• 03 Oct, 2022 23:54

इंडिगोची विमान प्रवाशांसाठी ‘Sweet 16 Offer’; 1616 रूपयांत करा विमान प्रवास!

इंडिगोची विमान प्रवाशांसाठी ‘Sweet 16 Offer’; 1616 रूपयांत करा विमान प्रवास!

Indigo Sweet 16 Offer : इंडिगो एअरलाईन्सने कंपनीला 16 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त ग्राहकांसाठी Sweet 16 offer आणली आहे. या ऑफरद्वारे ग्राहकांना 1,616 रूपयांमध्ये विमानाचं तिकिट दिलं जाणार आहे.

इंडिगो एअरलाईन्सने कंपनीच्या 16 वर्षांच्या यशस्वी हवाई सेवेनंतर ग्राहकांकरीता Sweet 16 Offer आणली आहे. या ऑफर अंतर्गात विमानाने प्रवास करणाऱ्या ग्राहकांना 1,616 रूपयांमध्ये विमानाचं तिकिट दिलं जाणार आहे. इंडिगोने ट्विटरद्वारे ही माहिती दिली आहे. ही ऑफर बुधवार दि. 3 ऑगस्टपासून सुरू झाली असून शुक्रवार दि. 5 ऑगस्टपर्यंत सुरू असणार आहे. 18 ऑगस्ट 2022 ते 16 जुलै 2023 या दरम्यान ही ऑफर लागू असणार आहे. यासाठी ग्राहकांना विशेष दर म्हणजे 1,616 रूपयांपासून (Indigo Ticket Booking) असणार आहे.

इंडिगो एअरलाईन्सने कंपनीच्या 16 वर्षांच्या वर्धापनदिनानिमित्ताने इंटरग्लोब अॅविएशन लिमिटेड (IndiGo) कंपनीने ग्राहकांसाठी विशेष ऑफर (Indigo Anniversary Sale) दिली आहे. ही ऑफर 3 ऑगस्ट रात्री 12 वाजल्यापासून सुरू झाली असून शुक्रवार 5 ऑगस्टपर्यंत सुरू राहणार आहे. या ऑफरचा कालावधी 18 ऑगस्ट 2022 ते 16 जुलै 2023 हा असणार आहे. म्हणजे ग्राहकांना या कालावधीत प्रवास करण्यासाठी या विशेष ऑफरचा (Indigo Sale Offer) लाभ घेता येणार आहे. या ऑफर अंतर्गत इंडिगो विमानांची तिकिटे 1,616 रूपयांपासून सुरू होणार आहे.

इंडिगो स्वीट 16 ऑफर

इंडिगो कंपनीला उड्डाण क्षेत्रात 16 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त कंपनीने 1616 अशी विशेष ऑफर (Indigo Anniversary Sale) ग्राहकांसाठी आणली आहे. इंडिगोने Indigo Sweet 16 Sale ऑफर (Indigo Sale 2022) अंतर्गत इंडिगो विमानांची तिकिटे 1,616 रूपयांपासून विक्रीसाठी उपलब्ध करून दिली आहेत. इंडिगोच्या Indigo Sweet 16 Sale ऑफरचा तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही प्रवास करू इच्छित असलेल्या तारखेपेक्षा किमान 15 अगोदर तिकिट बुकिंग करणं गरजेचं आहे. 18 ऑगस्ट, 2022 पूर्वी आणि 16 जुलै, 2023 नंतर तुम्ही जर इंडिगो एअरलाईन्सने प्रवास करणार असाल तर तुम्हाला या ऑफरचा लाभ (Indigo Flight Offers) घेता येणार नाही.

नियम आणि अटी जाणून घ्या!

कंपनीने या ऑफर्सद्वारे विक्रीसाठी उपलब्ध असलेल्या तिकिटांची संख्या जाहीर केलेली नाही. ही ऑफर मर्यादित असून दिलेल्या मुदतीत तिकिट बुक करणाऱ्या ग्राहकांना याचा लाभ दिला जाईल, असे कंपनीने स्पष्ट केले. तसेच ही ऑफर इतर ऑफर्सबरोबर क्लब केलेली नसून, या ऑफर्स अंतर्गत केलेली बुकिंग रद्द किंवा बदलता येणार नाही. तसेच ही ऑफर ग्रुप बुकिंगसाठीही उपलब्ध नाही, असेही कंपनाने स्पष्ट केले.