटनेनंतर हा निर्देशांक प्रचलित झाला.

शॅम्पेन इंडेक्स (Champagne Index)

पाश्चिमात्य देशांमध्ये कुटुंबातील विशेष प्रसंगी किंवा सण साजरे करताना शॅम्पेन उडवून आनंद द्विगुणित करण्याची पद्धत आहे. याच शॅम्पेनचा मंदीशी ही संबंध आहे. जेव्हा आर्थिक परिस्थिती उत्तम असते तेव्हा ग्राहक महागड्या गोष्टी खरेदी करत असतात. सण-उत्सव साजरे करताना त्यामध्ये भव्यता असते. शॅम्पेन उडवणे, खाण्या-पिण्यासाठी अनेक पर्याय ठेवणे, सजावटीवर अधिक खर्च करणे असे अनेक वाढीव खर्च केले जातात. मात्र, जेव्हा परिस्थिती याउलट असते तेव्हा आपोआपच या सर्व अतिरिक्त खर्च टाळले जातात. त्यावरूनच शॅम्पेनचा समावेश मंदीच्या निर्देशांकामध्ये करण्यात आला.