Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Fish Price Hike: शेवटी माशांवरही पडले महागाईचे सावट..

Fish Price Hike

Fish Price Hike: वाढत्या थंडीमुळे मासे महागले (Fish Price Hike) आहेत. महागाईने सर्वच क्षेत्र व्यापले आहेत, आणि आता ती माशांवरही पोहचली आहे.

Fish Price Hike: हिवाळा म्हटलं की मासे प्रेमींसाठी जणू मेजवाणीच असते, हिवाळ्यामध्ये मासे खाण्याकडे लोकांचा जास्त भर असतो. परंतु मासे प्रेमींसाठी निराश करणारी माहिती मिळाली आहे. वाढत्या थंडीमुळे मासे महागले (Fish Price Hike) आहेत. महागाईने सर्वच क्षेत्र व्यापले आहेत, आणि आता ती माशांवरही पोहचली आहे. माशांचे दर आभाळाला भिडले असतांना सुद्धा ग्राहक मासे खरेदी करणार का हा मोठा प्रश्न सध्या उभा झालेला दिसून येत आहे. 

माशांचे दर (Fish rates)

पापलेटने (Paplet) हजारी गाठली आणि सुरमईने 800 चा आकडा पार केला आहे. पापलेट भाव 1200 रुपये तर सुरमईचा भाव 800 रुपये किलोवर पोहोचला आहे. हवामान बदलाचा समुद्रातील माशांच्या उपलब्धतेवर मोठा परिणाम झाला आहे. साधे ट्रॉलर्स किंवा प्रवासी बोटीही (trawlers or passenger boats) मासे पकडत नाहीत.

माशे खाण्याचा डॉक्टरांचा सल्ला..  (Doctor advice to eat fish..)

हिवाळ्यात संसर्गजन्य आजारांचे (Infectious disease) प्रमाण वाढले आहे. अशा परिस्थितीत रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी डॉक्टर मांस खाण्याचा सल्ला देतात. उत्पन्न कमी आणि मागणी जास्त असल्याने अंडी आणि मासळीचे भावही वाढले आहेत. 

थंडीमुळे माशांची आवक कमी (Due to the cold, the arrival of fish is less)

हवामान बदलाचा म्हणजेच थंडीचा माशांच्या आवकवर परिणाम झालेला दिसून आला आहे. साधे ट्रॉलर्स किंवा प्रवासी बोटीही मासे पकडत नाहीत. यामुळे माशांचे दर आकाशाला भिडतांना दिसून येत आहे. 

हॉटेलमधील माशांचे दर (Fish rates in hotels)

हॉटेलमधील मेनू कार्डवर (menu card) माशांचे दर सध्या 200 ते 300 रुपये प्लेट असे आहेत. पापलेट आणि सुरमईचे (Paplet and Surmai) दर हॉटेलमधील मेनू कार्डवरही उंचावले आहेत. बावडा आणि इतर माशांचे दर साधारण आहेत.